पान:महाभारत.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ नरहरिकृत [द्रोणपर्व श्रीगुरु भीमराज कृपादृष्टी । करितां, निवाली मानससृष्टी । नरहरि मोरेश्वर केतकीपृष्ठीं । भगवद्णी द्रावला. ॥ १४९ ॥ अध्याय विसावा. | संजय वदे, ‘महाभागा ! । तव दुर्मत्र भोंवले जगा । क्षय पातला भूपवर्गा । सह सेना पार्थाते. ॥ १॥ असो, आतां कायसी खंती ? । पांडवी सेना विगतगती । करुनी, पातला सात्यकीप्रती । कृतवर्मा प्रतापें. ॥ २ ॥ आकर्ण वोढोनी शरासन । सक्रोध वीस ज्वलित बाण । अर्पण करितां महात्राणे । सायकी रोषे धडाडी. ॥ ३ ॥ तुळोनी उभय दोर्दडे । शर सोडिले काळदंड । सूताश्वधनुपृष्ठरक्षकसँड । मर्दिले घायी एकदा. ॥ ४ ॥ विरथी हार्दिक्य छिनधन्वा । “आहा !! शब्द माजला तेव्हां । द्रोण धांवला जैसा मघवा । क्रौंचयुद्धा निघाते. ॥ ५ ।। सवें वीरांची अमित मांदी । पदाती, वाजी, कुंजर, क्रोधी । दुर्योधनाचिया हिती बुद्धी । जीवोदार सर्वही. ॥ ६ ॥ रथिवीरांची प्रभिन सेना । गैजानीकाशीं त्रिगर्तराणा । लोटता जाहला रणांगणा । सर्वाभरणी भूषितू. ॥ ७ ॥ प्रमत्त गज पर्वतसरी । की ते पाळे जळदहारी । घंटा, नूपुरें, चामरें पुरीं । तेजें 'इँषिती सोते. ॥८॥ वरी विराजित राजकुमर । भूषणे भूषित प्रतापशूर । करी ज्वलित कार्मुक शर । हेमपुखी झळकती. ॥ ९ ॥ वर्षोनियां तीव्र घाई । करिते जाहले शरांची साँई । सात्यकीवीर विजयी बाहीं । मोकळी कोटी ईंधूच्या. ॥ १० ॥ शरामागें शराची सुटी । जाणों उसळल्या दामिनी कोटी । खंडबिखंड शरांच्या थाटी । पडत्या जाहल्या बीभत्स. ॥ ११ ॥ शुंडादंड विच्छिन्नरद । खंडमान वेगळे पाद । भैरवं शब्द फोडिती विशद । रुंदमान किंकाळ्या. ई १. या अध्यायाचे ‘सात्यकीसेनाप्रवेश' असे हस्तलिखित पोथीत नांव आहे. २. ह्या अध्यायांत मूळांतील ११५-१२० अध्यायांतील कथानकाचा गोषवारा आला आहे. ३. दुष्ट मसलती. ४. आतां दु:ख करून काय उपयोग ? ५. दोन्ही दंड उभारून. ६. घड=स- मुदाय. ७. ज्याचे धनुष्य तुटलें आहे असा. ८. क्रींच=हिमवान पर्वतास मेनेपासून झालेला पुत्र. इंद्राने आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडिले-ही कथा प्रसिद्धच आहे. ९. जीवावर उदार, मरण्यास तयार. १०. घोडदळासह, ११. समुदाय. १२. मेघपंक्ति. १३. चंद्रास उणेपणा आणिती. १४. छाया, साउली. १५. सोडी. १६. वाणांच्या कोटी,. कोट्यावधी बाण. १७. भयंकर.