पान:महाभारत.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ १ अध्याय] महाभारत, ऐकिजे. ॥ २७ ॥ राजा वदे ‘मुनिसत्तमा ! । विद्याउदधी! तेजधामा ! । इंद्रियजिता ! आवाप्तकामा ! । वैसतो वृत्तांत निवेदी. ॥ २८ ॥ रविप्रतिमा सत्वनिधी । बळवीर्य समान उदधी । देवव्रत अक्षयसिद्धी । पाडिला शिखंडी ऐकतों. ॥ २९ ॥ पुढां धृतराष्ट्र शोकावर्ती । दुर्योधनादि सेना सुमती । काय करिते जाहले गती । विस्तारूनी बोलिजे'. ॥ ३०॥ वैशंपायन म्हणे, “राया ! ।। भीष्म पांडवी नेला लया । ऐकोनी शांति हृदयालया। धृतराष्ट्राच्या न होय. ॥ ३१ ॥ संतप्तमान शोकाकुलित । धडधडां हृदयीं जाळी चित्त । खेदं मानी त्रिभुवन रिक्त । आंग टाकी धरेतें. ॥ ३२ ।। राजमंदिरीं शोकध्वनी । ऐकतां पविजे सर्वजनीं । शोक भरूनी उरे अवनीं । गगनोदरीं न माये. ॥ ३३ ॥ तव तेची संधी गावल्गणी । येता जाला म्लानवदनी । शांतवोनी सकळां वचनीं। भूपचरणा वंदिले. ॥ ३४॥ ‘मी संजय कुरुक्षेत्रा । पाहोनी आलों ज्ञानेत्रा !'। रायें स्पर्शानियां वक्रा । निकटवर्ती वैसवी. ॥ ३५ ॥ श्वास घालोनी एकसरा । नयनांबुजीं अंबुधारा । विकळ मानसे शोकीं थारा । संजयातें अनुवादे. ॥ ३६॥ म्हणे, बाळका विजयकेतू । भीष्म ग्रीष्मींचा पूर्णदीप्तुं । सौख्यसागरींचा तारानाथू । शिखंडिकुक्कटें ग्रासिला. ॥ ३७॥ विचित्र प्रारब्ध दैवरेखा । आजन्म वढ केलें दुःखा । असो; पुढील वृत्तांत देखा । निवेदीं माते बाळका ! ॥ ३८ ॥ गांगेय प्रतापाचा तरणी । अस्ताचळा आक्रमितां धरणी। कुरुपांडव कैसी करणी । करिती ? माते जाणवी'. ॥ ३९ ॥ संजय म्हणे, ‘महाराजा ! । भीष्में स्पर्शितां धरा वोज । उभयसेना विवर्णतेजा । महागडी आतली. ॥ ४० ॥ तडाग फुटे, वावरे जळ । तैसे सेनेचे निघाले मेळ । हर्षामर्ष निंदिती सकळ । क्षत्रधर्म अघोरी. ॥ ४१ ॥ खेद पावोनी उभयचमू । येउनी वंदिला राजा भीष्मू । शरासनी शैय्यासंभ्रम् । उपधान उशी बाणांची. ॥ ४२ ॥ जाणों धरे पावला तरणी । किरणमंडित शय्यास्तरणी । | १. घडला असेल तसा. २. भीष्म. हा ब्रह्मचर्यव्रताच्या प्रभावाने देवांसारिखा देदीप्यमान दिसे झणून याचे ‘देवव्रत' असे नांव पडले. ३. शिखंडीने. ४. सर्व लोक आले–हा इत्यर्थ. येथील कर्मणिप्रयोग ध्यानात ठेविण्यासारखा आहे. ५. पृथ्वीत. ६. गवल्गणपुत्र (संजय), गेवगण हा धृतराष्ट्राचा एक सारथी होता. ७. (अंधळा असल्यामुळे) प्रज्ञा (=बुद्धि) हीच नेत्र ज्याचे अशा धृतराष्टा! धृतराष्ट्र अंध असल्यामुळे संजय आपल्या नांवाचा उच्चार करून त्यास बंदीत आहे. ८. माझ्या मुलांचा विजयध्वज. हा 'भीष्म' शब्दाचा उद्देश. ९. सूर्य. १०. चंद्र. ११, खंडि हाच कुक्कट (कोंबडा) त्याने. १२. वृद्धि, १३. कौतुकाने (वोज=कौतुक). १४. म्लान, उत्साहरहित. १५. हर्षाने व क्रोधाने. १६. शय्या हेच आदरातिथ्याचे साहित्य. १७. उच्छीर्षक, ज्याच्या योगाने डोके वर करितां येते ते.