पान:महाभारत.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ नरहरिकृत [द्रोणपर्व चक्र व्यर्थ जातां समरीं । घटोत्कचा क्रोधलहरी । गदा झोकिली कर्णावरी । जाणों भगिनी यमाची. ॥ ४८॥ धनुर्धरां दीक्षागुरू । रवितनुज प्रतापशूरू । शर प्रेरुनी अति सत्वरू। गदा व्योमा उडविली. ॥ ४९ ॥ क्षीणायुषीं औषधमंत्रे । वृथा होती सर्व तंत्रे । तेवीं भैमीचीं अमोघ शस्त्रे । विफळ होती तत्क्षणी. ॥ ५० ॥ त्वरेमाजी करुनी त्वरा । कर्णं लाविल्या बाणधारा । घटोत्कच होवोनी घाबिरा । होये अंबेरा अक्षय. ॥ ५१ ॥ तेथोनी वर्षे शरांची जाळी । द्रुमपाषाणशस्त्रमेळी । रविनंदन अतुर्बळी । महास्त्र सोडिलें. ॥ ५२ ॥ तें उसळलें अग्निन्याय । घटोत्कचाचे भेदिलें हृदय । तळा उतरूनी विद्युत्प्राय । माया सर्वही भंगिल्या. ॥ ५३ ।। क्रोधानळीं प्रदीप्त गात्रीं । विशाळ रूपें अवगे वैरित्री । भूतसृष्टी मावे वक्रीं । सिंदूरवर्ण आफाटे. ॥ ५४ ॥ अनेक भेद बहुधाकृती । मायामयी राक्षसपंक्ती । विविध शस्त्रे भेदिती क्षिती । कर्णाप्रती लोटला. ॥ ५५ ॥ त्यामाजी मिश्र राक्षसी सेना । शस्त्रे वर्षती विचित्र नाना ।। ‘घ्या, घ्या' शब्द फोडिती वदना । काळमेघासारिखे. ॥५६ ।। पाषाण, पादप, भिडिपाळा । विविध शस्त्र नानालीळा । मोकळती बाह्या सरळा । चहूंकडूनी सारिखे. ॥ ५७ ॥ तया घाताचिया महामारीं । बुजोनी गेला कर्ण समरी ।। जेवीं सूर्य घुयीच्या ज्वरीं । नाहींच होय ज्यापरी. ॥ ५८ ॥ बाप वीर रवितनुज । शर मोकळी मंत्रबीज । जेवीं क्षुधित अरुणानुज । फणिर्मदना सुसाटे. ॥ ५९॥ तयापरी शरौघमाळा । सरसराट वन्हिज्वाळा । उसळोनी शिरै आणिती तळा । तारांगणासारिखे. ॥ ६० ॥ हस्त, पाद, खंडुनी पाहीं । धडधडा राक्षस पडती मही । विशाळवक्र छिनदेही । सिँती इतस्तता पडियेले. ॥ ६१ ॥ अद्यमान राक्षसी सेना । माया लोपली रणांगणा । रजनीचर विन्मुख कदना । वाचले घायीं निघाले. ॥ ६२ ॥ जैसा सिंह धडकतां द्विरदाँ । दिशा वोपोनी पडती खेदा । कीं वना सरकत जातवेदा । श्वापदगणा आकांतू. ॥ ६३ ॥ तयापरी रजनीचरा । वळसा भोंवतां राजेश्वरा । दांत खावोनी १. अल्पायुषी मनुष्यास वाचविण्याचे कामीं औषध, मंत्र वगैरे उपाय निष्फळ होतात, त्याप्रमाणे घटोत्कचाची सर्व शस्त्रास्त्रे विफळ झालीं-हा इत्यर्थ. २. आकाशात उडाला. ३. भुईवर उतरला. ४. प्रळयकाळच्या पर्जन्याप्रमाणे. ५. गोफण. ६. धुक्याच्या त्रासानें, ७. गरुड. ८. जमिनीवर. ९. जे वांचले, ते मोठ्या घाईने पळून गेले-हा इत्यर्थ. १०. हत्तीवर. ११. अग्नि, विस्त १२. संकट, व्यसन.