पान:महाभारत.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ नरहरिकृत। [द्रोणपर्व तथापि तुझिया आग्रहें । सांगतों, दाटले असे हृदय । पांडवी धर्माची सोडिली सोय । केळी प्राप्त आतांची. ॥ २९ ॥ द्रोणाचार्य समरांगणीं । प्रज्वळला जैसा सहस्रकिरेणी । बाणी निवटिल्या सैन्यश्रेणी । पांचाळ सुंजय अमितृ. ॥ ३० ॥ गजाश्व रथी पदाती। मर्दानी शवें भरिली क्षिती. । विमुख वीर, न चले शक्ती । उद्विग्न वीर सर्वही. ॥ ३१ ॥ तेव्हां नाटकी श्रीकृष्णनाथें । त बोधोनी भीमसेनाते । मारोनी अश्वत्थामा गजाते । शब्द तव नामें फोडिला. ॥ ३२ ॥ ‘मारिला, मारिला, अश्वत्थामा' । चहूकडे हाचा हेमामा । ऐकोनी द्रोण, ब्राह्मणोत्तमा ! । कासावीस तव मोहें. ।। ३३ ।। सत्य मिथ्या पुसतां धर्मा । येरू वदे अश्वत्थामा । मारिला' म्हणती वार गरिमा । गज कीं नर नेणवे. ॥ ३४ ॥ असत्येंसी वर्तला धर्मराज । तेण उद्विग्न भारद्वाज । पुत्रशोकें निस्तेजतेज । धनुष्यबाण विसर्जी. ॥ ३५ ॥ योगयुक्त प्रायोपवेशनी । ऊर्ध्ववायु हरिचिंतनीं । प्राण सोडितां, विचित्र करणी । दुष्ट पार्षते केली पां. ॥ ३६॥ खङ्ग पैसोनी धांवला त्वरा । बीरी निषेध केला सैरा । अमान्य करुनी, शिखा निकरा । वामहस्ते कर्पिली. ॥ ३७॥ घाव घालोनी कठनाळीं । प्रदीप्त शिर पाडिलें तळीं । ‘आहा'कार वीरमंडळीं । पार्थ दुःखें दुखावला. ॥ ३८ ॥ ऐकतक्षणी क्रोधभरणी । द्रौणी प्रज्वळला युगांत वन्ही । जेवीं दक्षिायणी देह हवनीं । दाहतां, शंभु ज्यापरी. ॥ ३९ ॥ मदरघसणी वासुकी गरळा । वमी, तैश मुखीं अग्निज्वाळा । संतापताप हृदयकमळा। विषापरी कडाडी.॥४०॥ खदिरांगार ज्वलितनयन ।तप्त शरीर जैसा ज्वलन । किरण रोम थरकती त्राणे । स्फुरित वोष्ठ सरोजें. ॥ ४१ ।। क्रोधे प्रदीप्त श्राद्धदेवो । तैसा सव गमला भावो । फोडिता जाहला मुखीं टाहो । काळमेघासारिखा. ॥ ४२ ॥ म्हणे, ‘अपांडवी धरित्री । करीन आजी, पाहा नेत्री । नारायणास्त्र विधियुक्त मंत्रीं । जपोनी आतां सोडितों. ॥ ४३ ॥ यया अस्त्रास निवारण । ब्रह्मांडगेहीं नाहीं जाण । पाथ देखतां धृष्टद्युम्न । काळधामा व • गडबड, ६. त्याग १ नीट आहे की १. कलियुग. २. सूर्य. ३: युद्धापासून पराङ्मुख. ४. सल्ला, मसलत. ५. गडबड. ६' करी, टाकी. ७. अन्न पाणी वज्र्य करून मरणास तयार असा. ८. तरवारीची धार नीट आ नाही, हे पाहण्यासाठी तीवरून हात फिरवून. ९. शेंडी. १०.डाव्या हाताने. ११. दुःख १२. दक्षकन्या (पार्वती). दक्षाने पार्वतीचा अपमान केला म्हणून तिने यज्ञकुंडांत उडा आपणांस जाळून घेतले, अशी कथा आहे. १३. मंदर पर्वतावर घासल्यामुळे. समुद्रमंथन मंदरपर्वत रवी (मंथनदंड) झाला होता व वासुकि दोरी झाला होता-अशी कथा आहे. १४ १५. अर्जुनाच्या समोर, अर्जुन पाहात असतां. ११. दु:खित झाला. कुडांत उडी टाकून समुद्रमंथनसमयीं