पान:महाभारत.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ नरहरिकृत [द्रोणपर्व स्तता लोळती, नरशार्दूळा! । माळा गळां मुंडांच्या. ॥ ११० ।। कनकध्वज, भग्न रथ, । पताका, छत्र, असंख्यात । भूमी लोळती प्रकाशवंत ।। जाणों तारा नभःपुटीं. ॥ १११ ॥ वसंत काळींचा भास्कर । तैसा प्रदीप्त रविकुमर । शरासनीं अढळ कर । वीरधडे रिचवतो. ॥ ११२ ॥ सेनामेळीं किलकिलाट । पळतां वीरां न सुचे वाट । सेनापती होवोनी भ्रष्ट । माघारती शरमारी. ॥ ११३ ।। धार्मिक धर्म धर्मात्मा । पाहोनी चमूचा निर्जीवात्मा । हृदी कळवळोनी, राजोत्तमा ! । बोलता जाहला पार्थाते. ॥ ११४ ॥ म्हणे, ‘फाल्गुना ! पंचानना ! । वीरवर्या ! बळवर्धना ! । धनुर्धरा ! वीरमंडणा ! । अजिंक्य नरांसुरांतें. ॥ ११५ ॥ तुझ्या युद्धाचे लाघवमान । सहस्रनयन डोलची मान । सुर, सिद्ध, यक्ष, गंधर्वगण । कीर्ति कीर्तनीं कीर्तिती. ॥ ११६॥ ऐसिया प्रतापिया सूर्या! । तव वाहिनी भयाची छाया । हेची आश्चर्य गर्ने हृदया । वारंवार मज; ताता ! ॥ ११७ ॥ वन्हीस वोळंबाची भरणी? । खगेंद्रा फणीची जाचणी ? । उष्णे विव्हळ तारामणी ? । मुँगांबु गजें बुडिजे ? ।। ११८॥ तयापरी तुझी सेना । अर्दित रणी, नरमंडणा! । रणसागरीं तिमिगिलैमाना । वैकैर्तनू विचरतू. ॥ ११९॥ वीर वीर खिळिले बाणीं । कोण्हा न करवं उठावणी । कोस एक बाणभरणी । धडकोनी वीर पाडीत. ॥ १२० ॥ लघुलँक्ष भेदोनी वीर । खंडुनी शरें धरेवर । गजाश्वरथीकळेवर । दाटतां वाटा खुटल्या. ॥ १२१ ॥ तरी तू आजी समरांगणीं। कर्णास वसवीं काळसदनीं ।। वीरपुरुषार्थ स्फुरीं वदनीं । विश्वाचिया नरवर्या ! ॥ १२२ ॥ तुवां काळखंज। वधिला रणीं । निवातकवच मर्दिले बाणीं । त्याची प्रचीत दावी नयनीं । निर्दाळोनी कणते. ॥ १२३ । धर्मवाग्वात सुसाटे । पार्थक्रोधाग्नी प्रज्वळे नेटें । कर्णशक्तिद्रुमाची थाटे । भस्म करू भावितू. ॥ १२४ ॥ विलाका नेत्रीं घनसांवळा । कोटिकंदर्पलावण्यकीळा । सहस्र शशीच्या एकत्र कळा । मुखावरुनी सांडिजे. ॥ १२५ ।। मुकुट, कुंडलें, वनमाळा । आयुधयुक्त भुजा सरळा । त्रिवळी उदर, नाभिकमळा । कमळोद्भव जे ठाई. ॥ १२६ । कास कासिला पाटोळा । जाणों विजांचा मिनला मेळा । पदपद्म अतयंकळा । कमळा तेथे लुब्धली. ॥ १२७॥ सकळ लावण्याचा गाभा । ज्याचेनि त्रिजग। १. वाळवीची, उधईची. २. त्रास, भय. ३. चंद्र. ४. मृगजळांत. ५. तिमिंगल=तिमि नाम । माशास गिळणारा फार मोठा मासा. ६. कर्ण. ७. निशाण (नेम) मारण्याचे कौशल्य. ८. प्रेत९. धर्माचे भाषण हाच वायु. १०, कणची शक्ति हीच झाडांची रांग. ११. ओवाळून टाकाव्या १२. पाटाव, पीतांबर.