पान:महाभारत.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४८ नरहरिकृत [द्रोणपर्व अध्याय एकतिसावा. संजय वदे, ‘नरमंडणा ! । भैमी पावतां काळसदना । व्यथाभूत पांडुनंदना । खेद खेदी अमित. ॥ १ ॥ नयनांबुजीं अश्रु बैहळ । जेवीं पद्म खंडित नाळ । चंद्राननीं कळा विकळ । जेवीं ग्रसितू स्वैर्भानु. ॥ २ ॥ पुत्रनिधनशोकवन्ही । मनमयूर आहाळलें झणी । पुरुषार्थठावो मंद वदनीं । काळिमा गात्रीं स्पर्शली. ॥ ३ ॥ व्यथाभूत पृतनामांदी । मिनली तया शोकसंधी । खेद खेदी सकळां हृदीं । शूरत्वतेजीं दीनता. ॥४॥ ऐसिया क्लेशार्णवीं तारक । तारकारिजनक पादोदक । वंदी तो तार्श्वगामी देख । मायबांधव विश्वाचा. ॥ ५ ॥ चराचर जग पाळिता । परात्पर, मायानियंता । अपार पार वर्णितां तथा । अंत अनंता न लागे. ॥ ६ ॥ तो लाघवी, मनमोहन, । लीलाविग्रही, मधुसूदन । तांडवनृत्ये हर्षित मन । करुनी, पार्था आलिंगी. ॥ ७ ॥ वारंवार वदनारविंद । चुबी आवडी परमानंद । क्षणक्षणा प्रेमें विशेद । चहूं भुजीं अपंगी. ॥ ८ ॥ जैसी यशोदा गोपाळपाळा । आवडी चुंबी वेळोवेळी । कौसल्यादि रघूत्तमाला । चुंबी तेवीं पाते. ॥ ९ ॥ सद्गदकंठ फुललोचन । हर्षे रोमांच, प्रेमजीवन । नंदनंदन आनंदघन । नर्तन करी उल्हासें. ॥ १० ॥ तटस्थ वीर आश्चर्यमान । जेवीं मृगी गायनीं लीन । कीं नागसराच्या मोहनें । तल्लीन फणी ज्यापरी. ॥ ११ ॥ जेवीं सकळां मौनमुद्रा । धर्म वदे, ‘क- ल्याणभद्रा ! । आम्ही आतलों शोकसमुद्रा । उल्हास तूतें किमर्थ ?' ॥ १२ ॥ ऐकोनी वदे दनुजदळणी। श्रनुज हलधरपाणी । ज्याची तनुज विसृजनी। वाढ[करी]सर्वं जनांतें. ॥ १३ ॥ म्हणे, ‘धार्मिका ! धर्ममूर्ती ! । धर्मराजनंदना ! सुमती ! । माझा पार्थ प्राणप्रिय अती । मुक्त भार्थी निश्चयें. ॥१४॥ वैकर्तन प्रतापी कर्ण । सबळांश पूर्ण प्रतापवान । सर्वास्त्रभेदनीं जाणता निपुण । दातृत्व दानीं धनेश.॥१५॥जितक्लमा, विनीत सर्वां। दयाळ, सुशीळ, नेमविभवा। सँलग्न । १. ह्यांत मूळांतील अध्याय १८०-१८४ यांचा सारांश आला आहे. २. व्यथायुक्त, शोकाकुल. ३. पुष्कळ, ४. कमळाचे देठ (दांडा). ५. राहू. ६. होरपळले, पोळलें. ७. तारकाचा (तारकासुराचा) अरि (शत्रु)=कार्तिकेय, त्याचा जनक (बाप)=शंकर. ८. गरुडवाहन, कृष्ण. ९. स्पष्ट, खरोखर, १०, अपंगणे=जवळ घेणे, आपलासा करणे. ११. हरिणांस गायन फार आवडते, अशी प्रसिद्धि आहे. १२. पुंगी, वाद्यविशेष. १३. स्तब्धता. १४. येथे ‘अनुज' हा शब्द बंधु' ह्या अर्थाने योजिलेला आहे, असे वाटते. १५. बळिराम. १६. ब्रह्मदेव, सृजू उत्पन्न करण: १७. न दमणारा. १८. कर्णाच्या अंगास उपजतच वज्राप्रमाणे कवच व कानांत परम दैदिप्यमान कुंडलें होतीं. (मुक्तेश्वर-वनपर्व-अध्याय १७ पहा).