पान:महाभारत.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व २३२ नरहरिकृत थोपिला. ॥ ३८ ॥ संपक्ष पाहोनी कणते । रोष नावरे सहदेवातें । चाप सज्जोनी नव बाणांतें । वैकैर्तना ताडिलें. ॥ ३९ ॥ पुन्हा नव नतपर्वणी । रुक्मपिसारे, विचित्रवर्णी । अर्पण करुनी बाणी । सिंहनाद फोडिला. ॥ ४० ॥ हास्यवदन रविनंदनू । शर सोडुनी छेदिलें धनू । सहदेव रोपें प्रदीप्त भानू । अन्य धनु वाहिले. ॥ ४१ ॥ तीक्ष्ण शर सत्याहत्तर । वर्मी ताडिला राधाकुमर । येरूने भरुनी क्रोधनिकर । शर अमित सोडिले. ॥ ४२ ॥ चत्वार तुरंग वातसरी । सह सारथी मर्दिला समरीं । विरथी सहदेव क्रोधलहरी । खङ्गचर्म स्वीकारी. ॥ ४३ ॥ विविध भेद हस्तक्रिया । दावितां पुढां लोटला तया । कर्ण प्रतापी वीरवर्या । कौतुकें शर सोडिले. ॥ ४४ ॥ खङ्गचर्माचे करुनी तुकडे । धरणी पाडिले देहुँडे । सहदेव क्रोधे धडाडे । जाणों वन्ही प्रळयींचा. ॥४५॥ “हती गदा आयससार । बळे झोंकिली कर्णावर । येरें सोडुनी बाण तिखार । खंडुनी धरे पाडिली. ॥४६॥ विफळ जातां गुर्वी गदा । माद्रीय चढे महाक्रोधा । वैडूर्यकीळी शक्ति तदा । महारोघे सोडिली. ॥४७॥ कर्णे विधींनी तीक्ष्ण बाणीं । त्रिखंड करुनी पाडिली धरणी । येरू उदित क्रोधभरणी । चक्र रोपें मोकळी. ॥ ४८ ॥ मार्तडदीप्ती वातवेगें । येतां कर्णे लक्षिलें अंगे । सायक प्रेरुनियां सांगें । खंडुनियां टाकिलें. ॥ १९ ॥ जैसा हतभाग्याचा उदीम । करितां निर्फळ होय श्रम । कीं वांज स्त्रीचा संभ्रम । प्राप्त नहि फळार्थी. ॥ ५० ॥ तयापरी सहदेवाचा । कर्ण वीर धनुर्धरांचा । निर्फळ कर नियां साचा । दीक्षागुरु प्रतापी. ॥ ५१ ॥ सहदेववधा दारुण बाण। शरासनीं योजिला कणें । तंव कुंतीवचनाचे स्मरण । आड रिघे तांता ॥ ५२ ॥ आखडोनी हस्त, प्रेरुनी रथ । बाणकोटीं स्पर्शले त्यातें । म्हः “वीरा ! बॉळमतें । उदित युद्धा जाहलासी. ॥ ५३ ॥ आपणासमान पाहीन योद्धा । त्यासी रण करिजे स्पँर्धा । आतां सोडुनी रणमदा । पार्थयुद्धा मिनिज ॥ ५४ । नाहीं तरी स्वधामासी । जायें, राहें आपुले तोषीं.' । ऐसें वदा सहदेवासी । पांचाळदळी मिसळला. ॥ ५५ ॥ हतरथशस्त्रसामादा १. अडविला, थांबविला. २. आपल्या पक्षाकडील वीरांसह. ३. सूर्यपुत्र जो कणे ये ४. वान्याप्रमाणे चपळ, ५. वांकडेतिकडे, अस्ताव्यस्त. ६. पोलादाची वजनदार गदा. ७. नामक रत्नासारखी तेजस्वी शक्ति, ८. चाकाच्या आकाराचे शस्त्रविशेष. हे फेकले असता " फिरत जाऊन शत्रूवर आदळते व त्याचा नाश करिते. ९. सोडी, फेंकी. १०. सूर्यासारखे ती ११. आवड, हौस. १२. संतानप्राप्त्यर्थ. १३. अर्जुनाशिवाय इतर पांडवांस मारणार नाही कर्णानें कुंतीस वचन दिले होते. १४. बाणाच्या टोंकानें. १५. पोरबुद्धीने, मूर्खपणा" १६, ईष्येने. १७. अर्जुन युद्ध करीत आहे तिकडे जाऊन त्याला मीळ--हा इत्यर्थ,

  • गदा. ७. वैडूर्य

स मारणार नाहीं असे