पान:महाभारत.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२७ महाभारत, २८ अध्याय] शिंळाशित कृशानमानी । चापी शर सज्जिले. ॥ ८७ ॥ रुक्मपिसारे हेसरेखा । सोडितां उसळले जैसी उल्का । हृदीं भेदुनी, नरनायका ! । महीमाजी शिरकले. ॥ ८८ ॥ जैसे शिखर वज्रघायीं । खचोनी पडिलें जेवीं मही । तैसा सोमदत्त छिन मही । पडे अजीव धरेतें. ॥ ८९ ॥ सेनाधिप काळसदना । जातां, तयाच्या लोर्टला सैन्या । सायकी प्रतापाचा राणा । इर्षांच्या माळा मोकळी. ॥ ९० ॥ भग्न करुनी कौरवचम् । अनेक मारिले न पवतां श्रम् । सेनामेळे पावोनी भ्रम् । द्रोणापाठी निघाले. ॥ ९१ ॥ हर्षमान यदवीर । पाठी अमित सेनाभार । द्रोणवधीं अत्यादर । सेनामेळीं शिरकला. ॥ ९२ ॥ शर वर्षांनी अनेक । मारी वीर ठळक ठळक । कासावीस वाहिनीमैख । वीर माघां सरकती. ॥ ९३ ॥ पाहोनी द्रोण लोटला पुढा । कामुकीं सज्जोनी कुन्हाडा । सोडितां, धांवले वेगाढा । माघां लोटुनी वायूतें. ॥ ९ ॥ धडकोनियां धार्मिक धर्मा । धरणी पातले विश्रामा । येरें क्षोभोनी वन्हितिम । पांच दोणा अर्पिले. ॥ ९५ ॥ तेणें गुरूते क्रोधभरणी । सृक्विणी चावोनियां दशनीं । शर सोडुनी काळमानी । ध्वजधनुष्य खंडिलें, ॥ ९६ ॥ असत भदौनियां बाणीं । धर्मं ताडिला हृदयस्थानीं । कॅमल दाटतां, वीरश्रेणी । सहस्रशः लोटले. ॥ ९७ ॥ किलकिलाट शब्दस्वर । ऐकोनियां त्रिदशेश्वर । जो निर्मिता सचराचर । विधिगोंधळ ब्रह्मांडें; ॥ ९८ ॥ रुक्मिणीरमण, करुणाघन । राँक्मांगदव्रतपरिपाळण । रुक्मांगदें विराजमान । वियामान खंडिता; ॥ ९९ ॥ चूडामणी, शाङ्गपाणी । चूंडा अक्षयी जगस्वामिणी । चंद्रचूड अचूड ध्यानीं । कैवल्यदानी, अनंतू; ॥ १०० ॥ म्हणे, ‘पार्था ! पुरुषार्था! । द्रोणानीका वीरचलथा । दाटला, तेथे सुभद्राकांता ! । वातवेगें जाइंजे. ॥ १०१ ॥ येरू वदे, “बहुत बरवें.' । स्यंदन प्रेरिला १. साहाणेवर पाजवलेले. २. अग्नीसारखे. ३. प्राणरहित, मृत. ४. तुटून पडला. ह्याचा कत सात्यकी'. ५. सैन्यांतील मुख्य मुख=मुख्य, प्रमुख, ‘मुखं तु वदने मुख्ये तान्ने छद्मनि ना पुमान्' इति भागुरिः, । ६. ओंठ. ७. मूच्छ. ८. रुक्मांगद हा एक ईश्वरभक्तिपरायण शाजा होता. याने एकादशीव्रत, उत्तमप्रकारे पाळून, ईश्वरकृपा संपादिली व आपल्याप्रमाणे सर्व नागरिकांसही वैकुंठलाभ करून दिला. “रुक्मांगद करी एकादशीव्रत । त्यासी पावलासी तु भगवंत । नगरनागरिक लोक समस्त । पुरी नेली वैकुंठा. ॥ ३९ ॥ (देवदासकृत संतमालि ९. रुक्मियाहा रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधु. ह्याच्या मनांतून शिशुपाळाशीं रुक्मिणीचे लग्न लावावयाचे होते; परंतु लग्न लागण्यापूर्वीच कृष्णाने रुक्मिणीस पळवून नेलें व युद्धांत रुक्म्याची विटंबना केली.-अशी कथा आहे. १०• बांगड्या, कंकणे. ११. शंकर,