पान:महाभारत.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व ३७२ नरहरिकृत पुढे द्रौणीचा प्रलाप घोर । श्रोते सज्जनीं ऐकिजे. ॥ १६३ ॥ श्रीगुरुभीमराजप्रसादें । नरहर मोरेश्वर आनंदें । भारतकथा प्राकृतप्रबंधे । संतचरणी निरोपी ।। १६४ ॥ अध्याय चौतिसावा. संजय वदे, ‘प्रज्ञाचक्षु ! । द्रोण कौरवां छायावृक्षु । संग्रामवाता जाला भक्षु । सेनातृण डळमळी. ॥१॥ दुर्योधनजीवित्वआशा । वश्य जाली काळ पुरुषा । विगतमानसे दशदिशा । धांडोळीत स्वदुःखें. ।। २ ।। अश्रुपूर्ण गळितनयन । वदनचंद्रमा म्लानता पूर्ण । कायांबरीं तमाचे ठाणे । विकळ गात्रा दीनता. ॥ ३ ॥ कल्पांत काळ भावीत मनीं । मही बुडाली मानी जीवनी ।। विश्वासहित कौरवधुणी । जाली म्हणे निश्चयें. ॥ ४ ॥ शरीप्राय तळमळी जळीं । शुष्क प्रवालँअधरवेली । कंठ दाटला शोकानळीं । जिव्हे बैबळ निःशब्दें. ॥ ५॥ विकेळमान समस्त सेना । भयें पीडित कालवे रणा । जैसी नौका भंगितां जीवना । तेवीं आकांत सवते. ॥ ६ ॥ कीं राजदुहिता भूपकांता । कांतअंत अंतके करितां । शोकावर्ती जनाची अवस्था । तेवी वाहिनी साचिंत. ॥ ७ ॥ किलकिलाट घोर शब्द । कालवे चमू इतस्तता वि शद । देखोनी वीरांचे लोटले वृद। चहूकडुनी सुसाटें. ॥ ८॥ मद्रराज मा लवाधिप । सवें वीर प्रतापी भूप । पातला जेथ गुरुवर्यदीप । मावळला ठाई. ॥ ९॥ संशप्तक शेष शूर । सह सुशर्मा राजेश्वर । समागमें वीर " भीर । मिनले मिठीं वीरांच्या. ॥ १० ॥ वृषसेन कर्णनंदन । अयुत रथ प्रतापवान । तीन सहस्र नगि प्रभिन । अश्वसदी समवेत. ॥ ११ ॥ येवोना मिनला सेनामेळीं । जेथे द्रोण पडला तळीं । सौबळ शकुनी वीरमंडळी । सुमार पातला. ॥ १२ ॥ वीर कृतवर्मा भोजराज । संगें वीरांचे अमित पुज। पावला जेथे भारद्वाज । काळमंचकीं पहुडला. ॥ १३ ॥ द्रोणतनय प्रताप १. कथन करी. ह्या अध्यायाचे द्रोणाचार्यनिधन' असे नांव आहे. २: " अध्यायांत मूळांतील १९३-१९९ अध्यायांचा सारांश आला आहे. ३. उदासीन है।" ४. धुंडाळीत, भटकते. ५. शरीररूपी आकाशांत. ६. मासोळीप्रमाणे. ७. पविळ्यात (रक्तवर्ण) अधर (ओंठ) ह्याच वेली(लता). ८. बोबडी, ढिलेपणा, मांद्य. ९. विकळ मानस र सेना' असा अन्य पाठ. १०. पाण्यांत. ११. भ्रताराचा अंत(मरण). १२. यम. १३: सस १४. युद्धांत मरून जे बाकी राहिले ते. १५. हत्ती. १६. सादी=घोड्यावर बसणारा.१७• मारा कठिण आहे असा. १८. समुदाय, १९. मरणरूपी पलंगावर. २०. निजला.