पान:महाभारत.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ नरहरिकृत [द्रोणपर्व शोक । पाठी लाविला दैवें देख । शतपुत्रांमाजी वर्य मूर्ख । दुर्योधन आग्रही. ॥ ९४ ॥ भूत भविष्य जाणोनी क्षत्ता । वोपित सामाच्या अक्षता । न गणोनी हृदयीं केलें क्षता । आजन्म माते, बाळका ! ॥ ९५ ॥ आतां किमर्थ आठवण ? । होणार तैसें बुद्धीचे मान । भावी रेखेचे प्रमाण । टाळों पाहे कोणातें ? ।।९६॥ असो; पुढे वृत्तांत कैसा । जाला ? माते निवेद घोषा' । संजय वदे, “नरमहेशा ! । आज्ञा मान्य मस्तकीं ॥ ९७ ॥ क्षीराब्धीची स्नुषा निशीदेवी । स्वसामथ्र्ये दवडूनी रवी । तैमासनीं एकांत दिवीं । निद्रा करी पतिसंगें. ॥ ९८ । सख्या कुमुदिनी प्रसन्नवदन । खेचर विचरती आनंदमान । अरुणे जाणोनी निद्रापन्न । घाला घाली वैरत्वें. ॥ ९९ ॥ दृष्टी देखोनी गरुडाग्रजा । त्यागोनी पळाली देत्तानुजा । कांतावियोगें मंदतेजा। काळ• वंडला ते काळीं. ॥ १०० ॥ लगबगा पळतां देवी रात्री । तमवस्त्र पडतां धात्री । स्मृतिवाते उडवोनी वक्रीं । सागराच्या बुडविलें. ॥ १०१ ॥ सूर्यपक्षी आल्हादयुक्त । दिशेने दिशा भरली त्वरित । अरुणरंगी आरत्या आर्ते । वोवाळिती आदित्या. ॥ १०२ ॥ तेची ज्योती विश्वचक्षीं । भरतां जागृत जाले पक्षी । साधक सावध धर्मपक्षी । चित्तीं चिंतिती अनंता. ॥ १०३ ॥ असो; होतां अरुणोदयो । निघोनी गेला निद्रावायो । जागृती पावला सैन्यसमुदायो । उदित वीर संग्रामा. ॥ १०४ ॥ तो युद्धरस चतुर चतुरीं । पुढां सेविजे कर्णोदरीं । नरहरमोरेश्वरवाग्वल्लरी । वदे भीमराजप्रसादें. ॥ १०५ ॥ अध्याय बत्तिसावा. संजय वदे, ‘कुभिनीपाळा! । अरुण पावतां उदयाचळा । अग्रता । पंच उषःकाळा । महा वीर चेले. ॥ १ ॥ अनुष्टप स्वधर्मकर्मा । सारुना लोटले संग्रामा । उभय वीर रोषगरिमा । येरवेरा धडकले. ॥ २ ॥ चतुर चमुची महा दाटी । गजाश्वपती रथाच्या थाटी । वर्षते जाहले शराच्या काटा | १. विदुर. २. चंद्र हा समुद्रांतून उत्पन्न झाला म्हणत समद हा त्याचा बाप व रात्र (चंद्राचा पत्नी) ही समुद्राची सून होय. ३. अंधकाररूपी आसनावर. ४. ‘त्वरेनें' असा आवा' ५. दत्ताचा धाकटा भाऊ जो चंद्र, त्यास. दत्त, चंद्र व दवसा हे अत्रिमुनीचे मु'". आई अनसूया. ६. स्वर्गात, आकाशांत. ७. ह्या अध्यायास ‘चतुर्थदीन-रात्रियुद्धसमाप्ति आहे. ८. ह्या अध्यायात मूळांतील १८५-१८८ अध्यायांचा सारांश आला आहे. ९. चेतनायुक्त झाले, जागे झाले. १०. थोडक्यांत, संक्षिप्त रीतीने. ११. मोठ्या रागाने.