पान:महाभारत.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ २० अध्याय महाभारत. बेगें । भदोनी काढिली अष्टही अंगें । अवनी पडुनी जैसे रोगें । व्याधिग्रस्त प्राणी ज्यापरी. ॥ १८ ॥ ‘अहा !' शब्द माजला रणीं । पडिला राजा काळवदनीं । ऐकोनी धाविल्या वीरश्रेणी। कृतवर्मा समवेत. ॥ ४९ ॥ येतां देखोनी भोजरायतें । क्रोध नावरे सात्यकीतें । रथ थडकोनी तयातें । स्फुरी चाप सरोष. ॥ ५० ॥ येरयेरां पडतां मिठी । सक्रोध भृकुटी घातल्या गांठी । वोढोनी धनुष्याच्या मुष्टी । सोडिती कोटी शरांच्या. ॥ ५१ ॥ उकावोनी एकमेकां । शर ताडिती जैशा उल्का । सिंहरवें फोडिती हांका । ‘मारिलासी' म्हणोनी. ॥ ५२ ॥ सरसराट शरासन । सुसाट उठती प्रभिन्न बाण । हस्तलाधवकळानिपुण । न्यून अधिक न गणवे. ॥ ५३ ।। शरमय जाली अवघी धरा । खचों पाहती तेजें तारा । दिग्गज मानोनी दरारा । सोडों थारा वांछिती. ॥ ५४ ॥ सिंहाऐसे हुंकारिती । वृषभाऐसे फुफाटिती । व्याळाऐसे फूत्कारिती । उसळती सक्रोध. ॥ ५५ ॥ ऐसी मांडली रणधुमाळी । उभय वीर अतुर्बळी । कृतवर्मा कुशळांजळी । बाणजाळीं वर्षला. ॥ ५६ ॥ सदुसष्ट शर काळमानी । सात्यकी ताडिला गात्रस्थानीं । सात नाराच समानवन्ही । सारथीयातें विधिले. ॥ ५७ ॥ चहूं वारूंसी सायक चार। ध्वजासी अर्पिला एक शर । रुक्मकार्मुक मनोहर । त्वरा हातींचे खंडिलें. ॥ ५८ ॥ सात्वत वीर प्रतापराशी । न गणोनी त्याचिया बाणासी । कार्मुक सज्जोनी महारोषीं । रुक्मभाली सोडिल्या. ॥ ५९ ॥ चौसष्ट विधिले योत्तमा । सात सारथ्यां ताडिले नेमा । काळविखारी वन्हीसमा । शर तीक्ष्ण सोडिले. ॥ ६० ॥ सुसाट उतरुनी अंतराळीं । भेदिले भोजाचे हृदयकमळीं । कवच भेदोनी विझाले तळीं । रक्तस्राव भूमी जाहला. ॥ ६१ ॥ शरचाप गळोनी हातीं । रथी पडुनी खिन्न चित्तीं । वीर लोटतां साह्याप्रती । सात्यकी क्रोधे धडाडी. ।। ६२ । शर वर्षांनी काळधाडी । भरल्या शवांच्या उतरडी । मुखें करुनी देहंडी। वांचले वीर निघाले. ॥ ६३ ॥ अर्दित सेना हलकल्लोळ । शब्द माजला घोर तुंबळ । जेवीं गोळा आवाजे. ॥ ६४ ॥ चाप वोदितां सुसाट शर । कीं वातस्पर्शे लोटला हर । तैसा पातला द्रोण वीर । वातवेगें सरोष. ॥ ६५ ॥ धडकोनियां क्रोधानळीं । केली शरांची साउली । उभय वीर अतुवळी । येरयेरां ताडिती. ॥ ६६ ॥ जैसा वैञी आणि विरोचनी । निकरें १. शरीराची आठ अंगे. २. मारिला गेलास. ३. सात्यकी. ४. आकाशांतून. ५. वांकडीं. ६. दुःखी, जखमी. ७. आवाज करितो. गोळा=तोफेचा गोळा. ८. इंद्र. ९. वि रोचनपुत्र (बळी). बळीने इंद्रपद प्राप्त करून घेण्याची खटपट चालविली होती–हें प्रसिद्धच आहे,