पान:महाभारत.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६६ नरहरिकृत [द्रोणपर्व गुरु सावध अभीत चित्तीं । तृणप्राय खंडिली. ॥ ६४ ॥ शक्तिच्छेद देखोनी दृष्टी । रोपें खङ्ग कवळिलें मुष्टी । शतचंद्र ढाल घनपुटी । बाहुमेळीं सूदली. ॥ ६५ ॥ उडी टाकोनियां त्राणे । धांविला जैसा आमिषा श्येन । थरकसरक। मंडळे घनें । विचित्राकार दावितू. ॥ ६६ ।। भारद्वाज जे जे शर । सोडी, ते । ते वरच्या वर । खंडुनी टाकी राजेश्वर । जेवीं गरुड सपते. ॥ ६७ ।। वीरमंडळी पूजिती तया । म्हणती, ‘लाघव हस्तक्रिया । निश्चयें वधील द्रोणाचार्या।। रंग आजी दिसताहे.' ॥ ६८ ॥ ऐसें वीर वदतां शब्दीं । येरू पातला यंदनसंधी । सेनाश्व वधोनियां आधीं । घाव उचली द्रोणाते. ॥ ६९ ॥ धनुर्धरवर्य द्रोणाचार्य । शर सोडिला जैसा सूर्य । छेदोनी खङ्ग, भेदोनी हृदय, ।। दाहा पांड सारिला. ॥ ७० ॥ पाहोनी वीर लोटले पुढे । पार्षत जाहला रथारूढ । सकळिकीं शरांची जुबाडे । मोकळिली एकदा. ॥ ७१ ॥ गुरुवर्य प्रतापनिधी । वीरवीर खिळिले युद्धी । विकळ देखोनी वीरमांदी । शिनिप्रवीर पावला. ॥ ७२ ॥ वर्षोनियां बाणसमूहो । शरीं ॐादिला गुरुदेहो । रोष प्रदीप्त कैंपीनाहो । शरांच्या कोटी मोकळी. ॥ ७३ ॥ सरसराटें उसळती शर । प्रौढी खंडिती वरच्या वर । युद्ध माजलें घोरांदर । शंभुशंबरासारिखें. ॥ ७४ । देखोनी लोटिला युधिष्ठिर । माद्रीनंदन वृकोदर । वेष्टोनियां शिनिप्रवीर । सेनामेळीं थोकले. ।। ७५ ।। पांडववीर लोटतां समरीं । पातल्या कौरवांच्या हारी । माजली शरांची महामारी । महाधुमाळी क्षयाते. ॥ ७६ ॥ परस्परां ताडिती शस्त्रीं । एकमेकां भेदिती गात्रीं । छिन्न होवोनी पडती धात्रीं। धांवती रोषे तैसेची. ॥ ७७ ॥ धृष्टद्युम्न पांचाळ पाठी । रोमें मिनला द्रोणेहटीं । वर्षती शरांच्या तीव्र थाटी । प्राकृट्वृष्टीसारख्या. ॥ ७८ ॥ ‘ध्या' “घ्या' शब्द फोडिती मुखें । वर्षती रागें शर तिखे । सरसराटी इषंचीं विखें । व्योममंडळा व्यापिती. ॥ ७९ ॥ उकावोनी क्षणक्षणा । पार्षत धांवे द्रोणनिधना । जैसा सिंह मत्त वारणा । लक्षोनी रोपें उकावे. ॥ ८० ॥ विचित्र शर तीव्र धारा । वर्षाव करी रोपें निकरा । वीर पेटले महामारा । चहूकडूनी सारिखे. ॥ ८१ ॥ तया बाणांचिया जाळीं । द्रोणाचार्य लोपला तळीं । जैसा सूर्य अभ्रमंडळीं । नाहींच हो, ज्यापरी. ॥ ८२ ॥ वीरवाढ देखोनियां नयनीं । द्रोण प्रज्वळिला जैसा वन्ही । कीं तो क्षयांतीं शूळपाणी । तेवीं १. पांड=बिघ्याचा विसावा हिसा. २. ‘छेदिले असे पाठांतर. ३. कृपीपति, द्रोणाचार्य. ४. पराक्रमानें. ५. द्रोणाचार्यांबरोबर युद्ध करण्यासाठीं. ६. पर्जन्यवृष्टीसारख्या. ७. दिसेनासा होतो. ८. (पांडवपक्षीय) वीरांचा पराक्रम.