पान:महाभारत.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ नरहरिकृत [द्रोणपर्व रवें शूरत्वें. ॥ ७२ ॥ वृषसेनें क्रोधनिघालें । सात शर तीव्र द्रुपदातें । ताडुनी आणखी तयातें । सहस्रशः शर सोडिले. ॥ ७३ ॥ अंबुधारा प्रावृट्काळीं ।। तैसे बाण रिचवती तळीं । द्रुपद प्रज्वळोनी क्रोधानळीं । क्षुरप्र शर सोडिले. ॥ ७४ । मुष्टीपासाव खंडिलें धनू । वृषसेन क्रोधे प्रदीप्त भानू । अन्य चाप भारक्षादनू । सज्जी निमिष न लगतां. ॥ ७५ ॥ आकर्ण वोढुनी शरासन । शर सोडिला जैसा शमन । हृदय भेदोनियां पूर्ण । महीमाजी शिरकला. ॥ ७६ ॥ तेणें दुपदा दाटली घुर्मी । निस्विन रथी पडला भ्रमी । काळवेळा भावोनी श्रमी । सूत माघारी रथाते. ॥ ७७ ॥ पांचाळ केला विकळता । सुजयपांचाळसेना तथा । लोटोनी शस्त्रांचा चलथा । वृषसेना ताडिती. ॥ ७८ ॥ येरू धनुर्धरांचा राजा । बाण सोडिले कर्पोनी भुजा । शरीं तयाची करूनी पूजा । विसर्जिले काळाते. ॥ ७९ ॥ सहस्रशः मर्दानी वीरा । शवे भरली वसुंधरा । अर्दित चमू, राजेश्वरा! । देवोनी पाठी निघाल्या. ॥ ८० ॥ धृष्टद्युम्न, धृष्टवृद्धी । द्रोणहनना लोटले युद्धीं । सवें वीरांची महामांदी । अंतकदूतासारखी. ।। ८१ । धांवतां गुरु जाला अग्री । पाठी वीर प्रत्यक्ष आगी । जाणों शंकर महायोगी । गजासुरा धडकला. ॥ ८२ ॥ उभय वीर क्षोभावर्ती । जेवीं अर्णव लोटले शक्ती । शरौघमाळा उसळत पंक्ती । सिंहनादगर्जना. ॥ ८३ ॥ पांचाळपुत्र सिंह तरुण । हरिरव फोडुन त्राण । द्रोणाचार्या पांच बाण । महारोघे ताडिले. ॥ ८४ ।। धनुर्धरां गुरुव द्रोण । काळविखारी पंचवीस बाण । पार्षतातें ताडुनी जाण । चाप हात छेदिले. ॥ ८५ ॥ येरें वोष्ट चावोनी रदनीं । अन्य धनु सजिलें क्षण, तक्षकप्राय क्रोधभरणी । शर शितीं लाविला. ॥ ८६ ॥ जाणों दूत अ तक अंतकाचा । तेजें दिशा डवरिल्या साच्या । देव, गंधर्व बोलती वाचा । क्षेमकर्ता ईश्वर. ॥ ८७ ।। सुसाटती दामिनीसरी । नेत्र झांकिले सकळ वारा। निर्भय कर्ण नयनोद्धारीं । लक्षोनी शर सोडिले. ॥ ८८ ॥ जैसे भूतासा महद्भूत । पाडी धरेसी करुनी प्रेत । तैसा बाण खंडुनी त्वरित । वीरा दीधला. ॥ ८९ ॥ विस्मयमान धृष्टद्युम्न । दश बाण बोपिले कणें । पांच ताडिले द्रोणें । पुत्रं तितुके अर्पिले. ॥ ९० ॥ शल्य ताडिला ६ बाणीं । दुःशासन तीन काळमानी । दुर्योधन क्रोधअयनी । बीस १ विधिले. ।। ९१ ।। सौबळे बळ रोषावर्ती। पांच अर्पिले काळघाती । जाण १. जलधारा. २. अग्नि. ३. घरी, मूच्र्छा (संस्कृत-घूण). ४. गजासुरवधासंबध विनायकमाहात्म्य-अध्याय २ पहा. ५. सिंहासारखी गर्जना करून. गजासुरवधासंबंधे मोरोपंती