पान:महाभारत.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ नरहरिकृत [द्रोणपर्व अन्योन्य कर्मी उदित दशा । शाश्वत देह अक्षई ऐसा । तरी मग घडो तैसेंची. ॥ ६३ ॥ पितामह पवित्रमूर्ती । समान विक्रम दाशरथी । सदाचारी, वधर्मरती, । ब्रह्मभावना, सैद्भक्ती; ॥ ६४ ।। जितेंद्रिय ज्ञानविज्ञान । शुकाचार्य तुळिजे मान । सर्वांगुणी गुणवर्धन । उपमे आन असेना. ॥ ६५ ॥ तैसाच गुरुवर्य भारद्वाज । विद्यासागर उत्कर्षतेज । पुण्यप्रद मुक्तिभाज । उभी जोडुनी करांतें. ॥ ६६ ॥ ऐसा समर्थ सर्वोपरी । आमुते मान्य जनकासरी । विकृतिभव अभ्यंतरीं । माझे ठाई न पाहे. ॥ ६७ । आमुचिये जय तोष तया । माते लक्षिती अमृतच्छाया । कासवीऐसी मजवरी माया । हषनंदें डुळती. ॥ ६८ ॥ तनय द्रोणी प्रीतिपात्र । न गणोनी, मातें वोपिली अस्त्रे । कदनीं कृपेची करुनी छत्रे । यश माझे वाढवी. ॥ ६९ ॥ ऐसियासी समरांगणीं । चित्रविचित्र केली करणी । राज्यलोभे मारिला गुणी । निंद्य याहुनी कोण पां ? ।। ७० ॥ न्यस्तस्त्र आचार्यराज । मुनिवृत्ती उपविष्ट सहज । ऐसियासी वधितां, फुजे । श्लाघ्यता केवीं मानणे ? ॥ ७१ ॥ अहो ! बत ! महत्पाप । दुष्कर कर्म अधर्म ताप । कोण पुरुषार्थ वर्धिला दीप । अमरत्व येणें पाविजे ?' ।। ७२ ।। पार्घतातें निंदी वचनीं । म्हणे, ‘अयुक्त केली करणी.' । उद्विग्नमान व्याकुळ मनीं । वदे, ‘अधर्म कोण पां?' ।। ७३॥ ऐकोनी संतप्त भीमसेन । म्हणे ‘हें साधुपण कोण घन ? । क्षेत्रपणासी अश्लाघ्य जाण । संधी परा जिंकिजे. ॥ ७४ । पाहें पां सौभद्र शस्त्रहीन । साहीजण घेतला प्राण । द्रौपदी सती पतिव्रता जाण । जे कां मान्य उमत॥ ७५ ॥ रजस्वला, एकवसनी । सभे गांजिली निष्ठुर वाणी । भी ष्मद्रोणादिवीरश्रेणीं । कौतुक नेत्री लक्षिलें. ॥ ७६ ॥ सामथ्य असोनियां आंगीं । निषेध केला नाही प्रसंगीं । धन्य श्रेष्ठत्व हेची जगीं । पवित्रता पुरुषार्थ ? ॥ ७७ ॥ भविष्यानुरूप घडे कर्म । वृथा १. जर हा देह शाश्वत ( अविनाशी ) असता, तर अशा प्रकारचे कृत्य घडले तरी चाल असते-हा भावार्थ. २. भीष्म. ३. स्वधर्मरीती' असे पाठांतर. ४. सद्भक्त' असा पाठभ3 ५. मुक्ति (मोक्षप्राप्ति)रूपी भार्या. ६. कपटभाव. ७. अंत:करणांत. ८. कासवी आपल्या पि लांचे नुसत्या प्रेमदृष्टीने पाहून पालनपोषण करिते. कासवीची पिलीं । कृर्म दृष्टीने सांभाळा ।। ही समर्थांक्ति प्रसिद्धच आहे. ९. प्रीतिपात्र पुत्र जो अश्वत्थामा त्याची पर्वा न करितां. 'न । त्याते' असा पाठभेद. १०. ज्याने आयुध खाली ठेविलें आहे असा. ११. योग्याप्रमाणे ध्यान" १२. बसलेला. १३. गर्वानें, अभिमानाने. १४. अयोग्य. १५. क्षत्रियत्वास. १६. योग्य साधून. परा=शत्रूस. १७. सन्मान्य, आदरणीय. १८. दुरुत्तरे बोलून.