पान:महाभारत.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ नरहरिकृत [द्रोणपर्व राजा । शर वर्षोनी फोडिली भुजा । सात्यकी झुंझार महातेजा । लीले धनुष्य कर्षिलें. ॥ २९ ॥ बाण सोडुनी काळघाती । सहनिषाद मारिला हस्ती ।। अनेक वीर पाडिले क्षिती । उरले गेले अष्ट दिशा. ॥ ३० ॥ हांक वाजली संग्राम । द्रोण धांवला क्रोधऊर्मी । वेष्टित वीर राजसत्तम । चतुरंग शूर अफाटे. ॥ ३१ ॥ वेढे घालोनी माधवा देखा । “घ्या, घ्या' शब्द फोडिती हाका । आच्छादिलें शरीं अर्का । मार्ग वाता न होय. ॥ ३२ ॥ द्रोणें उसळोनी क्रोधानळीं । सत्याहत्तर अर्पिल्या भाली । दुर्मर्षणे क्रोध उकळी । बारा बाण वोपिले. ॥ ३३ ॥ दुःसह मानोनी दुःसहें । दश शर अर्पिले महावर्य । त्रिषष्टि बाण वन्हिप्रमेय । विकणे यादवा ताडिले. ॥ ३४ ॥ दुर्मुखें वोपिले दश तीक्ष्ण । आठ अर्पिले दुःशासने । चित्रसेने दोन ज्वलीन । हृदयवर्मी। भेदिले. ॥ ३५ ॥ मग ते शर काळमानी । दुर्योधनें वोपिले पाणी । अन्य। वीरीं प्रभिन्न बाणीं । बुजोनी तया काढिलें. ॥ ३६॥ वीर सात्यकी धनुर्वाडा। क्रोधे रगडुनी तीव्र दाढा । शर सोडुनी झडझडा । विंधी वीरां प्रतापें. ॥ ३७॥ भारद्वाजासी तीन शर । ताडिले हृदयीं महा थोर । काळविखारी द:सह घोर । नव बाणीं भेदिला. ॥ ३८ ॥ विकर्णा ताडिले पंचवीस । दुर्मर्षणा बारा काळविष । विविंशती करुनी कासावीस । च्याही रोपें ताडिले. ॥ ३९ ॥ सत्यव्रत विधिला दाहा बाणीं । विजया नव अर्पिले क्षणीं । चाप छेदोनी पाडिलें धरणी । काळसर्पसारिखें. ॥ ४० ॥ छिन्नधन्वा राजकुमर । पाहोनी लोटले कौरववीर । सात्यकी प्रताप मल्लशूर । सोडी कोटी शरांच्या. ॥ ४१ ।। जैसी खगेंद्राची प्रताप उडी । काद्रवेयसेना देशधडी । तैसी वीरविगतप्रौढी । दुर्योधन लोटला. ॥ ४२ ॥ सवें बंधु भूपती श्रेष्ठ । वर्षाव करिती शरांच्या वृष्ट । सात्यकीवीर बळवरिष्ठ । कर्वी धनुर्विद्या ते. ॥ ४३ । एकएकासी पांच बाण । त्यांवरी आणीक सात ज्वलीन । अर्पण करुनी उडवी तृण । वायु जेवीं । ज्यापरी. ॥ ४४ ।। दुर्योधना काळविखारी । चत्वारि शर स्तनांतरीं । वोपोनी आणीक त्यांवरी । आठ रोपें निघाते. ॥ ४५ ॥ हास्य करुनी प्रसन्नवाणी । चाप छेदोनी पाडिलें धरणी । रत्नखचित शोभा किरणी । खंडुनी वेगें टाकिला. ॥ ४६ ।। चत्वारि बायो च्यान्ही हय । मर्दानी स्वर्गी वोपिले सोय ।। शर एक भेदुनियां वर्य । सारथिशिर उडविलें. ॥ ४७ ॥ रोपें सायक वषांनी १. लढवय्या. २. सूर्यास. ३. आपल्या हाताने सोडिले. ४. चार (बाण). ५. सपचे सैन्य ६. वृष्ट-वृष्टि. ७. सात्यकीने धनुष्य ओढिले नाही तर जणु काय धनुर्विद्याच ओढिली–असा भाव,