पान:महाभारत.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० अध्याय] महाभारत. २४७ शैमिवधीं दृढतरमती । धरुनी, विलोकित शक्ती । मायिक माया हरपली. ॥ १३१ ॥ जैसे सूर्योदयींचे समई । नाहींच होय तमाची सायी । कीं दैवयोगे भाग्यनवाई । दरिद्र लंघितें दिशाते. ॥ १३२ ॥ तयापरी राक्षसी माया । विलया गेली, महाराया ! । पुढे देखिला भैमी तया । देवीबस्तासारिखा. ॥ १३३ ॥ पाहोनी, शक्तीची गैवसणी। काढितां, दीप्ती पसरे अवनी । राक्षसअंत भावी मनीं । आयुष्यदोरी खुटली. ॥ १३४ ॥ विशाळ विकट धरुनी वपू । पुढां लोटला निर्जीव कोंपू । कर्णवीर कृतांतस । घाली कर शक्तीतें. ॥ १३५ ।। सरसराट स्फुलिंगमाळा । विखरत्या जाल्या महीमंडळा । सबीजमंत्रे झोकिली बाहु सरळा । यमदंडासारिखी. ॥ १३६ ।। कडकडाडली ल शब्द । जाणों क्षया पातली अवधी । तेणे खळबळोनी उदधी । स्पर्शी धांवे अंबरा. ॥ १३७ ॥ उल्कापातं दाटली धरा । प्रदीप्त दीप्ती खचल्या तारा । मही डळमळी थरथरा । भूतगणा आकांतू. ॥ १३८ ॥ सहस्र विजांचा एकवळा । कीं क्षयाग्नीची ज्वाळमाळा । ना ते शिवनेत्रींची ज्वाळा । प्रदीप्त जाली क्षयाते. ॥ १३९ ॥ तेजें दिशा भरल्या गुंणीं । झापडी पडिली वीरांनयनीं । गजाश्व पडती उलथोनी । भ्याड प्राण त्यागले. ॥ १४० ॥ व्यापोनी व्योमीं उतरी तळा । घटोत्कचाच्या वक्षःस्थळा । भेदोनी निघाली ईसातळा । पंचप्राण समवेत. ॥ १४१ ॥ वज्रप्रहारें शैलशिखर । खचोनी परे देवर । तैसें निर्जीव कलेवर । पडे विशाळ महीते. ॥ १४२ ॥ तयातळी पित सेना । मृत्यु पावली, नरमंडणी ! । “आहा !' शब्द सकळां वदना । अतितंबळ माजला. ॥ १४३ ॥ कौरववीर हर्षित मनें । कर्णा स्तविती टामानें । पांडव चमू उद्विग्न घन । शोकाणेवीं आतुडे. ॥ १४४ ॥ प्रताप अतिदारुण । पुढे सज्जनीं करावें श्रवण । भीमराज गुरूच्या वरदानें । कथी नरहर मोरेश्वर. ॥ १४५ ॥ म बोकड बळी देण्याची चाल आहे. ३. आच्छादन. ४. शिन त्यापैकीं भालनेत्रांत विस्तव असतो. ५. उत्तम प्रकारे, ६. पृथ्वीतली १. दाटी. ३. बस्त=बोकड, देवीस बोकड व वास तीन डोळे आहेत, त्यांपैकीं भालनेत्रांत वि जमिनींत. ७. ह्या अध्यायाला ‘घटोत्कचवध' असे नाव आहे.