पान:महाभारत.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २३५ २९ अध्याय सप्तसागर क्षयांतीं । उदित जाले एकदा. ॥ ९२ ॥ तैसे सातजणी एकदा । प्रहार करिती, न पावोनी खेदा । तीन तीन शर महाक्रोधां । वीरां तया अर्पिले. ॥ ९३ ॥ घोर मिठी पडतां पाहीं । सात्यकी धांवला लवलाहीं । युद्ध जाहलें वितंडे मही । कर्ण आणि तयाते. ॥ ९४ ॥ सांगोळिल्या उभयचमू । ताडिती निकरें वीर संभ्रंम् । रौद्र शूरांचा संग्रामू । शवें धरा ढेसली. ॥९५॥ निबिड वीरांची संघट्टणी । दीपिका विझोनी गेल्या झणी । तमें दाटली तीव्र रजनी । त्यावरी भर निद्रेचा. ॥ ९६ ॥ कालवोनी उभय सेना । एकमेकां पुसती संज्ञा । मामा, काका, श्वशुर, मेहुणा । भाच्या, शालका बोभाती. ॥९७॥ जनक बाहती तनया । बंधु ‘बंधुवा ! ये' म्हणती; राया! । धांव धांव' म्हणती ‘सखया ! । टाकू नको रणरंगीं.' ॥ ९८ ॥ अर्दित वीरांचे घोर शब्द ।। रात्रीभरें चमू सखेद । पुन्हा दीपिका विचित्रभेद । लक्षावधी लागल्या. ॥ ९९ ॥ स्वस्थमान सर्वही वीर । युद्धा मिनले घोरांदर। जैसा चंद्रोदयीं सागर । भरतेने उफाळे. ॥ १०० ॥ धृष्टद्युम्न क्रोधभरणी । पुढारुनी रणांगणीं । दश सायक काळमानी । कर्णाप्रती ताडिले. ॥ १०१ ॥ येरू साधक धनुर्वाडा । पांच नाराच काळधाडा । अर्पोनी पांचाळ करुनी वेडा । चतर अश्व निवटिले. ॥ १०२ ॥ शिळामुखी सोडुनी बाण । सूतशिर उडविले त्राणे । हर्षमानसे रविनंदन । मोकळी पंक्ती शरांच्या. ॥ १०३ ॥ रथी, विरथी, क्षत, क्षीण । रणीं विन्मुख होतां जाण । प्रेरुनी सहदेवें स्यंदन । पांचाळ वरी घेतला. ॥ १०४ ।। आवेश न धरे धर्मराजा । अमित वीर लोटतां जुझा । कर्णं वरुनी वीरश्रीभाजा । बाणचलथा सोडिल्या. ॥ १०५ ॥ पांचाळ, संजय अनेकशः । वीर मर्दिले, नराधीशा! । शरीराचा घोवलसा । हाहाकार चमूनें. ॥ १०६ ॥ जाणों क्षोभला प्रळयरुद्र । किंवा युगांतीं समुद्र । कीं धान्यसवंगण जैसा शूद्र । तेवीं सेना मर्दितु. ॥ १० ॥ सिंह रिघोनी वारणदळीं । करी गजांची धुमाळी । कीं गवागोठण व्या. 'ब्रेमेळी । तेवीं आकांत सेनेतें. ॥ १०८ ॥ धरे प्रपात गजोत्तम । सहस्रावधी तुरंगम । पदाती, रथी, प्रतापी, भीम । छिन्नभिन्न विखुरले. ॥ १०९ ॥ भूषणयुक्त भुजा सरळा । राजित 'शीसे प्रदीप्त कीळा । इत १. उठावले, क्षोभले. २. अलौकिक, अमानुष ३. हातघाईस आल्या. ४. घाईनें, गडबडीनें, ५. नांवें. ६. हांक मारिती, ओरडती. ७. उचंबळे. ८. चारी. ९. मृतयोख्यांच्या शरीराचा (प्रेतांचा) भयंकर वेढा. १०. सवंगण=शेतांतील धान्य मळून जमा करण्याचे काम; कापणी व मळणी. ११. दाणादाण, त्रेधा. १२. वाघांची झुड. १३. शिरें, मस्तकें.