पान:महाभारत.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० नरहरिकृत [द्रोणपर्व युद्धा मिनले कदनीं । तैसे उभयतां क्रोधभरणीं । एकमेकां विधिती. ॥ ६७ ।। क्रोधे संतप्त द्रोणाचार्य । जाणों ग्रीष्मींचा तीव्र सूर्य । काळविखारी शरत्रय । पूर्ण ललाटी भेदिले. ॥ ६८ ॥ तेणे शोभला शिनिप्रवीर । जाणों शैलासी तीन शिखर । क्रोधं क्षोभोनी सात्वत वीर । बाण रोपें मोकळी. ॥ ६९ ॥ अशनीसमान सुसाट घोषं । येतां द्रोण लक्षी रोपें । शरद्वय ताडनी केर्कश ।। धरेवरी पाडिले. ॥ ७० ॥ लघुलाघव मंत्रक्रिया । जाणता गुरु महाराया! । कौतुकें हास्य करुनियां । शर बाहत्तर समर्प. ॥ ७१ ॥ त्यांवरी आणीक पांच शत । वोपिता जाहला क्रोध अद्भुत । सात्यकी चतुर निवारीत । जेवीं पंडित शब्दाते. ॥ ७२ ॥ अत्यंत क्रोधे शिनिपुंगवें । सहस्रशः वोपिले होवे । त्यांहीमाजी लघुलाघवें । दाहा द्रोणा भेदिले. ॥ ७३ ॥ रुधिर प्राशोनी भरले अवनीं । जेवीं वारुळीं विशाळ फणी । आचार्य शोभला चौगुणी । जाण प्रळयींचा चंडांशु. ॥ ७४ । नतपर्वणी तीक्ष्ण शर । भृकुटी ताडिला शिनिप्रवीर । ध्वजा विधिला बाण क्रूर । सात सैंता वोपिले. ॥ ७५ ॥ चहूं हयांसी तीन तीन । अर्पिले शर अतिदारुण । काळविखारी प्रेरुनी बाण । शरासन खंडिलें. ॥ ७६ ।। तेणे क्रोधार्णवा भरतें । दाटोनी पूर्ण सात्वताते । गदा प्रेरिली दोणातें । विजूमान सरोघे. ॥ ७७ ॥ गुरु जुझारांचा राव । शर खंडुनी पुसिला ठाव । रोपें प्रदीप्त हव । चाप अन्य सज्जिलें. ॥ ७८ ॥ शिळाशित तीक्ष्ण शरीं । भेद करुनी स्तनांतरीं । सिंहरव फोडुनी समरीं । बाण सात वोपिले. ॥ ७९ ॥ रोष अत्यंत द्रोणाचार्या । शक्ति टाकिली, महाराया ! । बारितां भेदोनी दक्षिण बाह्या । महीमाजी शिरकली. ॥ ८० ॥ सवेग करुनी तातडी । अर्धचंद्र नाराच प्रौढी । प्रेरुनी चाप मुष्टीवडी । छेदोनियां टाकिले. ॥ ८१ ॥ संतप्त माधव क्रोधभरें । अन्य धनु सज्जिले निकरें । आकर्ण चाप कर्षांनी त्वरें । शर दुर्धर सोडिला. ॥ ८२ ॥ उसळोनियां दामिनीमानी । सारथिशिरा उडविलें गगनीं । पाहत असतां द्रोण नयनीं । सेनाश्व वेगीं उधळले. ॥ ८३ ॥ चत्वार दिशा भ्रमत रथ । पाठीं वीर धांवले बहुत । राहिले वीर शूर सात्वत । दंडी शरनिघालें. ॥ ८४ ।। क्षतें पैरिप्लुत रुधिरधारा । अर्दित भूप निघाले सैरा । मोकळा पंथ राजेश्वरा । शिरके पुढा सात्यकी. ॥ ८५ ॥ द्रोण सेनाश्व बुजावोनी । रथ आणिला रणांगणीं । १. वज्राप्रमाणे. २. कठिण, असह्य. ३. शब्द-शुष्क वादविवाद, वायफळ बोलणे. ४. त्वेषानें. ५. सूये. ६. सारथ्यास. ७. मूठवट, मूठ. ८. सात्यकी. ९. परिपूर्ण, भरलेले. १०. चुचकारून शांत करून, थावरून.