पान:महाभारत.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ अध्याय महाभारत. जितक्लमा, अतर्यकरणी, । मंत्रदेवता जोडूनी पाणी । जिव्हेपुढे वोळगती. ॥ ५८ ॥ पार्थ प्रतापाचा तीव्र माळा । ज्याचेनि गुरुत्वें लोकीं कीळा । तुझ्या जयीं नरशार्दूळा! । चिंता केवीं मानसीं ? ॥ ५९ ॥ तैसाची द्रोण प्रतापरुद्र, । क्षयातीत, विद्यासमुद्र, । फाल्गुनासमान वीरभद्र । तेजें अग्नि दूसरा. ॥ ६० ॥ तुझ्या हिती अनन्यमती । वीरां सकळां लावील ख्याती । पांडववंश किंचित् भूपती ! । वींचतां दिसे अनुमान. ॥ ६१ ॥ कृतवर्मा यादवकीर । महाप्रतापी वैश्वानर । युद्धप्रवीण समरधीर । कृतांत बँाहीं आकळी. ॥ ६२ ॥ शारद्वत शारदेसरी । चतुर चतुरा मंत्रोद्धारी । ज्यांचेनि प्रताप काळ समरीं । पाय न घाली पुढारा. ॥ ६३ ।। सोमदंत दंतीपाडे । नाहींच करी सेनाझाडें । कुशळ युद्धी वाडेंकोडे । अग्निसेवनीं अक्षयी. ॥ ६४ ॥ भगदत्तराज भार्गवसरी । प्रभिन द्विप समान गिरी । ज्याच्या बळाची महा। थोरी । भीमादि वीर दचकती. ।। ६५ ।। भूप सँधैव सैंधवगुणी । ज्यावीण सेना भासे अळणी । त्रिगर्त सौवीर तापकिरणी । कैकेयबंधुपंचक. ॥ ६६ ॥ विंदानुविंद महाराजा! । तव अनुज प्रतापध्वजा । सौर्बळादि वीर भूभुजा ! । संशप्तक प्रतापी. ॥ ६७ ॥ अलंबुवीर राक्षसाधिप । ज्याचे मायेचें न कळे माप । मम तनय प्रतापदीप । वृषसेन बळियाढा. ॥ ६८ ॥ यांहीवेगळे भूप दक्षा! । वीर बलिष्ठ तुझिया पक्षा । कुँलिशपाणी पावेल शिक्षा । इतरां पाड कायसा ? ।। ६९ ॥ तूही प्रवीण कुशळकुशळा ! । अस्त्रसाधनी प्रतापकीळा । नागायुत प्रचंडबळा । धर्म दरारा वाहे पैं. ॥ ७० ॥ मीहि राजया चूडा १. ज्याने श्रमास जिंकले आहे तो, ज्यास कधीं थकवा येत नाही असा. कुम=ग्लानि, थकवा, श्रम. २. सेवा करावयास तयार असती. ३. निष्ठा, दृढनिश्चय. ४. वांचणे संशयित आहे, वाचेल असा भरंवसा येत नाहीं. ५. हा नहुषकुलोत्पन्न हृदिकराजाचा पुत्र. यास बळेरामानें एक अक्षौहिणी सैन्यासह दुर्योधनाचे साहाय्यास दिले होते. ६. भुजांनीं. ७. कृपाचार्य, ८. हत्तीसारखा (अत्यंत बलवान्), ९. आवडीनें, कौतुकानें. १०. परशुरामासारखा. ११. ज्याच्या गंडस्थळांतून मदाचा स्राव होत आहे असा हत्ती. १२. पर्वतासारखा. १३. सिंधदेशाचा राजा (जयद्रथ). १४. वारूसारखा चपळ. पुढील चरणांत अळणी' शब्द आला आहे. तेव्हां 'संधव' शब्दाच्या ‘घोडा' व 'मीठ' या दोन्ही अथवर कटाक्ष दिसतो. १५. नीरस, कमजोर, १६. प्रतापसूर्य. १७. धाकटा भाऊ (दु:शासन). १८. शकुनी. १९. राजा (दयधना), २०. संशप्तक=मी युद्धांत अमुक वीरास मारीन, न मारीन तर मला रौरवगति प्राप्त होवो. अशी जो शपथ घेतो तो. त्रिगर्तराजाचे सुशर्मा, सुरथ, सुधनु, सुबाहु व सुधन्वा-असे जे पांच पुत्र होते त्यांस संशप्तक असे साधारण नांव आहे. २१. जटासुराचा पुत्र. २ प्रतापी. २३. वज्रपाणी (इंद्र), २४. यमधर्म, ,,, जटासुराचा पुत्र. २२ बलवान्,