पान:महाभारत.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २६२ नरहरिकृत जीवनीं । कीं त्रिविधंतापें पोळितां प्राणी । निवे संगी संद्वाक्यें; ॥ १२१ ॥ तयापरी अस्त्रप्रयोग । विलया गेला समूळ सांग । प्रसन्नमान वीरभंग ।। झेपावले युद्धपद्मा. ॥ १२२ ॥ भीमराजकृपेचा वर । लाहोन नरहर मोरेश्वर । श्रोतेसज्जनां पैाहुणेर । कथामृताचा वोगॅरी. ॥ १२३ ।। अध्याय तेहतिसावा. संजय वदे, ‘महाराजा ! । धृष्टद्युम्न पातला झुंजा । दुःशासने पिटोनी भुजा । तयाप्रती थडकला. ॥ १ ॥ परस्परें सोडुनी शर । पार्षतवीर प्रतापशूर । [क्रोधावेशे चावोनी अधर] । सोडी इषु निघाते. ॥ २ || क्षणामाजी अश्वसारथी । विगत केला न लगतां पातीं । कौरवगात्रे शरांच्या सिँती । विकळ केलीं क्षणार्धे. ॥ ३ ॥ विन्मुख होवोनी द्रोणानिकटीं । पातला जेथे वीरमिठी । दुर्योधन सक्रोध दृष्टी । भैकुटीगांठी लोटला. ॥ ४ ॥ सात्वत सायकी आडवा तया । होतां, कौरव क्रोधालया । पाहोनी दश बाण अप तया । महारोघे निघाते. ॥ ५॥ शिनिप्रवीर क्रोधावर्ती । मोकळी रोपें । शरांच्या पंक्ती । पांच शत कृतांतती । वरी विंशती विखारी. ॥ ६ ॥ यावरी आणीक दाहा । प्रेरुनी केला शरीरदाहा । झुरुप्र हस्ते नाराच महा। धनु हातींचे खंडिलें. ॥ ७ ॥ दुर्योधने अन्य कार्मुक । सज्जोनी सोडिले बाण। सतिख । बुजोनी काढिला यदुनायक । रोषावर्ती निघाते. ॥ ८ ॥ सात्यकी वीरपंचानन । बाणी बाण निवारून । शिळाधौत शर तीक्ष्ण । रुक्म पिसारे साजिरे. ॥ ९॥ लघुलाघव हस्तकळा । चाप खंडूनी पाडिलें तळा । बाण भेदिले वक्षःस्थळा । वज्रप्रहारांसारिखे. ॥ १० ॥ तेणें दाटली तया वृर्मी । पडिला क्षीण स्पंदनसद्मी । वीर धांवले पराक्रमी । कर्णादिक धनुर्वाड. ॥ ११ ॥ पाहोनी शरांचा उमाळा । भीम लोटला वीरमेळा । उभय च १. ताप तीन प्रकारचे आहेत:-आधिदैविक (देवतांच्या क्षोभापासून होणाराः असा, वीज पडणे); आध्यात्मिक (मनाच्या क्षोभापासून किंवा शरीराच्या रोगापासून होणारा. न. ताप) आणि आधिभौतिक (पंचमहाभूतांच्या क्षोभापासून होणारा; जसा-अ . २. सज्जनाच्या संगतीने व उपदेशाने. ३. पाहुणचार, आदरसत्कार. ४. वाढी. ह्या अध्यायाचे पंचमदिवसयट्स' असे नांव आहे. ५. ह्यात मूळांतील १८९-१९२ अध्यायांचा सारांश आला आहे. ६. युद्धास. ७. समृद्धीन. ८. याद्धयाची भाड (दाटी), ९. भवयांना आट्या घालून. १०. यमाचा सुद्धा नाश करणारे. ‘कृतांतयाती' असा पाठभेद, ; विशेष. १३. मूच्छा. १४. तडफ, धडका. =णारे,‘कृतांतयाती' असा पाठभेद. ११. आंगाची आग. १२. बाण