पान:महाभारत.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० नरहरिकृत द्रोणपर्व] ॥ २९ ॥ तव प्रसादें आमुची कीर्ती । रक्षिसी आमुते नाना युक्ती । पार्थयशाची त्रिजगीं बुंथी । वाढ तुझिया संयोगें. ॥ ३० ॥ पाहें पां युद्ध अनर्थकारी । जाली वीरांची बोहेरी । कौव नाचती हर्षांतरीं । भैमीघातें संतोषे. ॥ ३१ ॥ श्रीकृष्ण वदे, ‘संग्रामसदनीं । आतुडे केवीं सुखाची काहणी ? । क्षणीं सौख्य असुखभरणी । पाठी वाड तैसीची. ॥ ३२ ॥ कश्मल त्यागोनी शोकचिंता । रिपुजयीं धरिजे आस्ता'. । धर्म वदे, ‘जगन्नाथा! । आज्ञा मान्य आमुते ॥ ३३ ॥ तेची समय बादरायण । कृपेने पातला भगवान । धर्मसहित श्वेतवाहन । लक्षोनी बोले सँवाणी. ॥ ३४ ॥ म्हणे, ‘कर्णशक्ति या मारी । पार्थ क्षेम पाहिला समरीं । अमित भाग्य सदाचारीं । धर्मराजा ! धर्मज्ञा ! ॥ ३५ ॥ तव सुकृते काळशक्ती । लया गेली, जगतीपती ! । पुनः जन्म फाल्गुनाप्रती । जाला मानीं, सभाग्या ! ॥ ३६ ॥. परपीडकराक्षसघातीं । किमर्थ कश्मल धरिलें चित्तीं? । बंधुक्षेम जयाचे पंथीं। होयीं सादर, नरेंद्रा! ॥ ३७॥ पंचम दिन उदय अवधी । क्षया पावे रिपूची मांदी । सत्य, तप, दान, क्षमा, हृदीं । यतो धर्मस्ततो जयः ॥ ३८ ॥ ऐसें वदोनी भगवान ।। पावता जाहला अंतर्धान । धर्मं मानोनी कृत कल्याण । शौर्य विक्रमें चॅळाळी. ॥ ३९ ॥ ‘जय जय कृष्ण !' वदोनी वाणी । सेना सज्ज लोटला रणीं । प्रतापबाहु ऐश्वर्यखाणी । देखोनी कर्ण थडकला. ॥ ४० ॥ विस्फुरूनी प्रभिन्न चाप । घोषं वर्धवी ताप । जाणों समक्ष षडाननर्बाप । त्रिपुरदहनी ज्यापरी. ॥ ४१ । प्रभिन्न शंख वाहिला वदनीं । भैरैवैरव तुमुळभरणी । पांडववीरी ऐकोनी श्रवणीं । भेरी, शंख वाहिले. ॥ ४२ ॥ प्रभद्रक राजे सहशिखंडी ।। सहस्र रथी लोटले संधी । शतेक हस्ती गुंडादंडीं । लोहशृंखेळ खळाळी. ॥ ४३ ॥ पांच सहस्र अश्वसादी । तीन सहस्रक प्रभद्रकमांदी । पाठी | १. वेष्टण, आवरण. २. भस्म, नाश. ३. दु:खाची विपुलता. ४. (सुखदुःखाचा) वाढ, वृद्धि, ५. कळकळ, चिंता. ६. व्यास. हे बदरीवनांत तप करीत होते म्हणून ह्यास *बादरायण' असे म्हणतात. ७. मधुरोक्ति. ८. कर्णाच्या शक्तिनामक अस्त्राने या घटोत्कचास मारल्यामुळे. ९. निर्वाणशक्ति (मागे ओंवी १९ पहा). १०. घटोत्कचाच्या नाशाविषयी. ११. उदासीनता, खेद. १३. ज्या मार्गाने (उपायानें). पक्क्ती? असा पाठभेद. १३. चळवळ करी. ‘चालिले असा अन्यपाठ. येथे मूळांतील घटोत्कचवधपर्व समाप्त होऊन 'द्रोणवधपवा सुरुवात झाली आहे. १४. शंकर. १५. भयंकर गर्जना. १६. हत्तीच्या पायांतील लंगर. खळाळा’ बद्दल खळखळी' असे पाठांतर.