पान:महाभारत.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व । नरहरिकृत हीन, पोचट, फोल; । पैरी सर्वांगाचे कर्णयुगल । कैरूनी, तोषे माउली; । ॥ १३ ॥ कीं पित्याचे अंतरवनीं । सदय मेघ वर्षे जीवनीं । ना ते चकोरा तल्लीन ध्यानीं । फळे जेवीं हिमांशु. ॥ १४ ॥ कोण प्रीतीचे ग्लान मानी ? । पूर्वे पावे वासरमणी । मागें वत्सध्यासे पाहे जननी । स्नेहें युक्त वोरंसें. ॥१५॥ तयापरी करुणानिधी ! । लाड पुरवोनि प्रज्ञावृद्धी । वाढ करूनी सोज्ज्वळबुद्धी। भारतीं भारत बोलवा. ॥ १६ ॥ भारत गंगा भागीरथी । नौकारूप तुमची शक्ती । आश्राउनी, वर्णनीं धरिली मती । पार मातें करावें. ॥ १७ ॥ प्रभू ! तुमचे अनुमोदनीं । वाक्तुषार सिंधुजीवनीं । कवित्वलतिका वर्धे गुणीं । हा प्रसाद तुमचा. ॥ १८ ॥ तुम्ही न होतां सानुकूळ । कवित्वलतिका होय विफळ । जैसी योषिता लावण्यकीळ । मूर्खसंगें विनाशे. ॥ १९ ॥ असो; भारताधि अंपारपार । कोण पावेल पैलपार ? । समर्थ सत्यवतीकुमर । बुड्या जाला जगहिता. ॥ २० ॥ कथारने काढोनि तोषी । केल्या पुराणाचिया राशी । तेची महाराष्ट्रभाषाचरकासी । घोळोनि प्रकार निर्मिले. ॥ २१ ॥ हृदयीं, कंठीं, धरितां कर्णी, । दुरिततम हरोनि झणी । मति विराजे धौतवर्णी । दृष्टि श्रेणीं उभारे. ॥ २२ ॥ भारतींचा श्लोकचरण । जया होय श्रवणपठण । तेणें कपिलासहस्रदान । केले जाण सिंहस्थीं. ॥ २३ ॥ अँसो; सोमवंश विख्यात क्षिती । राजराजयां चक्रवर्ती । जनमेजय पवित्रकीर्ती ।। विनवी भक्ती 'मैनीतें. ॥ २४ ॥ “अहो! जी ! व्यासशिष्यवर्यपंक्तीं । अग्रता, मान, विद्या, सुमती, । वक्तृत्वधारणा घनाची शक्ती । मनसधात्री निवाली. ॥ २५ ॥ इच्छाबीज इच्छीत रोहिणी। द्रोणपर्व' प्रेरीं जळ कण । हृदयभूमी थारतां किरणीं । कथाकोंभ फुपाटे. ।। २६ ॥ ऐकोनी राजयाची वाणी । शोक निवाला अंतःकरणीं । म्हणे, ‘सार्वभौमा ! पवित्रखाणी! । पूर्वजकीर्ति १. अन्वयार्थ:-परी सर्वांगाचे कर्णयुगल करूनि (=त्या शब्दाकडे कर्णद्वयाप्रमाणे इतर सर्व अवयवांचेही ध्यान लावून, सर्व अवयवांना कानाचेच जणू काय रूप देऊन) माउली तोषे (=आई संतुष्ट होते). २. पिणा-याचे, तान्हेल्याचे. ३. अंतःकरणरूपी अरण्यांत. ४. किंवा. ५. पीडा, श्रम.. ६. पान्ह्याने युक्त, पान्हा फुटलेली. वोरुस=पान्हा.. ७. वाणीने, वाचेनें. ८. आश्रय घेऊन ९. फलरहित, व्यर्थ. १०. फार सुंदर. कीळ=अग्नीची ज्वाळा. ११. ज्याच्या किनान्याचा थांग लागत नाहीं असा, अपरंपार मोठा. १२. व्यास. १३. पाणबुड्या. १४. तोषदायक (हें कथा विशेषण). ‘तोषी? असा पाठ घेतल्यास, तोपीं=संतोषाने, आनंदाने. १५. श्रवण करण्या" १६. येथे मूळांतील कथाभाग सुरू होतो. १७. वैशंपायनअपीस. १८. व्यासाच्या शिष्यम १९. चित्तरूपी भूमी.