पान:महाभारत.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० नरहरिकृत [द्रोणपर्व सक्रोध भैमी हृदयीं गांठी । घालोनी, सोडी शरातें. ॥ १३ ॥ धडकोनियां तिहीं बाणीं । अश्वसारथी मर्दिले रणीं । विरथी राक्षस क्रोधभरणी ।। पादचारी लोटला. ॥ १४ ॥ वज्रासमान वळोनी मुष्टी । भैमी ताडिला हृदयपुटीं । गिरकी खावोनी भूतळवटीं । शैलन्यायें पडियेला. ॥ १५ ॥ तवकें उठोनी, महाराजा ! । मुष्टिप्रहार केला वोजा । येरयेरां ताडिती कुंजा । क्रोधभरें निघाते. ॥ १६॥ मुष्टिप्रहार, लत्ताप्रहार। कोपर, गुडघे, थाप, सैर। मोजोनी मारिती येरयेर । ‘उसणे घे, घे, म्हणोनी. ॥ १७ ॥ करवतिया, बाहु, मुसळे । गदा, पैरिघ, प्रास, त्रिशूळ । मुद्गल, पैडे, विटे, मुष्टी सरळ। एकमेकां ताडिती ।। १८ ॥ तयामाजी राक्षसी माया । विविध निर्मित महाराया! । एक अर्वंगतां वन्हीचर्या । दुजा पर्जन्य सुसाटे. ॥ १९ ॥ एक होतां तक्षकाकृती । दुजा गरुड धांवे क्षिती । एक मेघाची धरितां स्थिती । दुजा वायु भरारी. ॥ २० ॥ एक शश, दुजा सिंह तरुणू। एक भास्कर, दुजा वर्भानू । विचित्र । मायाप्रताप घनू । एकमेकां दाविती. ॥ २१ ॥ वासव आणि वैरोचनी । पूर्ववैरें मिनले कदनीं । तेवीं उभयतां क्रोधभरणीं । एकमेकां ताडिती. ॥ २२ ।। घटोत्कच रोषअयनी । आसडोनी खरें पाडिला धरणी । पाद चेपोनी हृदयभुवनीं । काळखङ्ग कर्षिलें. ॥ २३ ॥ घाव घालोनी कंठनाळीं । खंडुनी शिरें, फोडिली कीळी । भयभीत वीर तये काळीं । दिशा दाही लक्षिती. ॥ २४॥ कैराळ शीस, बीभत्स वर्णी । रक्तस्राव होतसे धरणी । बाँबर'झोटी कवळोनी पाणी । निघे भैमी हर्षतू. ॥ २५ ॥ पाहत असतां द्रोण, कृप ।। दुर्योधनादि अनेक भूप । स्वरथीं शिर बांधोनी ताप । बोले रोपें कुरुवर्या. ॥ २६ ॥ घटोत्कच पुर्रुषार्थवाणी । दुर्योधनासी बोले वचनीं । ‘अलायुधशीस पाडिलें रणीं । विक्रम नेत्रीं पाहिला. ॥ २७ ॥ कर्णशिर छेदिलें बाणीं । सांप्रत पाहसी रणांगणीं । तुजसहित वीरांची भरणी । आश्चर्याते पावती. ॥ २८ ॥ धर्म, अर्थ, तिसरा काम । इच्छा इच्छीत ज्यांचा नेम । रिक्तपाणी १. कुंज=हत्तीचे सुळे (दांत). हत्ती आपल्या सुळ्यांनी एकमेकांस ताडण करितात, त्याप्रमाणे घटोत्कच व अलायुध एकमेकांस आपल्या मुठींनीं ताडण करू लागले–हा इत्यर्थ. २. ‘माजोनि' असे पाठान्तर ३. लवंगी काठी. ४.भाला. ५. पट्टिश. ६.घेतां, स्वीकारितां. ७.राहू. ८.विरोचनपुत्र (बळिराजा)- ९. हिसका देऊन, ओढून. १०. गळ्यावर. ११. आरोळी, किंकाळी. १२. भयंकर. १३. माकळ्या पिंजारलेल्या केशांच्या झिपन्या, विखुरलेल्या झिझोंट्या. १४. बाणेदार स्वराने. १५. रिकाम्या हाताने (उपायनाशिवाय) राजा, ब्राह्मण व स्त्री यांजकडे जाऊ नये-हा इत्यर्थ. मूळांतही असंच आहे:-‘स्वधर्ममर्थ कामं च त्रितयं योभिवांच्छति । रिक्तपाणिनं पश्येत राजानं ब्राह्मणं स्त्रियम् ॥ (अध्याय १७५॥४३). मनुस्मृतीत ‘रिक्तपाणिन पश्येत राजानं देवतां गुरुम् ।' असे आहे.