पान:महाभारत.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० अध्याय] महाभारत, १५७ ॥ १२ ॥ गजारोह विगतगात्री । ध्वजा पताका लोळती धात्री। घंटा, चामरें, भूषणे, शस्त्रीं । धरादेवी ढेसैली. ॥ १३ ॥ ऐसी विवर्ण देखोनी सेना । क्रोधे संतप्त, जरासंधराणा । उसळोनी रोषे अहिमाना । सात्यकीतें तगटला. ॥ १४ ॥ भाळीं आरक्त चंदनटिळा । मुगुट कुंडलें फांकती कीळा । रुक्मकवच शोभती माळा । मुक्तायुक्त साजिन्या. ॥ १५ ॥ रोषे कार्मुक वोढोनी बाहीं । शर सोडिले समान अही । हृदय भेदोनी निमाले मही । सात्यकीतें ते काळीं. ॥ १६ ॥ हास्य करुनी निज कौतुकें । शर सोडिले विशाळ तिखे । धनुष्य छेदोनी खुडिलें बिकें । शराचे जाण निघाते. ॥ १७ ॥ तयामाजी तापल्या खांदी । पांच नाराच अर्पिले हृदीं । वर्षेनी शरांची महामांदी । बुजोनी मागध काढिला. ॥ १८ ॥ येरू अकंपत जैसा स्थाणू । रोपें पावोनी अन्य धनू । ‘तिष्ठ यादव !' म्हणोनी घन् । शब्द फोडी भैरव. ॥ १९ ॥ कर्पोनी धनु सोडी शर । सोडुनी भेदिलें जिव्हार । सात्वते बाण पेलोनी सत्वर । चाप हातींचे खंडिलें. ॥ २० ॥ च्युतकार्मुक धडाडी क्रोधे । जेवीं व्याळ क्षोभे ताडितां पदें । तोमर प्रेरिला रोषं विशदें । सात्यकीतें निघाते. ॥ २१ ॥ उसळला काळदंडसरी । येरे दोन तीन शरीं । त्रिखंड करुनी वरच्या वरी । महीवरी पाडिला. ॥ २२ ॥ वृथा तोमर जातां पाहीं । मागध फुफाटे जैसा अही । शंतचंद्र ढाल कर्पोनी बाहीं । खङ्ग करीं घेतले. ॥ २३ ॥ पुसोनी धार, टाकिली उडी । रोपें धांवला महाप्रौढी । थरकसरक घालोनी उडी । सात्वतधनु छेदिले. ॥ २४ ॥ येरू सावध धनुर्वाडा । अन्य कार्मुकीं वाहिला मेढी । इषु सज्जोनी काळदाढा । बाहुद्वय उडविलें. ॥ २५ ॥ धांव पुरुनियां गगनीं । तळीं उतरले जैसे फणी । त्वरा ॥ करुनी शरसंधानीं । मौळ व्योमा धाडिलें. ॥ २६ ॥ तारा तुटोनी पडे तळीं । मुगुटकुंडलें प्रदीप्त कीळीं । तैसे शिर खचोनी धुळी । मिळे उसाळी महीते. ॥२७ ।। मगध वीर पडला रणीं । “हाहाकार सेनावदनीं । वीर अनेक लोटले रणीं । सहनिषाद अमित. ॥ २८ ॥ गजारूढ निषाद | १. हत्तीस्वार, २. जमिनीवर. ३. पूर्णपणे भरली. ४. निस्तेज, उत्साहरहित. ५. मूळांत जलसंध' असे नांव आहे (अध्याय ११५४०). ६. तेज. ७. बिकें=तेजानें, पराक्रमाने. ८. नि ल, ९, मर्मस्थान. १०. जीवर शंभर चांदण्या किंवा टिकल्या लावल्या आहेत, अशी ढाल. ११. धनुष्याची दोरी. १२. जलसंध' व मागधांचा राजा जरासंध' या दोन नांवाचा घोटाळा करून कवीने जलसंधास येथे मागध बनविले आहे. जरासंधाला राजसूय यज्ञाच्या पूर्वीच भीमा मारिलें होते, हे वाचकांस अवगत आहेच.