पान:महाभारत.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० अध्याय महाभारत. १६१ पांडवसेना दाटली मू । व्यूहद्वारी आकांतू. ॥ ८६ ॥ उपेक्षोनी यादववीरा । द्रोण पातला व्यूहद्वारा । सात्यकी लोटला पुढारा । पार्थ मागें वसोनी. ॥ ८७ ॥ पुढां देखिली कांभोजसेना । जाणों समुद्र लोटला रणा । रथी लाटा उसळती त्राणा । गजाश्वपती जळचरें. ॥ ८८ ॥ निबिड गजाची देखोनी मांदी । हृष्टमानसें केसर संधी । उकावे जैसा प्रतापनिधी । तेवीं माधव हर्पतू. ॥ ८९ ॥ उल्हासोनी सारथियातें । बोलता जाहला प्रसन्न चित्तें । म्हणे, ‘पाहें पां मृत्युगृहातें । उदित जाहले सर्वही. ॥ ९० ॥ द्रोणानीका भेदोनी पाहीं ? । हतवीर्य केला भोज तेंहीं । कांभोजकेवा केतुला काई ? । मर्दानी मही निजवीन. ॥ ९१ ॥ शक, किरात, दर्दर, बर्बर।। ताम्रलीस्यक महाशूर । अन्य म्लेंच्छ प्रतापी वीर । करीन क्षीण क्षणार्धं. ॥ ९२ ॥ सूता ! माझ्या स्फुरती बाह्या । दृष्टी पाहीन धनंजया। आणि श्रीनिवास कल्याणच्छाया । जनार्दना विश्वात्मा. ॥९३॥ मुरुनिधनी, मधुहंता। विश्वनिवास, त्रिजग सत्ता । उरुगाय, विक्रमपूर्णसरिता । तो या नयनीं पाहीन आवडी. ॥९४॥ परात्पर, अविनाशी । मायानियंता, हृषीकेशी । सच्चिदानंद, चिद्विलासी । विजयप्रीति श्रीकृष्ण. ॥ ९५ ॥ तो समस्त फाल्गुनरथी । असतां जयाची कायसी खंती ? । मीही आजी नृपाच्या पंक्ती । बाहुविक्रमें मर्दीन. ॥ ९६ ॥ पाहीं पां सुमित्रा ! सुता! ताता! । कैशा शवाच्या पडल्या चलथा? । अर्जुन विक्रमासी उमॉणितां । बुद्धि भ्रामक गुरूची. ॥ ९७ ॥ त्याचा शिष्य मी रणांगणीं । चोज दावीन तुझ्या नयनीं । भिडवीं रथ महादाटणी । कांभोजाची जे ठाई. ॥ ९८ ॥ रजधूळीची पडली सायी । वीर कालविती वीरश्रीघाई । शंख स्फुरी विश्वगोंसावी । आणी जयश्री अर्जुना, ॥ ९९ ॥ गोपीगोपाळपरिपाळण । उपेंद्र, वामन, अरिसूदन । यमुनापुलिनविहारण । दीनोद्धारण, श्रीमूर्ती. ॥ १०० ॥ बालार्ककिरणी वानरकेतू । दुरुनी दिसे लखलखितू । जयद्रथाचा पुरला अंतू । जाण निश्चित सुमित्रा !?? ॥ १०१ ॥ सूर्य असतां अंतर एक याम । प्रेरी वारू उत्तमोत्तम । कुशळ सारथी हर्षसंभ्रम । मधुररवें अनुवादे. ॥ १०२ ॥ म्हणे “स्वामिया ! प्रतापमूर्ती ! । समान विक्रम रतिपती । वीरवर्या ! प्रख्यात कीर्ती । शरांची गती अनिवार. ॥ १०३ ॥ तव विक्रम तंव केसरी । कांभोज॑गज पावेल हारी । १. सिंह. २. सात्यकी. ३. द्रोणाच्या सैन्याला. ४. मोठ्यांनीं स्तविलेला, विष्णु, ५. तुलना करून पाहतां. ६. सावली. ७. जगन्नाथ. गोसावी=स्वामी. ८, प्रहर. ९. कांबोज देशचा राजा हाच हत्ती. २३ न० द्रो०