पान:महाभारत.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ अध्याय महाभारत. २५९ ॥ ६९ ॥ येरू निमग्न क्रोधभरें । बाण सोडिले क्रोधे निकरें । सहदेव सावध लघुकरें । शरीं शर वाहिले. ॥ ७० ॥ तेणें तया क्रोधभरणी । सोडिता जाहला इषंच्या श्रेणी । माद्रेय वीरमुकुटमणी । सोडी शर निघाते. ॥ ७१ ॥ निवारूनियां शरधारा । सारथी केला बाणीं चुरा । अश्व ताडिती मोकळी वैरा । सैरा रणीं उसळले. ॥ ७२ ॥ विन्मुख वीर रणांगणीं । कर्ण धांवला क्रोधभरणी । रथ लोटुनी गंदापाणी । तयाप्रती थडकला. ॥ ७३ ॥ देखोनी भीमसेन अग्रता । सोडिल्या तीव्र बाणचलथा । तळीं बुजोनी पांडुसुता । 84 आंगींचे भेदिले. ॥ ७४ ॥ तेणें वृकोदर क्रोधावर्ती । कर्णा ताडिल्या शरांच्या पंक्ती । संग्राम जाहला उभयांप्रती । देवदैत्यांसारिखा. ॥ ७५ ॥ होवे वीर क्रोधानळीं । फुफाटती वैषभकीळीं । येरयेरांते बाणजाळीं । ताडिती प्रौढिप्रतापें. ॥ ७६ ॥ अद्भुत युद्ध तयां वीरां । होते जाहलें तीव्र निकरा । भने शरीर कांबरा। प्राय भासे वीरांतें. ॥ ७७ ॥ संतप्तमान वृकोदरें । गदा झोंकिली क्रोधभरें । कर्णस्यंदन चकचूर । होवोनी गेला तात्काळीं. ०८॥ अन्य रथीं वैळंघोनी कर्ण । शरीं ताडिला भीमसेन । येरू होवोनी रोषापन । गुंर्वी गदा मोकळी. ॥ ७९ ॥ रविसुते लक्षोनी नयनीं । स्वगदा रिली रोषभरणी । परस्परें धडकोनी झणी । निवोनी तळा आतल्या. ॥८०॥ राधेय वीर क्रोधानळीं । मोकळल्या विषाच्या भाली । रक्त पीत विचित्र कीळी । वृश्चिकविषासारिख्या. ॥ ८१ ॥ रुक्मपिसारे, ज्वलित धारा, । कर्दळीपत्राचा उभारा । जाणों दामिनी क्षुधातुरा । भक्षावया पातल्या. ॥ ८२ ॥ धडकोनियां सिंह बाणीं । सहित अश्वरथाची धुणी । करितां, विरथी गंदापाणी । धरेवरी आतला. ॥ ८३ ॥ शरामागे शरांची भरणी । उच्छ्वास टाकों नेदी वदनीं । इषु शिरकतां गात्रस्थानीं । वृक्षापरी डळमळी. ॥ ८४ ॥ क्षतांकित रुधिरधारा । स्थिर अभीत रेणगव्हरा । नकुळे प्रेरुनी रथ पुढारा । वरी घेतला पांडव ॥ ५ ॥ चंद्रचूड कैलासगिरी । वळंघे, तैसा भीम वरी. । येरीकडे पार्थ सभरी । दोणाचार्या धडकला. ॥ ८६ ॥ जैसे सूर्य सूर्यासी थडकले । कीं | ;, इस्तचापल्याने. २. ‘ताडितां' असे पाठांतर. ३. रथाचा पुढील भाग. ४. ज्याच्या हातांत गदा आहे अशा । - गदा आहे अशा भीमापाशी. ५. कवच, चिलखत. ६. बैलाच्या डुरकण्यानें, बैलाच्या दुरकीप्रमाणे. ७. आरक्त आकाशासारखे. ८. चढून, बसून. ९. मोठी. १०. गदा शांत हो. न ११. 'विशाळ भाली' असा अन्यपाठ, १२. उभारणी, ऐट, डोल. १३. नाश, १४, १५. श्वासोच्छास, दम, उसासा. १६. रणरूपी गुहेत. १७. शंकर, १८, चढे ।