पान:महाभारत.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ [द्रोणपर्व नरहरिकृत। वीरमांदी । मर्दोनियां खंडीं पार्थ आधीं । सरते करीं जगत्रयीं. ॥ ६० ॥ ऐकोनी दुर्योधनाच्या शब्दा । गुरुवर्य द्रोण गदगदा । हाँसोनी वदे, ‘विपर्याय कदा । घडे अघडे कैसेनी ? ॥ ६१ ॥ वोघजळ शोषी सागरा ? । तित्तिरे ग्रासिजे वैश्वानरा ? । प्रळयवात फणीधरा । कैसेनी प्राशवे ? ।। ६२ ।। वज्रधारे मूढ़ पाषाणीं है। काळविषातेंवी तुळे पाणी है। अंतकदूत रिक्तपाणी । माघां कोण्हीं सारिला ? ॥६३॥ तयापरी अर्जुनजयीं । वीर नाहीं भुवनत्रयीं । समरीं। तोषे मारदाही । हस्तकळे पावला. ॥ ६४ ॥ हैविजिव्हा आरोग्यकाया । खांडव वोपोनी केला, राया ! । सुरेंद्रविक्रम तया समया । विगत केला प्रतापें. ॥ ६५ ॥ तुज देखतां गंधर्वपती । हतवीर्य केला न लवतां पातीं। हिरण्यरिपु । दानवपंक्ती । वज्री अटक मर्दिल्या. ॥ ६६ ।। काळखंज साठ कोटी ।। एकलेन मर्दिले हँटी । निवातकवच न गणिती दृष्टी । वासवा, त्यांतें मारिलें. ॥ ६७ ॥ तया जिकी वृथा आशा । जाणतां नेणे, नराधीशा ! । पांचाळसेजयसेनाकोशी । नाहीं कैरीन प्रतापें. ॥ ६८ ॥ तेव्हांच कवच विसर्जन । कैरीन, राया! सत्य वचन । तुझ्या हिती अनन्य मन । बुद्धी नान्य सर्वथा. ॥ ६९ ॥ यांहीवरी सनद्ध पार्थ । नसतां, चमूचा करीन घात'. । राजा वदे, ‘संकल्प सत्य । करीं; स्वामी ! गुरुवर्य ! ॥ ७० ॥ मी आणि सौबळ शकुनी ।। कर्ण वीर प्रतापतरणी । पार्थ विभांडीन रणांगणीं । काय थोरी तयाची ?' ॥ ७९ ॥ ऐसी वदोनी वचनोक्ती । त्रिवर्ग लोटले अर्जुनाप्रती । सवें दःशासन रोषावर्ती । सेनामांदी शिरकले. ।। ७२ ॥ उभय वीर एकवटी । मारा पेटले थोर हटी । शस्त्रसंभार वर्षती थाटी । प्रळयमेघासारिख्या. ॥ ७३ ॥ तया काळी काळरात । काळरूपी काळिकावत । काळिमाकुँळित वीर क्रांत । निद्राभरें विकळता. ॥ ७४ ॥ श्रांतवाहन श्रमी वीर । क्षीण क्षतीं गळे रुधिर । माजी १. उलटा प्रकार. २. हस्तकौशल्य, समरपाटव. ३. हुताशनाला, अग्नीला. ४. मागे ओंवी ४५ वरील टीपा पहा. ५. इंद्राचा पराक्रम. ६. चित्रसेनगंधर्व. घोषयात्राप्रसंगी कौरव पांडवांस त्रास देण्याकरितां वनांत गेले होते. तेथे चित्रसेनगंधर्वाने दुर्योधनास धरून बांधून नेले होते. परंतु अर्जनाने पवांचे वैर मनांत न आणितां चित्रसेनाचा पराभव करून दुयोधनाची सुटका केलीअशी कथा आहे. (मुक्तेश्वर-वनपर्व-अध्याय १२ पहा). ७. बिनहरकत, कोणी अडथळा न करितां. ८. पराक्रमी. ९. जे इंद्रास तुच्छ मानीत होते (पर्वा करीत नव्हते) ते निवातकवच राक्षस. १०. मुक्तेश्वरवनपर्व-अध्याय १० पहा. ११. कोश=समुदाय. १२. नाश करीन, नष्ट करीन. १३. आंगांतून चिलखत काढीन. १४. चिलखत घातलेला, युद्धास तयार. 'सन्निध' असा अन्यपाठ, १५. दुर्योधन, शकुनि व कर्ण, १६, काळ्या शाईसारखी. १७. अंधकारानें व्याप्त.