पान:महाभारत.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ नरहरिकृत [द्रोणपर्व वर्या । शोकार्णवीं सुदलें.' ॥ १०० ॥ ऐकतक्षणीं विकळ चित्तीं । स्तब्ध, न लवी पातिया पातीं । सभोंवतीं लक्षितां क्षिती । ‘मारिला' हीची गर्जना. ॥ १०१ ॥ भ्रमावर्ती पडिली बुद्धी । चिरंजीवे हे न स्मरे हृदीं । श्रीकृष्णमायेचिये मॅहोदधीं । निमग्न जाहला सशंक. ॥ १०२ ॥ विचार विवरी अंत यामी । “चंद्र सूर्य अक्षई व्योमी । तंववर द्रौणि पराक्रमी । असिजे क्षेम | निश्चयें. ॥ १०३ ॥ वीर वदती ऐसिया पुंजा । जावोनी पुसिजे धर्मराजा' । ऐसे कल्पोनी; माहाराजा! । पांडवाप्रती पातला. ॥ १०४ ।। वीर मिनले धर्मनिकटीं । सहित अर्जुन जंगजेटी । धर्मासी वदती वीर गोष्टी । उचिंतानुचित वर्तिजे. ॥ १०५ ॥ जेवीं इंद्रजितजीवेनी नेम । सुलोचनेसी करितां राम ।। वनरवाहिनीं भयविभ्रम । हनुमान राघवा निषेधी. ॥ १०६ ॥ तेवीं भीम सांडुनी धर्मभिडे । “सत्य ठेविजे एकीकडे । जेणें समस्तां क्षेम जोडे । तेची धर्मी प्रतिष्ठा. ॥ १०७ ॥ असत्य वदोनी पुढिलांचे हित । करितां, जोडे । सुकृते । सयें घडे पराचा घात । याहुनी पाप असेना.' ॥ १०८ ॥ मृदुत्व बोले रमारंग । “सत्य असत्य विविध मार्ग । भविष्यानुरूप वंदिजे सांग । प्रसंगोचित, धर्मज्ञा! ॥ १०९ ॥ शास्त्रमथितार्थ ठाउका तुज । सांगणे हेची रहस्यगुज । विश्वहिताचे करिजे काज । ब्रह्मवाणी ऐसीची. ॥ ११० ॥ संकटावर्ती धर्मराज । जवळी पातला भारद्वाज । येरें वंदोनी पादांबुज । म्हण “आज्ञा निरोपा.' ॥ १११ । गुरुवर्य वदे, “राजसत्तमा ! । मारिला म्हणता अश्वत्थामा । सत्य मिथ्या हे वाङ्नेमा । प्रकट करीं सत्यत्वें.' ॥ ११२॥ कासावीस धर्म, पार्थिवा! । म्हणे, ‘नरो वा कुंजरो वा। संशयावर्ती असे गोवा । १. घातलें, टाकिलें. २. अश्वत्थामा चिरंजीव (मृत्युरहित) आहे ही गोष्ट. अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृप आणि परशुराम हे सातजण चिरंजीव आहेत, अशी समजूत आहे. ३. महासागरांत. मोहोदधीं' असा अन्य पाठ. ४. संशययुक्त होत्साता. ५. खात्र पूर्वक तो सुरक्षित असलाच पाहिजे असा भाव. ६. जमावानें, एक जुटीनें. ज्ज्येष्ठ, जगांत श्रेष्ठ, ८. योग्यायोग्य. ९. इंद्रजितास पुन्हा सजीव करून, त्याची पतिव्रता ला ७. जग जी सुलोचना, तिच्या स्वाधीन त्यास करावे, अशी रामाची फार इच्छा होती, परंतु हनुमान सर्व योद्ध्यांनी रामाचा फार निषेध केल्यामुळे रामाने इंद्रजितास जीवंत केले नाही, अशी कथा आहे. १०. वानरसैन्यांत. ११. विभ्रम भ्रांति, १२. मूळांत असे आहे:-अनृतं जीवितस्याय वदन्न स्पृश्यतेऽनृतैः ॥ ४८ ॥ कामिनीषु विवाहेषु गवां भक्ते तथैव च । ब्राह्मणाभ्युपपत्ता अनृते नास्ति पातकम् ॥ ४९ ॥' (अध्याय १९१) १३. पुढे प्राप्त होणा-या परिणामानु" १४.मान्य करावें. “वहिजे' । TIT॥