पान:महाभारत.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २७८ नरहरिकृत ॥ ९३ ॥ रामदूताची उड्डाणे । तैसे शर उसळती त्राणे । भेदोनी वीरांची अंगेत्राणे । शिरें व्योमा उडविती. ॥ ९४ । प्रभिन्न करिटी मत्त हस्ती । शिररहित पडती क्षिती । फुटोनी पोटें, लोंबती अंत्रीं । पाद शृंडा इतस्तता. । ९५ ॥ घाई जर्जर अनेकशः । भैरंव शब्द लंचिती दिशा । सदा वार विगतदशा । मृत्युपंथा लागती. ॥ ९६ ॥, अश्वांसहित उतराणे । महा पडती विगत प्राणें । छिन्नगात्री बहुधा रंणे- । विन वीर निघती, ॥ ९७। रथिया रथी घोर आपदा । भंगोनी स्पंदन जाहले चेंदा । वीर वीरांत बंद ‘दादा! । सांग ऍत्रा माझिया. ॥ ९८ ।। रुदित स्वरें मारिती हाका । नाना म्हणती, ‘मामा ! काका ! । बंधु ! मातुळ ! सुत! जनका ! । टाक नका आमुते ॥ ९९ ॥ ध्वज, पताका, वस्त्राभरणे, । कवचे, शस्त्रे, विचित्रवण भूमी लोळती नक्षत्रमानें । चहूंकडे सारिखीं. ।। १०० ॥ एक निश्चळ ठाई ठाई । एक घायाळ हुबती मही । एक खोडिती पाय भुयी । ‘पाणी ! पाणी विलपती. ॥ १०१ ।। ऐसा आकांत सेनामेळीं । सुसाट पडती बाणजाळा पळों जातां रणमंडळीं । भेदिती इंषु सर्वागीं. ॥ १०२ ॥ शरमय जाहल अवघी धरा । कांहीं उपाय न चाले वीरां । किलकिलाट शब्द सैरा । गज वाद्ये फोडिती. ।। १०३ ॥ जेवीं दावाग्नी धडकतां वनीं । तृणपादपांची क धुणी । तेवी नारायणास्त्राची करणी । सेनाहोळी होतसे. ॥ १०४ ॥ क्रा प्रदीप्त भीमसेन । सात्यकी आणि धृष्टद्युम्न । सह पार्थ प्रतापवान । ला टोनी शरां वर्षती. ॥ १०५ ।। अग्रता भीम पुरुषार्थी । सोडिल्या शरांचिया पंक्ती । परी शति नोहे कोणे अर्थी । जेवीं वन्ही इंधनें. ॥ १०६ ॥ की प्रावृटींचे नदीलोट । सागरामाजी होती आँट । तेवीं शरांची खटपट । बाधा नोहे अस्वातं. ॥ १०७ ॥ चहूंकडे सरकती शर । ठाई तुटती अग्निलोळ सैर । रथा आदळतां, वृकोदर । टाकोनी उडी निघाला. ।। १०८ ॥ रथाश्वः ध्वजसह सारथी । भस्मीभूत जाला न लागतां पातीं । शक्ती न चले तयाप्रती । वीर वीर खोंचॅले. ॥ १०९ ॥ जेवीं शीतीं अर्दित गायी। वार . १. मारुतीचीं. २. कवचे, चिलखते. ३. आकाशांत. ४. हत्ती. ५. आंतडीं. ६. भीतियु भयंकर. ७. स्वार, योद्धे. ८. रणेविना=युद्ध न करितां, युद्ध पराङ्मुख होऊन. ९. 'मी * ह्मणून माझ्या मुलाला सांग. १०. पुष्कळ योद्धे. ११. नक्षत्रासारखी देदीप्यमान. १२. कुथ १३. पायाचे खोडे होऊन पडले. ‘खुडिती' असे पाठांतर. १४. शेकोटी, नाश. १५. सपणास विस्तव ज्यास्त भडकतो, त्याप्रमाणे भीमाने बाण सोडल्यामुळे नारायणास्त्र फार प्रज्वलित झा असा भावार्थ. १६, अदृश्य. १७. विद्ध (जखमी) झाले. १८. थंडीचे दिवसांत. 'शेती' असे पठान