पान:महाभारत.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ नरहरिकृत [द्रोणपर्व अही । कीं रामानुज अँणमही । देखतां रावण फुफाटे; ॥ ४ ॥ तयापरी क्रोधानळीं । सोडिता जाला विशाळ भाली । उभय वीरांची दाटली फळी । जयआस्था सारिखी. ॥ ५ ॥ भीमें नतपर्वणी नव शरीं । कौरवे विधिला स्तनांतरीं । येरू प्रज्वळोनी वन्ही सरी । ताडी सात्वता शत बाणीं. ॥ ६ ॥ परस्परें सायकसंगीं । एकमेकां भेदिले अंगीं । जाणों पर्वत गेरुरंगी । तेवी वीर डंवरिले. ॥ ७॥ येरयेरां शस्त्रभेद। दावोनी, देती महाखेद । सायकी वदे, ‘वयोवृद्ध । तू बैंयाती आमुते ॥ ८ ॥ येरू संतप्त पुत्रवधीं । शर सोडिले काळक्रोधी । सायकीतें भेदोनी हृदीं । महीमाजी शिरकले. ॥ ९ ॥ क्रोध नावरे वृकोदरा । परिघप्राय सोडुनी शरा । मस्तकीं ताडोनी राजेश्वरा । न गणोनी वेथा धांवला. ॥ १० ॥ शिनिपुंगवे काळविखारी । शर योजिले अशनीसरी । सोडितां भेदिले जिव्हारीं । जाणों धडका विजांचा. ॥ ११ ॥ छिन्न होवोनियां गात्रीं । पडता जाला स्पंदनपात्रीं । मोहो वीरांतें पाहोनी नेत्रीं । बाल्हिक पुढां लोटला. ॥ १२ ॥ शर सोडिले प्रभिन्नवर्य । जेवी वर्षाकाळीं वर्षिजे तोर्य । बाणी आच्छादिला देवसूर्य । पडे अंधार संग्राम. ॥ १३ ॥ कासावीस वीरवाहिनी । भीमसेना क्रोधाभरणी । सात्यकीअथ नव बाणीं । बाल्हिकवीर ताडिला. ॥ १४ ॥ येरू प्रज्वळोनी क्रोधावती । शितीं प्रेरिले महॉईंती । उसळोनी भेदुनी भीमाप्रती । पार जाती धरेत. ॥ १५ ॥ गजघर्षणीं डळमळी वृक्ष । तैसा भीम थरके रुक्ष । गैदा साधना परम दक्ष । वसोनी हस्तीं धांवला. ॥ १६ ॥ बळे वोपुनियां घावो । शतचूण केला जदेहो । जैसा पक कपित्थं सोडितां ठावो । चूर्ण होय ज्यापरी. ॥ १७ ॥ भयें थोकले महावीर । तव पुत्रांसी क्रोधभर । रणा लोटले अष्ट भ्रौतर । भीमसेना निघाते. ॥ १८ ॥ जाणों अष्ट भैरेवांच्या प्रतिमा । रूप | १. सर्प. २. लक्ष्मण. ३. रणस्थानीं, युद्धभूमीवर. ४. जयप्राप्तीविषयी काळजी. ५. कौरव क्षांतील योद्धा (सोमदत्त). ६. शोभले. ७. ययातीप्रमाणे तरुण. ययातीस जरावस्था प्राप्त झा पण विषयवासना तृप्त झाली नव्हती ह्मणून त्याने आपल्या पूरुनामक पुत्रापासून तारुण्यावर घेतली व त्यास आपलें वार्धक्य दिले–अशी कथा आहे. ८. भूरिश्रव्याचे वधामुळे, ९. व्यथा, १०. मर्मस्थानीं. ११. पर्जन्यकाळीं. १२. पाणी, जल. १३. सात्यकीचा बचाव करण्यास १४. अत्यंत तेजस्वी बाण. १५. गदा हातात घेऊन. १६. बाल्हिक राजाचे १७, कंवठ, कंवठीचें फळ. १८. तुझ्या (धृतराष्ट्राच्या) मुलांस. १९. मूळांत ‘दहा' अस " " (अध्याय १५७।१६). २०. भैरव=शिवाचे एक उग्र स्वरूप. भैरव आठ आहेत त्यांची नाव असितांग, रुद्र, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल (किंवा कुपति), भीषण आणि संहार.