पान:महाभारत.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ३४ अध्याय] २७७ शिवाचा वरनेम । द्रोणनिधना अग्नि संभ्रम । वोपी पार्षत पांचाळ. ।। ७८ ॥ हें असत्य घडे कैसिया परी ? । प्रारब्धयोगें घडवी हरी । शोक सांडुनी रेणचत्वरीं । वौड होय, नरवर्या ! ॥ ७९ ॥ सर्थ माजी क्षेम गदा । वीरां । सकळां वोपीन आपदा । गदाधायी करुनी चेंदा । यमसदना वोपीन.' ॥ ८० ।। सात्यकी, पार्षत, धर्मराज । अनुमोढुनी वर्धती तेज । वरवाळोनी वीरांचे पुंज। गुरुपुत्रा थडकले.॥८१॥ ऍकसरा वोढोनी धनू। कोटीच्या कोटी सोडिले बाणू। बुजोनी काढिला द्रोणनंदनू । वीरां वळसा भोंबला. ॥ ८२ ॥ पार्थे गांडीव सजोनी नेटें । बाण सोडिले वन्हिपुटें । रिक्त ठाव न दिसे कोठे । शरांचीं पेटें दाटली. ॥ ८३ ॥ इषु उसळती सरसरा । कुजे गांडीव करकरा । सेने रिचवती झरझरा । मेघधारासारिखी. ॥ ८४ ॥ माजी अस्वप्रयोगदाटी । जाणों विजा पडती सृष्टी । सेना भंगतां बारा वाटीं । क्रोधे द्राणी प्रज्वळला. ॥ ५ ॥ जेवीं वणिवधीं रावण । क्रोधे प्रज्वळिला जैसा अन्न । शक्ती प्रेरिली निर्वाण । तेवीं क्षोभे ऋषिवर्य. ॥ ८६ ॥ क्रोधउल्का वमी वदनीं । नारायणास्त्र प्रयोगी रणीं । सबीजोचार करुनी वाणी । विधियुक्त शर सोडिला. ॥ ८७ ।। अस्त्रप्रभव होतां पाहीं । धूम्न दिशा दाटल्या दाही । प्रबळ झुंझूवात एके घायीं । जीं अंबर दाटलें. ।। ८८ ॥ सहस्र विजांचा एकवळा । तैसा कडाडी फुटला तळा । दचकोनी शेर्ष भूमंडळा । टाकों भावी भयार्थी. ॥ ८९ ॥ सकंप धरा थरथराटी । गिरिमौळे खचती सृष्टी । सप्तसागर खळबळ मोठी । लाटा नभा टिपिती. ॥ ९० ॥ उल्कापात, खचती तारा । व्योमीं खेचरां न निघे थारा । भूतगणांस आकांत सैरा । दिग्गज दिशा सांडिती. ॥ ९१ ॥ कोटिरवींचा एकवळा । तैसा लोटतां तेजगोळा । ज्वाला भेदिती अंतराळा । घडघडाट सुसाटे. ॥ ९२ ॥ माजी विचित्र सुवर्णपंखी । शर धांवती वन्हिमुखी । वीर भेदिती गात्रीं तिखी । सेनामेळीं आकांत १. शिवाने दिलेले वरदान कधीं निष्फळ होईल काय ? ‘गरदान नेम' असे पाठांतर, २, रा. गणांत. ३. वाडवाढ, मोठा, प्रतापी. ४. बलवान्. ५. आपसांत सल्लामसलत करून. ६. तटन पडन, हल्ला करून. ७. एकदम. ८. कठिण प्रसंग. 'वीरीं वळसा भाविला' असा अन्य पाट. ९. समुदाय, पेटें=सांगड, अनैक भोंपळे एकत्र बांधून नदी इत्यादिकांत तरावयाचे साधन करितात * ; .. शब्द करी, आवाज करी. ११. इंद्रजिताचा वध झाला त्या वेळीं. १२. वाणीने. १३. हा संस्कृत ‘झंझावात' शब्दाचा अपभ्रंश, ‘प्रबल' बद्दल प्रलय' असे पाठांतर. १४. धली -अाकाश. १५. कडकडाट. १६. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे, अशी समजूत आहे. १७. 'लोटला' असे पाठांतर,