पान:महाभारत.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. २९ अध्याय] प्रदीप्तकीळीं । सोडिली शक्ती; फोडुनी अरोळी । सात्वैताते निघाते. ॥१२०॥ वारितां नावरोनी अतुर्बळी । भुज छेदोनी विझाले तळीं । अन्य धनुष्य तेजें कल्लोळीं । धर्मराजे सज्जिलें. ॥ १२१ ॥ शर वर्षांनी अपरिमित । बुजोनी काढिला भोजनाथ । येरू धनुर्धरवर्य पंडित । सोडी इषु लघु हस्ते. ॥१२२॥ रथ, चक्र, अश्व, ध्वज, सारथी, । छेदोनी धर्म केला विरथी । खङ्गचर्म स्वीकारुनी भक्ती । येतां तेंही खंडिलें. ॥ १२३ ॥ काळदंडासमान [सत्वरीं] । तोमर टाकिला सात्वतावरी । येरें दुखंड करुनी शरीं । धरेवरी पाडिला. ॥ १२४ । हास्य करुनी प्रसन्न मुखें । शरीं ताडिला कुरुटिळकें । छिन्न कवच, रुधिर बिकें । भूमीवरी वावरे. ॥ १२५ ॥ विगत करुनी युधिष्ठिरा ।। द्रोणरक्षणा पातला त्वरा । विन्मुख धर्म, राजेश्वरा! । अन्यरथीं वैळंघला. ॥ १२६ ।। द्रोणवधनीं अचळ बुद्धी । सात्यकी पुढारतां युद्धी । अश्वत्थामा अमितक्रोधी । वारितां भैमी धडकला. ॥ १२७ ॥ तोची पुढां युद्धप्रसंग । श्रोतेसज्जनीं ऐकिजे सांग । भीमराजकृपेचा प्रयोग । नरहर मोरेश्वर निवेदी. ॥ १२८ ॥ अध्याय एकोणतिसावा. । संजय वदे, “ऐश्वर्यनिधी । भैमी सक्रोध लोटतां युद्धी । पारुष्यवचन दी। दौणीप्रती बोलतू. ॥ १ ॥ म्हणे, “आजी माझिये बाणीं । मृत्यु पावसी समरांगणीं । दुःखें फुटोनी तव जननी । देह त्यागील निश्चयें. ॥ २॥ दोणवंशनिधानठेवा । रणसागरी बुडवी हवा । शोकंतरंगिणीप्रवाहा । वसते कैरीन तयाते. ॥ ३ ॥ येरू वदे, ‘अचाट गोष्टी । वज्रा कैं बेडुक घोटीः । पुनर्वसुपुष्याचिये वृष्टी । हिमालय वाहवे ? ॥ ४ ॥ व्याळविषाचिया घोटीं । याकळ होइजे धूर्जटी? । राक्षसाच्या मिनतां कोटी । हनुमान मानी दरारा ? ॥ ५॥ तयापरी तव प्रतापरोष । अकाळ काळींचे घन'कोस.' । ऐसें वदोनी क्रोधे कर्कश । शरौघमाळा सोडल्या. ॥ ६ ॥ संतप्तमान राक्षसेंद्र । क्रोधे १. सात्वत=यादव=कृतवर्मा. २. सात्वताने. ३. बीक=आवड, सौंदर्य किंवा तेज. (ज्ञानेश्वरी ६।१५ व १३।७०१ पहा). बीकबाळी' या शब्दांतही ‘बीक' याचा अर्थ असाच आहे. रात्रियुद्ध' असे नांव आहे. ६. ह्यांत मूळांतील ४. चढला, बसला. ५. ह्या अध्यायाचें १६६-१७३ अध्यायांचा सारांश आला आहे. ७. कठोरवचन, कडू भाषण. ८. शोकन, दीचा प्रवाह चालू करीन (अश्वत्थाम्यास मारून त्याच्या मातापित्यांस रडावयास लावीन)-हा इत्यर्थ, ९. गिळी. १०. सर्पाच्या विषाच्या एका घोटाने. ११. फोल, व्यर्थ, तुच्छ,