पान:महाभारत.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ अध्याय) महाभारत. २३१ । ताडिले. ॥ २० ॥ परिघप्राय वृकोदर । नव सायक महाकूर । ताडुनिय कौरवेश्वर । इषुकोटी मोकळी. ॥ २१ ॥ दुर्योधने तीव्र विखारी । विंशती शर हैडंबावरीं । भेदोनी क्रोधे स्तनांतरीं । शरौघमाळा लाविल्या. ॥ २२ ॥ उभय बाणांचे नेहटीं । झाकोळली भूतसृष्टी । तीव्र शरांची होतसे वृष्टी । प्रळयमेघांसारिखी. ॥ २३ ॥ परस्परें शैरलाघव । दाविती शक्तीचे विभव ।। चतुर सारथी हयगौरव । विविधभेद सूचती. ॥ २४ ॥ अत्यंत क्रोध भीमसेना । पांच बाण ताडी दुर्योधना । चाप छेदोनी रणांगणा । बहुशा शर अर्पिले. ॥ २५ ॥ कौरवराजें रोषभरणीं । अन्य धनु सजिलें क्षणीं । नव नाराच अशनीमानी । भीमसेना ताडिले. ॥ २६ ॥ जंभ आणि ६त्रामा ए । यदा मिनले वैरभावीं । तैसे उभयतां प्रतापरवी । एकमेकां ताडिती. ॥ २७ ॥ रोपें प्रदीप्त दुर्योधनू । वृकोदराचे छेदिलें धनू । अन्य चाप सजितां ज्वलीनू । तेंही हातींचे छेदिलें. ॥ २८ ॥ कार्मुकामागें कार्मुक । पांच खंडिलें बाणे सतिख । वीरमांदी हर्षितमुख । दुर्योधना पूजिती. ॥ २९॥ कोठं धरू नेदी हातीं । 'पांडव भीम क्रोधावत । सौदामिनीसमान शक्ती ।। सोडी रोर्षे निघाते. ॥ ३० ॥ कडाडली महाघोजें । सकंप धरा थरके रोजें । वीरमांदीसी भयपिसें । भरुनी नेत्र झांकिती. ॥ ३१ ॥ क्षयाग्नीची प्रदीप्त कीळा । तैसिया तेजें उतरतां तळा । कौरवें लक्षोनियां डोळां । शरप्रयोग मंत्रिला. ॥ ३२ ॥ धनुष्य कर्बोनी आकर्ण । शरत्रय सोडिले ज्वलीन । निर्भ ती शक्तीचा मान । त्रिखंड केले ती ठाई. ॥ ३३ ॥ देखतां संतप्त वृको। क्रोधे गदेसी घातला कर । भ्रमोनी झोंकिली कौरवावर । महोत्राणे याने, ॥ ३४ ॥ येतां देखोनी काळभगिनी । उडी टाकोनी निघे सैन्यीं । नावाची करुनी धुणी । यमसदना वोपिले. ॥ ३५ ॥ खळबळली कौरवनैना । पांडवें शंख स्फुरिले वदना । जयश्रीवारें माद्रीनंदना । वधू द्रोणा धांवला. ॥ ३६॥ सुवर्णरथ जडाव रत्नीं । ध्वजपताका प्रदीप्तकिरणी। पान्यासमान वाँरु गुणी । डळमळिती चहूं दिशा. ॥ ३७॥ रुक्मधनु, प्रभिन्न पाणी । शर सजिले काळमानी । येतां देखोनी कर्ण नयनीं । होवोनी पुढा १. रेटारेटींत. २. आच्छादित झाली. ३. शरसंधान करण्याचे कौशल्य. ४. बाण. ५. हा भस होता व याचा वध इंद्राने केला. म्हणून इंद्राला ‘जंभारि” असे नांव आहे. ६. इंद्र ७. प्रज्वलित, प्रखर. ८. दुर्योधनाची स्तुति करू लागले. ९. धनुष्य. १०. पांडुपुत्र (भीम). ; ; केकिली. १२. भस्म, राख. १३. जयश्रीचे वारे अंग भरून, विजयाने फुगून. १४. सहदेव १५. पाण्यासारखे चंचळ, १६. घोडे,