पान:महाभारत.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ नरहरिकृत [द्रोणपर्व दिवौकसां नावरे. ॥ १४४ ॥ गंधमादनीं तुवां जैनका । हरुनी क्लेश वर्धिले सुखा । कठिण समंई सांभाळ देखा । करिसी बापा ! प्रतापें. ॥ १४५ ।। भीमरेते राक्षसीकुशी । तव पिंड वर्धला. तेजोराशी । हीनत्व दवडोनी दाही दिशीं । पांडवयश वर्धिसी. ॥ १४६ ॥ तरी तूं आतां पांडवराया। स्वप्रतापें उजळीं बाह्या । कर्णा विक्रमें नेवोनी लया । यश वैध जगत्रयीं. ॥ १४७ ॥ जे इंद्रजई रावणातें । सौख्य दिधलें इंद्रजिते । तैसें आजी पांडवाते । वोपोनी यश, गौरवीं.' ।। १४८॥ ऐकोनी श्रीकृष्णमुखींची गोष्टी । राक्षस आनंदें भरी सृष्टी । म्हणे, ‘मी किंकर, आज्ञा मुगुटीं; । दावीन चोज समस्तां. ॥ १४९ ॥ कर्णशौर्याची हातवटी । तृणप्राय माझिये दृष्टी ।। विगत करीन उठाउठी । मन सेना प्रतापें ॥ १५० ॥ ऐसें वदोनियां वाणी । सेना सजिली रणांगणीं । अर्भिवाद्य भीमसेन पाणी । करी आवडी प्रतापें. ॥ १५१ ॥ अष्टचक्री विशाळ रथ । ध्वज पताकी साळंकृत । पर्वती वारु बळोन्नत । वेगें वाता सारिती. ॥ १५२ ॥ सिंदूरवर्ण विशाळ बदन । कैराळ दंष्ट्र, प्रभिन घ्राण । सलंब बाहु, ३मश्रू तीक्ष्ण । काळखङ्गासारिख्या. ॥ १५३ ॥ मुगुटमाळा वस्त्राभरणी । संदृढ कार्मुक रुक्मवर्णी । अनेक शस्त्रे तीव्रपाणी । मायामयीं विचित्र. ।। १५४ ।। रथीं आरूढ राक्षसराजा । जाणों कृतांत लोटला दुजा । राक्षसी सेना पिटोनी भुजा । अक्षौहिणी धांवली. ॥ १५५ ॥ अनेक वाद्ये एकें घाई । माजी सिंहनादाची नवाई । घोषं दिशा भरिल्या दाही । घाबिरी सेना कौरवी. ॥ १५६ ॥ धडकोनी मिनला महारोडें । जाणों अंतकें वोढिला पाशें । मरणद्वारीं राक्षसाधीशें। | १. देवांस. २. पांडव वनवासांत असतां, तीर्थयात्रा करीत हिंडते वेळीं, त्यांस हिमालयाच्या गंधमादन नामक शिखरावर जाण्याचा प्रसंग आला. तेव्हां पर्वतावर चढतां चढतां, सर्व ऋषी व भीमाशिवाय इतर पांडव व द्रौपदी वगैरे मंडळी इतकी थकली की, त्यांच्याने एक पाऊलही पुढे टाकवेना. भीमसेन इतक्या सर्व मंडळीस उचलून नेण्यास समर्थ नसल्यामुळे, त्याने घटोकचाचे स्मरण केले. त्या वेळीं घटोत्कच तेथे तात्काळ प्रगट झाला व त्याने सर्व मंडळीस एका क्षणांत पर्वताच्या शिखरावर नेऊन ठेविलें. अशी कथा आहे. (मुक्तेश्वरवनपर्व–अ०९-११०-१५. पहा.) ३. हिडिवानामक राक्षसीचे पोटीं. ४. वाढव. ५. रावण देवांस जिंकण्याकरितां स्वगात गेला असता तेथे देवांचे व राक्षसांचे घोर युद्ध झाले. त्या काळीं इंद्रजिताने इंद्रावर चाल करून खूप पराक्रम गाजविला, व त्यास शस्त्रास्त्रांनी जर्जर करून बद्ध केलें-अशी कथा आहे. ६. ह्याचे मूळचे नांव ‘मेघनाद' पण ह्याने इंद्रास जिंकलें म्हणून ह्याचे ‘इंद्रजित्' असे नांव पडले. ७• कसब, करणी, कृति. ८. हाताने भीमास अभिवादन (प्रणाम) केलें-हा भावार्थ. ९, पाहाडे घोडे, १०, भयंकर दाढा. ११. दाढीचे कॅस. १२. बळकट,