पान:महाभारत.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२३ २८ अध्याय] महाभारत, लावण्यें हेळिती हेमा । वेदनारविंद सांडणे सोमा । वोवाळुनी सांडिजे. ॥ १९ ॥ दिव्य स्पंदन विराजमान । दिव्य भूषण फांकती किरण । दिव्यमान शरासन बाण । रुक्मपुंखी साजिरे. ॥ २० ॥ परम काश्यपी, नागदंत, । वीरबाहु, चौथा दृढरथ, । विरजा, षष्ठ दृढ प्रहस्त, । सुरबाहु, प्रमाथी. ॥ २१ ॥ लोटुनियां वीर एकमांडी । शर सोडिले काळधाडी । न गणोनी वीर अंप्रौढी । उकावला सरोष. ॥ २२ ॥ छेदितां आयुष्याची मूळे । पोश कर्पोनी वोढिजे काळे । “त्स्यपीं फेंकोनियां जालें । वोढोनी आणी वधार्थी; ॥ २३ ॥ ना तो मृगेंद्रे क्षुद्र मृगें । देखोनी आवळी चाटी रागें । तैसा भीमसेन लगबगें । सोडी शस्त्र मृदु हस्ते. ॥ २४ ॥ बाण खडतरुनी कंठनाळीं । शिरें उडविली नभःस्थळीं । जैसी उर्वारुकें खंडी माळी । बाश्रम न होतां. ॥ २५ ॥ जेंवी अष्ट वैसे शापधारा । खचोनी पावले गंगाउदरा । तैसीं अष्ट शिरें वसुंधरा- पोटामाजी शिरकलीं. ॥ २६ ॥ चंडवाते पर्वतमौळीं । उमळोनी वृक्ष पडती तळीं । तैसीं कळेवरें तेजळीं । प्राप्त जालीं महीते. ॥ २७ ॥ हाक वाजली एकसरा । कौरववीर धावले सैरा। क्रोध कॅर्णकुमरा । बंधुद्वय लोटले. ॥ २८ ॥ कर्ण भ्रातर वृकरथनामा । होवोनी एकत्र ताडी भीमा । [उसळे निराळीं चंडधामा] । महारोडें शराग्नी. ॥ २९ ॥ पांडवें सरसावोनी धनू । शर सोडिले प्रदीप्त भानू । विखंडूनी रुचिरतनू । अंतकधामा वोपिले. ॥ ३० ॥ सौबळबंधु, शरभ, गवाक्ष । शरसंधान परम दक्ष । सोडुनी बाण अलक्ष लक्ष । भीमतुरग मर्दिली. ॥ ३१ ॥ रोपें युधिष्ठिर परम तापें । लोटला क्रोधे कृतांतमापें । वर्षांनी इषु विषरूपें । भूपपंक्ती पाडिल्या. ॥ ३२ ॥ अंबिष्ठ, मालव, त्रिगर्त, । इ १. कमीपणा आणिती, तुच्छ समजती. २. मुखकमल (अरविंद कमल). ३. सांडणे= वाइन टाकणे. त्यांच्या मुखकमलावरून चंद्र ओंवाळून टाकावा, इतके ते सुंदर होते-असा भाव. ५. स्वत:च्या पराक्रमानें. ५. जाळे. ६. धीवरांनी. (१) ७. सिंह. ८. ऑठ, जिभल्या. ९. आकाशांत. १०. वाळके (ही एक कांकडीची जात आहे). ११. 'अह, धर, ध्रुव, सोम । अनळ, अनिळ, प्रत्युष, परम । प्रभास आठवा अतिउत्तम । अष्टौ नामें आठांचीं ॥' (मुक्तेश्वर-आदिपर्वअध्याय १४८२), ह्या अष्टवसुंस तुह्मांस मृत्युलोकीं जन्म घडेल' असा वसिष्ठाचा शाप होता. त्याप्रमाणे ते सर्वजन गंगेच्या पोटीं आले, त्यांपैकी पहिल्या सातांस तिने पाण्यात बुडविले. आठवा भीष्म मात्र तिने पाण्यात बुडविला नाही. (मुक्तेश्वरकृत आदिपर्व-अध्याय २२ ओंव्या ९७-१३६ पहा). १२. उपटून. १३. तेजस्वी, १४. वृषसेनास. १५. कर्ण व त्याचा भाऊ वृकरथ.