पान:महाभारत.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ नरहरिकृत द्रोणपर्वं] माजला काळ, नेमिली पॉजी । खंड विखंड द्विरद वाजी । पदाती पदीं। विच्छिन्न. ॥ ११५ ॥ त्यांमाजी रात्र द्वितीये वैयसा । निद्राभरें भयवळसा । कोण्हा न धरवे धैर्यधिवसा । पळतां शरें आडविती. ॥ ११६ ।। जैसा हनुमान अशोकवनीं । बैंमसी बनकरा क्रोधअयनी । तेवीं भैमीच्या संघट्टणीं । वीरभाने उडविली. ॥ ११७ ॥ ‘आहा'कार वाहिनीमेळीं । गर्जुन वाद्ये बैसली टॅाळी । कुठित वीर अंतुर्बळी । यत्न कांहीं न चाले. ॥ ११८ ॥ कासावीस कौरव वीर । सहित बंधु राजेश्वर । म्हणती, ‘आतां कोण विचार है। यया शांती योजिजे. ॥ ११९ ॥ नेणों महद्भूत पातले घाता । युगांतकाळ पातला आतां । कीं आयुष्याची अवधी पुरली तथा । यया रात्री सर्वांची. ॥ १२० ॥ महास्त्र अस्त्रप्रयोग । विविध शस्त्रे जालीं व्यंग । इंद्रशक्तीविना अरिष्ट मार्ग । मुक्त नोहे आणिकां.' ॥ १२१ ॥ सर्व म्हणती, ‘विचार श्रेष्ठ । याविण उपाय सकळ भ्रष्ट.' । कर्ण होवोनी अंतरीं कूट । मधुर वचनीं अनुवादे. ॥ १२२ ॥ ‘वासवदत्त निर्वाणशक्ती । परम यत्ने जाली प्राप्ती । तिच्या आश्रयें फाल्गुनाप्रती । तृणप्राय मी मानीं. ॥ १२३ ।। जीवासी रक्षण शरीर । कांतेसी पोषितो भ्रतार । जळासी रक्षण काँसार । कुटुंबियासी स्त्री जेवीं; ।। १२४ ॥ नदीपुरी आश्रय नौका । महद्यसनी द्रव्य सखा। संसारबंधाचिया धाका । मुक्त कता गुरुराव; ॥ १२५ ॥ तेवीं अर्जुनाचिये कदनीं । रक्षण शक्ती सखी जननी । तया वधार्थी अनुदिनीं । संधीलागीं टपतसें.' ।। १२६॥ येरू म्हणती, ‘वांचल्या आतां । पुढे पार्थाचिया योजिजे घाता । सांप्रत मृत्याची हरिजे व्यथा । पुढे उपाय कल्पिजे. ॥१२७॥ ना तो अधरपाणी कुंठवास । धान्य संग्रहीं न्यून मास । आधीच करितां उपवास । मरतां प्राप्त येरांतें. ॥ १२८ ॥ तैसी न करावी राया ! युक्ती ।। वांचवीं रणीं सर्वांप्रती । विप्न आड लोटतां राती । साह्य शंकर पुढारा.' ॥ १२९॥ आग्रह जाणोनी सर्वांचा । प्रसन्न आत्मा रविसुताचा । म्हणे, ‘येची अर्थी विधिवाचा । पूर्वी नेम नेमिला.' ॥ १३० ॥ ऐसें वदोनी सर्वांप्रती ।। | १. बळिदान; पीक चांगले यावे म्हणून शेतकरी कोंबडे, बकरे इत्यादि बळी देतात त्यास ‘पांजी' असे म्हणतात. हा शब्द नरसिकृत कर्णपर्वांतही आला आहे (अ० १४१५५ पहा) २. तरुण रात्र (मध्यान्ह रात्र). ३. ठोकी, मारी. ४, माळ्यांस, बागवानांस. ५. कानटाळी ६. शक्तिमान्, बलाढ्य. ७. मर्यादा. ८. इंद्राने कर्णास दिलेल्या अमोघ शक्तीच्या प्रयोगाशिवाय अरिष्टनिवारणार्थ दुसरा मार्ग नाही, हा भावार्थ. ९. गूढ, विचारयुक्त. १०. सराव ११. निर्जळ-पाणी न पिता-राहणे.