पान:महाभारत.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ अध्याय] महाभारत, १५५ सोडिलें. ॥ १३२ ॥ उसळोनियां काद्रवेयमानी । भेदोनी गात्रीं रिघाले धरणी । रुधिरस्राव ताम्रवर्णी । जाणों नदी पर्वतीं. ॥ १३३ ॥ तेणे शोभला यादवबळीं । जाणों किंशुक फुलला फुलीं । हर्षे करुनी दारोळी । कार्मुक बळे कॅर्षिलें. ॥ १३४ ॥ तव भीमसेने करुनी त्वरा । शरत्रय वोपिले भोजकुमरा । पांडव वीर एकसरा । तीन तीन सर्वी ताडिले. ॥ १३५ ॥ बाप कृतवर्मा अस्वयुद्धीं । शरें शर निवारूनी संधी । बाण सोडुनी काळक्रोधी । सात सात वीरा अर्पिले. ॥ १३६ ॥ शिखंडी लोटतां संग्रामा । हास्य करुनी कृतवर्मा । शर सोडुनी अग्निप्रतिमा । धनु हातींचे खंडिलें. ॥ १३७ ॥ तेणें पावोनी क्रोधावर्ती । खङ्ग चर्म बसवोनी हातीं । धडकोनी भोजरायाप्रती । धनु हातींचे खंडिलें. ॥ १३८ ॥ पांडव वीर ऍकवळा । तीन तीन शर वोपिले सकळां । कृतवर्मा जाणती कळा । अन्य चाप सज्जिलें. ॥ १३९ ॥ क्रोधउल्का वमोनी वदनीं । शिखंडी ताडिला त्रिपंचबाणीं । येरें अन्य चाप वाहोनी झणी । करी वृष्टी शरांची. ॥ १४० ॥ कृतवर्मा भीष्मनिधन । स्मरुनी क्रोधं प्रज्वळला पूर्ण । म्हणे, ‘यातें कृतांतसदन । दावणे आतां निधारें.' ॥ १४१ ॥ ऐसें कल्पोनी निजमानसीं । शर कर्षांनी पूर्ण धनुषीं । ताडिता जाहला शिखंडीसी । सत्याहत्तर एकदा. ॥१४२॥ त्यावर सात काळानळीं । अर्पिता जाहला हृदयकमळीं । शिखंडी वमोनी रक्तगुरळी । पडे मूर्च्छित धरेते. ॥ १४३ ॥ कैवारातें पांडववीर । धांवतां त्रासिले पांडववीर । छिन्नगात्रीं गळिती रुधिर । निझरोदकासारिखें. ॥ १४४ ॥ सन्मुख यावया आवांका । कोण्हा नोहे, नरनायका ! । कैकय, सुंजय, पांचाळ, देखा । विन्मुख पांडव भीमादि. ॥ १४५ ॥ शरपीडित सेनामांदी । व्यत्यस्त वीर निघाले युद्धीं । स्तविती वीर प्रतापनिधी । भोजपती धनुर्वाडा. ॥१४६।। निस्वन वीर करुनी सकळ । मागां लोटले जैसे फोल । न चले कोण्हाचेही वळ । वीर दुर्धर कृतवर्मा. ॥ १४७ ॥ असो पुढां युद्ध दारुण । वीररसाची भरणी पूर्ण । श्रोते सज्जनीं कथाश्रवण । पान आदरें करावें. ॥ १४८ ॥ १. सपाप्रमाणे. २. लढाईत जखमा लागलेल्या वीरांस फुललेल्या पळसाची उपमा देण्या संस्कृत व मराठी कवींचा सांप्रदाय आहे. (मागे अध्याय १७ ऑवी ३८ पहा). ३. मोठी रोळी, गर्जना. ४. धनुष्य. ५. ओदिले, ६. चर्म=ढाल, ७. जमाव. ८. साह्याई ९. धैर्य, अवसान.