पान:महाभारत.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० नरहरिकृत [द्रोणपर्व निधना तुझ्या वोपिलें, ॥ १३० ॥ ते टाळितां टळे केवीं ? । विश्वाधिपत्य तुझ्या ठाँई। सांडुनी संशयाची गोवी । ब्रह्मीं धरीं भावना. ॥ १३१ ॥ पुत्रनिधने व्याकुळ चित्तीं । पुसों गेलासी धर्माप्रती । भविष्य जाणोनी यदुपती। प्रेरी धर्मा अनृतं. ॥ १३२ ॥ याचा संशय न धरीं मनीं । अक्षई द्रौणि जंववरी धरणी । युद्ध सांडुनी रणांगणीं । ब्रह्मलोक वसविजे. ॥ १३३ ।। धर्म जेथे वसे हरी । जय तेथे कैंची हारी ? । जाणोनी; सांडी क्रोधलहरी । अवध्य पांडव सर्वथा.' ॥ १३४ ॥ ऐसें वदोनी अंतर्धान । पावतां, पातला भीमसेन । म्हणे, ‘गुरुवर्या ! निष्ठुर मन । न करीं आम्हां बाळकां. ॥ १३५॥ अहिंसा धर्म ब्राह्मणोत्तमा । नेमोनी गेला देव ब्रह्मा । ते सांडुनी स्वधर्ममहिमा । क्षात्रधर्मा सेविलें. ॥ १३६ ॥ म्लेंच्छजनाची रोहटी । सेना मर्दिसी हटोहटीं । अधर्मकर्मे कॅल्याणतुटी । योग्य नव्हे; गुरुवर्या ! ॥ १३७ । सत्य सुकृत अक्षई प्राप्ती । अधर्माची विगतगती । जाणतां, भ्रष्ट न करीं मती । शाश्वतपदी स्थिरावें. ॥ १३८ । आधींच कोमल ब्रह्महृदय । त्यावरी ऋषीचा अनुग्रह । भीमवचने सदयतावर्य । पश्चात्ताप पावला. ॥ १३९ ॥ जैसा नारद समुद्रमथनीं । देवदैत्य झगटतां रणीं । प्रेबोधोनी बळी वचनी । माघारिला ज्यापरी. ॥ १४० ॥ तयापरी भारद्वाज । पर्णोनियां शांतिभाज । विसर्जानी शर्यतेज । निष्काम ब्रह्मीं भावना. ॥ १४१ ॥ पाहत असतां उभय सेना । बोलता जाला दुर्योधना। सहित कृपा वीर कर्ण । सव देखता उत्साहे. ॥ १४२ ॥ तुज्ञनिमित्त संग्राम हव । अस्वप्रयोग केले सर्व । परी कल्याणरूप पांडव । श्रीकृष्णरूप अक्षई. ॥ १४३ ॥ आतां जातसे मोक्षपदा । आठव चित्तीं असों द्या सदा.'। ऐसे वदोनी कल्याणकदा । रथावरुनी उतरला. ॥ १४४ ॥ विसर्जुनी धनुष्यबाण । पूर्वाभिमुख पद्मासन । प्राणायाम निष्काम मन । ऊर्ध्ववायु आकर्षी. ॥ १४५ ॥ ॐमित्येकाक्षरं ब्रह्म' । व्याहृति इंद्रियोत्तम । देवाधिदेव पुरुषोत्तम । स्मरे अक्षर प्रभूतें. ॥ १४६ ॥ एकाग्र निश्चळ मन । स्वस्वरूपीं अनुसंधान । तदाकार भावना पूर्ण । चित्त चैतन्य निमग्न. ॥ १४७ ॥ सभोंवती वीरमांदी । समक्ष श्रीकृष्ण कृपानिधी । अपार १. सर्व विश्व तुझ्यांतच आहे, तू विश्वस्वामी म्ह० विश्वस्वरूपी आहेस. २. चिरंजीव३. विजय (पक्षी) अर्जुन. ४. पराजय. ५. वागणूक, रीत. ६. अकल्याण, हिताची तूट (वा) कमतरता).७. आपण स्थिर व्हावे, मोक्षपद प्राप्त करून घ्यावे. ८. ब्राह्मणाचे (द्रोणाचें) अंतःकरण: ९• उपदेश करून. (मुक्तेश्वरकृत आदिपर्व अ० ४ पहा). १०. उच्चार, वाग्व्यापार,