पान:महाभारत.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० नरहरिकृत [द्रोणपर्व सागर सागरा लोटले । ना ते गिरीतें गिरी आंदोळले । वज्र वज्रा ज्यापरी; ॥ ८७ ॥ कीं काळकुटासी काळकूट । ना ते, काळ काळासी अदट । की तक्षकासी तक्षक एकवट । तेवीं युद्धा मिनले. ॥ ८८ ॥ उभय विद्येचे अर्णव । धनुर्धारी शूर लाघव । अस्त्रक्रिया शरगौरव । देखतां आश्चर्य देवांतें. ।। ८९॥ उभय स्पंदनीं विराजमान । जाणों जयश्रीचे शोभायतन । ध्वजापताकीं फांकती किरण । सूर्यरश्मीसारखे. ॥ ९० ॥ वरी आरूढे महामती । जाणों वासव द्विधा व्यक्ती । रुक्मकार्मुक विशाळ हातीं । शिवचापासमान. ॥ ९१ ॥ हेमपुंखी शर तीक्ष्ण । जाणों तक्षकाचे तीव्र दशन । सरसावोनी शरासन । बाणः कोटी सोडिल्या. ॥ ९२ ॥ विद्यापीठ द्रोणराज गुरू । शिष्यत्वरूपें पार्थ श्रीअगारू । दीपापासाव दीपपसरू । तेजा वाढ सारिखी. ॥ ९३ ।। सिंहशावक पैंतापआगळा । उपजतां खंडी गजांच्या मौळा । तेवीं अर्जुन शूरवकळा । तेजागळा तिहीं लोकीं. ॥ ९४ ।। त्र्यंबंकापासाव उद्भव गंगा । कीर्तिमान दुरितभंगा । तेवीं पार्थ विक्रमसुभगा । वाटे क्षत्रियां सतें. ॥९५|| गुरुशिष्याचिये कदनीं । कंपमान होय धरणी । खेचरीमुद्रा वीरनयनीं । आश्चर्यजळीं निमग्न. ॥ ९६ ।। उभय वीर रोषावर्ती । सोडिते जाहले शरांच्या पंक्ती । खर्व, अखर्व, पद्म, गणती । कोटीच्या कोटी अमोज्य. ॥ ९७ ॥ धरा आकाश तिहीं शरीं । भरुनी काढिल्या दिशा चारी । ठायातळीं रंजनीवैरी ।। नाहींच जाहला ते काळीं. ॥ ९८ ॥ शरांमागें शरांचे पुंज । लखलखित निघती सतेज । खंड नोहे, उभयां फुज । शूरत्वाचा आपुल्या. ॥ ९९ ॥ सरसराट कुंजती चापें । शर उसळती फणींद्रतापें । घेतां सोडितां गणणे मोपें । कुशळकुशळां लक्षेना. ॥ १०० ॥ मंडळाकार गरगराटी । धनुष्य फिरती बारावाटी । बाण सरकती वमित 'खोटी । विषाचिया झरझरा.॥१०१॥ परस्परें खंडी प्रौढी । अधिकाधिक वर्षे वाढी । विद्यालाघव कडोविकडी ।। कोण्ही कोण्हा ने मेचे. ॥ १०२ ॥ हर्षयुक्त मानसीं दोण । यूजी अंतरी श्वेतवाहन । 'मजहूनी विशेष कळानिपुण । रक्षो हरी ययाते'. ॥ १०३ ।। | १• हापटले, आदळले. २. बुद्धीचे माहेरघर. ३. प्रतापाने जास्त. ४ ८ भिकाजवळील त्र्यंबकेश्वर नांवाच्या गांवीं. ६. योगशास्त्रांतील समाधीचा एक प्रकार, ७. असंख्य ८. नाअगण्य. ८. सूर्य. ९. अभिमान, गर्व, १०, ‘मापे' असे पाठांतर, ११, लगडी, गोळे. १२. न आटोपे, न आंवरे, मेचणे=कुंठित गति होऊन माघार घेणे, स्तब्ध राहणे, आटोपणे. १३. “शिष्यादिच्छत्पराजयम्' या न्यायाने गुरूवर शिष्याने ताण केलेली पाहून गुरूस आनंद वाटणे साहाजिक आहे.