पान:महाभारत.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ नरहरिकृत [द्रोणपर्व मारी। न सोसवे वीरां समरीं । विन्मुख होवोनी रणचत्वरीं । दक्षिण बाहीं निघाले. ॥ ८२ ।। संतप्त कर्ण प्रतापवर्य । जाणों वसंत प्रतापसूर्य । मंडळाकृती धनुष्य सोय । काळचक्रासारिखें. ॥ ८३ ॥ दिशा प्रदिशा भरल्या बाणीं । शवें दाटली पूर्ण अवनी । किलकिलाट शब्दध्वनी । अतितुंबळ माजली. ८४ ॥ इंद्राशनीसमान चाप । ठणकारें सैनिका ताप । वेर अँथनेमीचा आलाप । तळत्राण विशेष. ॥ ८५ ॥ देखोनी प्रताप कर्णाचा । रोष नावरे घटोत्कचा । दांते चावोनी कचकचा । कर्णासमोर लोटला. ॥ ८६ ॥ काळअवधीचा पुरतां लेख । बुद्धि भ्रमिक वावरे शेखा। अंतकदूताचा क्रोधसखा । वोढोनी आणी मृत्याते. ॥ ८७ ॥ तयापरी राक्षसराजा ।। कणोंप्रती पातला जुझा । विकट रूप विशाळ भुजा । काळदंडासारिख्या. ॥ ८८ ॥ अष्टचक्री प्रभिन्न रथ । वारिया ऐसा वावरे त्वरित । आकर्ण वोढोनियां सीतै । बाण अमित सोडिले. ॥ ८९ ॥ पाहोनी त्याचा शरांचा थवा ।। कर्णे बाण सोडिले हवा । जैसा जंभ आणि मघवा । महामारी पेटले. ॥ ९० ॥ तयापरी सायकवाडी । येरयेरां ताडी प्रौढी । शर दाटले जैसी धाडी । महावात वृक्षांची. ॥ ९१ ।। सिंहरव उभयतां । फोडुनी, सोडिती बाणचलथा । खंडिती भेदिती इतस्तता । महाक्रोधे जयाते. ॥ ९२ ॥ रविनंदन प्रतापी शूर । अश्वसारथी रहंवर । बाणी करुनी चकचूर । भैमी [हृदयीं] भेदिला. ॥ ९३ ॥ हताश्वरथसारथी । हिडिंबंभाचा मही विरथी । फोडुनी रव महा भारती । अदृश्य जाला मायावी. ॥ ९४ ॥ कणें आकणे शरासन । वोढोनी दिशा भरल्या बाणें । जैसे तिमिर दाटतां गगन । आन कांहीं न दिसे. ॥९५ ।। किंवा शलभाचे उत्थानीं । भरुनी निघे जेवीं अवनी । की शरद्रात्री तीराभरणी । तेवीं बाण पसरले. ॥ ९६ ॥ तंव राक्षसे वारुनी माया । अतयं प्रेरिली महामाया । लोहितांबरैदिशा समया । हुताशन धडकला. ॥ ९७ ॥ सरसराट अग्निकल्लोळ । ज्वाळा नभा सुटती सरळ । धूम्न १. रणांगणांतून. २. आणखी. ३. नेमी=चाकाची धांव. ४. दांत खाणे, दांत ओंठ चावणेरागाचे लक्षण आहे (मागे ओंवी६४ पहा). ५. गणना, हिशोब. ६. शेखीं, शेवटीं. ७. धनुष्याचा दोरी. ८. घटोत्कच. हिडिंबराक्षस हा घटोत्कचाचा मामा (हिडिंबेचा भाऊ). ९. वाणीने, वाचन: १०. टोळधाड उठली (आली) असतां. ११. शरदृतूतील रात्रीं. १२. तान्यांची विपुलता: पावसाळा संपताच शरदृतु लागतो व ह्या ऋतूत आकाश निरभ्र असल्यामुळे पावसाळ्यापा जास्त तारे, नक्षत्रे वगैरे दृष्टीस पडतात. १३. त्या वेळीं अंबर (आकाश) व दिशा लोहित (आरक्त) झाल्या.