पान:महाभारत.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ नरहरिकृत (द्रोणपर्व शरांच्या दिव्य पंक्ती । अबिष्ठ, मालव, वंग, नृपती । शिबी, त्रिगर्त, मर्दितू. ॥ ६८ ॥ अभिषाह शूरसेन । महादुर्मद सेनाघन । त्यांतें विगत भीमसेन । करुनी चमू विभांडी. ॥ ६९ ॥ मद्रक, मालव सहानुग । मर्दानी पार्थे केले व्यंग । रक्त मांसाचा कर्दम सांग । धरा देवी व्यापिली. ॥ ७० ॥ छिन्नगात्री विशाळ हस्ती । मैहीप्रपात शैलाती । छत्रे चामरें राजित क्षिती । चतुरंगशवें दाटिलीं. ॥ ७१ ॥ क्रोधं प्रदीप्त द्रोणाचार्य । शर वर्षोंनी अप्रमेय । पांचाळ सुंजय वीरवर्य । अनेकशः मर्दिले. ।। ७२ ॥, उभय वीरांची घोर मिठी । बाणवर्षाव होतसे सृष्टी । मूच्छ सांवरुनी उठाउठी। सोमदंत पातला. ॥ ७३ ॥ दृष्टी देखोनी सायका । वमिता जाला क्रोधउल्का । म्हणे, ‘अधमा ! मम बाळका । भूरिश्रव्या मर्दिलें. ॥ ७४ ॥ परी तू आजी माझिये। बाणीं । वसता होसी काळसदनीं । क्रोधे संरब्ध दंडपाणी । मोकळी कोटी शरांच्या. ॥ ७५ ॥ सात्यकी सिंह वीरराजा । औस्फोटोनी उभय भुजा ।। शर सोडिले ज्यांचिया तेजा। रविकिरण लोपले. ॥ ७६ ॥ परस्परें नाराचजाळीं । आच्छादिले वीर तळीं । जैसा भास्कर मेघमंडळीं । न दिसे दृष्टी जनांच्या. ॥ ७७ ।। असंभ्रांत उभय वीर । रोपें प्रदीप्त बाल्हिककुमर । काळविखारी सात शर । सायकीते समप. ।। ७८ ॥ यादवें करुनियां त्वरा । बाणीं ताडिलें भूपनिकरा । उभय अंगीं रक्तधारा । गळयांपरी लागल्या. ॥ ७९ ॥ विचित्र मंडळ कडोविकडी । दावोनी विंधी बाणप्रौढी । जाणी पडली अग्नीची उडी । तेवीं बाण सुसाती. ॥ ८० ॥ क्रोधं प्रदीप्त बाहिक सूनू । अर्धचंद्र सोडुनी बाणू। खंडुनी सात्यकीचे धनू । धरेवरी पाडिलें.॥८१॥ तापले हस्ते पंचवीस । शर वोपिले सात्यकीस । त्यांवरी आणीक द्वादश । काळविखारी अर्पिले. ॥ ८२ ॥ दुःसह मानोनी वृकोदर । नव परिघ आयस सार । प्रेरी लक्षोनियां जिव्हार । भेदावया नृपाते. ॥ ८३ ॥ सुसाट येता दंभोलीसरी । येरें निरीक्षोनी नेत्रद्वारीं । इषु प्रेरुनी काळविखारी । सपन्याय खंडिले. ॥ ८४ ॥ अत्यंत क्रोध शिनिप्रवीरा । नतपर्वणी तीक्ष्ण शरा। सोडुनियां अति सत्वरा । छेदी धनु हातींचें. ॥ ८५ ॥ त्यांवरी आणीक सात बाण । विधेानी हस्तांचें केलें भग्न । चत्वारि बाण अतिदारुण । चारी अध मर्दिले, ॥ ८६ ॥ त्वरा करुनी शरसंधानीं । सारथिशीस उडविलें बाणा । १. पराजित करी. २. अनुचरांसह. ३. हत्ती पर्वताप्रमाणे जमिनीवर पडले. ४. यमासारखे ५. दोन्ही दंड थोपटून. ६. नाराच=बाण. ७. (कौरवपक्षीय) राजांच्या समुदायास. ८. अध द्राकार बाणविशेष. ९. उत्तम पोलादी. १०. मर्मस्थान. ११. इंद्राच्या वज्रासारखा.