पान:महाभारत.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ अध्याय] महाभारते. २७५ पणे. ॥ ४४ ॥ मम विक्रम बाहुवीर्य । अस्त्रप्रयोग वर्यवर्य । पाहोनी कृतांत मानी भय । पाय न घाली पुढारा. ॥ ४५ ॥ निर्वाणयुद्ध रणधुमाळी । सेना सर्व मेळवीन धुळी । रक्तनदीच्या खळाळी । सागराते डहुँळीन ?' ॥ ४६ ॥ ऐकोनी हर्ष कौरववीरा । पिटोनी पाणी, नाचती सैरा । अनेक वाद्ये भिन्नाकारी। वाचैकारी तर्जिलीं. ।। ४७ ॥ शंख, भेरी, पणव, मृदंग, । ढोल, दमामे, कर्ण, शृंगें, । हलक्या, नफेरी, बुरंगें, । सहस्रशः लागली. ॥ ४८ ॥ तुंबळ शब्द माजली ध्वनी । घोषं दिशा भरल्या रणीं । उसळोनी नाद पांडवसैन्यीं। हर्षानंदें डहुळले. ॥४९॥ एकत्र वीर जाले सर्वं । म्हणती द्रौणीची क्रोध हाव । क्रूर युद्धाचे गौरव । विगत केले पाहिजे. ॥ ५० ॥ तंव कौरवांचे महाभार । उतले जैसे गिरिवरे । कीं क्षयालागीं सप्त सागर । एकत्र जाले क्षयार्थी. ॥५१॥ पांडव वीर लोटुनी पुढती । सोडिते जाहले शरांच्या पंक्ती । कौरववीर हर्ष चित्तीं । इर्षांच्या कोटी वर्षती. ॥ ५२ ।। चतुरंग चमूचा एकवळा । ताडिती एकमेकां सकळां । विगत देखोनी कौरवमेळा । अश्वत्थामा क्षोभला. ॥ ५३॥ सरसावोनी प्रभिन्न धनू । शर सोडिले प्रदीप्त भानू । अष्टदिशा भरूनी पूर्ण । वीर वीर खिळिले. ।। ५४ ॥ चहूंकडे शरांचा सडा । धडे पडती दडदडा । अश्व नाचती तडतडा । बाण गात्रीं लोंबती. ॥ ५५ ॥ भग्न होवोनी कुंभस्थळे । उसळती ऊर्ध्व मुक्ताफळे । गात्रे खंडुनी फोडिती कीळे । महीवरी रिचवती. ॥५६॥ यंदन भंगोनी अनेकशा । रथी पावती मृत्यूची दशा । वाहने धांवती अष्टदिशा। रँथस्वामीविरहित. ॥ ५७ ॥ ऐसा आकांत सेनामेळीं । कोठे पसती, ‘किरीटमौळी?'। धृष्टद्युम्नादि वीरमंडळी । पार्था निकटीं मिनली. ॥५८॥ वसंतकाळीं संतप्त जन । वृक्षच्छाये होती सैलीन । तेवीं वीर सतात, नापती बोलती. ॥ ५९॥ वीरवये गांडीवपाणी । धनुर्धरां मुगुटमणी । शौर्यप्रतापें वासरमणी । वासवातुल्य विक्रमें. ॥ ६० ॥ ‘पाहें पां दृष्टी धनंजया ! । सेना विकळ यया समया । बाहुविक्रमें मर्दानी तयां । जयानंदें गौरवीं, ।। ६१ । अर्जुन वदे सक्लेशवाचा । ‘जळो संग्राम पातला कैंचा ? । शैदकर्म अधर्माच्या । पकामाजी संलग्न. ॥ ६२ ॥ राज्यलोभाचिया आशा । १. घसळीन, हालवन सोडीन. २. टाळी वाजवून. ३. वाजंत्र्यांनीं. ४. उसळले. ५. पर्व नानां येत असे. ६. हत्तीची गंडस्थळे. ७. हत्तीच्या गंडस्थळांत मोत्ये असतात, अशी समजूत आहेः-‘करींद्रजीमूतवराहशंखमत्स्याहिशुक्तयःदव जानि । मुक्ताफलानि प्रथितानि लोके तेषां तु शुक्युद्भवमेव भूरि. ॥' [कुमारसंभव, सर्ग है। टीका पहा ] ८. रिक्त असे पाठांतर. ९. अत्यंत लीन, फार आसक्त. १०. सूर्य, ११, क) चिखलांत. सांस पंख असते, त्यामुळे त्याँस वाटेल तेथे जाता येत असे. ६. हत्तीची गंडस्थळे ।।