पान:महाभारत.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रोणपर्व २६४ नरहरिकृत सदा जयस्वी ! विजयीबाह्या! । कल्याणच्छाया ! पांडवा ! ॥ २९ ॥ द्रोणाचार्य क्रोधभरणी । तुळितां अतुडे दंडपाणी । कार्मुक असता तया पाणी । अजित सुरांअसुरांतें. ॥ ३० ॥ तेथे मानवाचा काय केवा ? । जितक्लमा तपस्वी बरवा । सर्वास्त्रभेदी, नरपार्थिवा ! । विद्या कळा सर्वही. ॥ ३१ ॥ हा आपुल्या दुःखचित्ते । धनुष्य सोडील जरी हात । तरीच मरण, येव्हवीं मृत्ये । वीरां सकळां जाण पां. ॥ ३२ ॥ यानिमित्त एक युक्ती । सादर सव धरिजे चित्तीं । चतुर्थी सेना करोनी निगुती । युद्धालागीं तगटिजे. ॥ ३३ ॥ गजानीका विक्रमी भीम । रिघोनी, अश्वत्थामा गजोत्तम । मर्दानी, गजिजे वाङनेम । अश्वत्थामा मारिलाः ॥ ३४ ॥ सकळांमुखी हेची मात । विस्तारिजे घोपें बहुत । ऐकोनी द्रोण भ्रमितचित्त । जाकळेल रणरंगीं. ॥ ३५ ॥ सत्य मिथ्या पुसतां धमा डेंची अवघड वाटे आम्हां । असो; तेही संपादणी नेमा । करिजेल प्रत ॥ ३६॥ माझे मायेचे अतक्र्यवृद्धी । तेही कार्य पावेल सिद्धी.' । ऐस १ कृपानिधी । हर्षित भीम मानसीं. ॥ ३७॥ चत्वार वीर करुनी झुंजा । वा मिनले, महाराजा ! । पांचाळ घालोनियां पैजा । द्रोणाचार्या धडकल ॥ ३८ ॥ सृजय, पांचाळ, मत्स्यसेना, । वीरनायक लोटले द्रोणा । शर धारीं वर्षाव घना-। प्राय केला सर्वत्रीं. ॥ ३९॥ न गणोनी त्यांच्या शरा माळा । क्रोधे प्रज्वळला अग्निज्वाळा । आकर्ण कामुक वाहोनी बळा । बाण पंक्ती सोडिल्या. ॥ ४० ॥ शरांमागें शरांचा संघ । लाविला जैसा गंगावधि चतुरंग सेना विव्हलांग । भयार्दित कालवे. ॥ ४१ ॥ भूषणे भूचि भुजा सरळा । रुचिर मौळे चंद्रमाकळा । खंडनी पडती मही तळा विकीर्ण तनू अपार. ॥ ४२ ॥ शैलाकार गज उद्भट । खंडनी पडती मही दट । वातवेग अश्वसुभट । तुंगतुंग रिचवती. ॥४३॥ रुधिरमांसाचा कर्दम । रणी दाटला निःसीम सीम । वीरां सकळां प्राप्त भ्रमें । किलाकिलाट शब्दा ॥४४॥ माधवमासी प्रदीप्त सूर्य । तैसा प्रज्वळला दोणाचार्य । पांचाळर वीरवर्य । वीस सहस्र मर्दिले. ॥ ४५ ॥ सहस्र अर्ध मत्स्यरथी । वोपिले दु वर चाळरथी १. यमासारखा वाटे. २. सुखदुःखचित्ते' असा अन्यपाठ. ३. ही ऑवी रा. सरदेश यांच्या प्रतीत मात्र आहे. ४. कळवळेल, मोह पावेल. ५. ढोंग, बतावणी, कार्य साथ युक्ति. ६. 'चंद्रमाकीळा' असे पाठांतर. ७. पसरलेली, अस्ताव्यस्त, ८, मोठे, भयंकर." असा पाठभेद. १०. चैत्रवैशाखांत. ११. पांचशे. कार्य साधण्याची भयकर. ९. श्रम'