पान:महाभारत.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ नरहरिकृत [द्रोणपर्व येतां मिनले पांडवभार । महावीर शिनिप्रवीर । कांभोजसेने शिरकले. ॥ ११४ ॥ कृतवर्मा सात्यकीपाठी । धांवतां पांडवी घातली मिठी । सेनाअर्णव लोटितां लोटीं । वेळा थोपी कृतवर्मा. ॥ ११५ ॥ अद्भुत विक्रम यादवाचा । देखिला समरी तीव्र साचा । बोते वोतला सेनेचा । एकसरा निघाते. ॥ ११६ ॥ संतप्त भीम क्रोधानळीं । भोज ताडिला तीस भाली । हर्षे शंख स्फुरिला कीळीं । आनंदकारी चमृते. ॥ ११७ ॥ उसळोनी वीर एकसरा । ताडिते जाहले यादववीरा । सहदेवे करुनी त्वरा । वीस बाण । अर्पिले. ॥ ११८ ॥ धर्मराजे कृतांतमानी । पांच वोपिले गात्रस्थानीं । शत नकुळे ताडिले झणी । अहिविषासारिखे. ॥ ११९ ॥ त्रिसप्त द्रौपदीतनय ।। वोपिते जाले एकैक वर्य । घटोत्कच राक्षसरायें । ताडिले सात निंबातें. ॥ १२० ॥ धृष्टद्युम्न काळविखारी । तीन अर्षी रॅणचत्वरीं । विराट, द्रौपद, पांच पांच शरीं । भेदिती भोजा सँरोपें. ॥ १२१ ॥ पांचाळ शिखंडी महात्राणे । ताडी कृतव पांच बाणें । त्यांवरी आणीक वीस ज्वलन । महारोषं समर्पो. ॥ १२२ ॥ भोजराज सर्वास्त्रप्रवीण । बाणीं बाण वारुनी ज्वलन । हेमपुंखी शर दारुण । पांच पांच सर्वां ताडिले. ॥ १२३ ॥ भीम भीमविक्रमी वीर । विधिले त्यातें सात शर । कवच भेदोनी स्तनांतर ।। महीमाजी रिघाले. ।। १२४ ।। सवेग करुनी तांतडी । ध्वज, चाप, सारथी, घोडीं, । छेदोनी पाडिलीं देहुँडीं । बाणधारी सरोजें. ॥ १२५ ॥ रथी विरथी वृकोदर । होतां, शर सत्याहत्तर । ताडितां मूच्छी दाटली सैर । मही पडतां | थरारी. ॥ १२६ ॥ देखोनी धर्म लोटला दळीं । सवें वीरांची घरहळी (?) । वर्षांनी शर काळानळी । पाठी भीमा सूदलें. ॥ १२७ ॥ सेनोपरी करुनी त्वरा । वर्षते जाले शरांच्या धारा । सावध भीम सक्रोध सैरा । मोकली शक्ती निघाते. ॥ १२८ ॥ कडाडली दामिनीसरी । तेजें दिशा भरल्या च्याही । फुफाट येतां तक्षकपरी । चंक्षी भोजें लक्षिली. ।। १२९ ।। आकर्ण वोढोनी कोदंड । शरद्वय सदृढ काळदंड । ताडुनी, करुनी दुखंड । धरेवरी । पाडिली. ॥ १३० ॥ तेजें डळमळी ते पर्णधारा । जाणों खचोनी पडली तारा । तैसी पडली अवनीवरा । विझोनियां तेजाते. ॥ १३१ ॥ शक्ति वायां गेली थोर । संतप्तमान वृकोदर । अन्य धनुष्य सज्जोनी क्रूर । शरपंचक १. सनासमुद्र. हाच दृष्टांत मागे ओंवी ९२ हींत आहे. २. पाण्याची मर्यादा, किनारा. ३. आघ, ४. भल्ल नांवाच्या बाणांनीं. ५. जोराने. ६. रणांगणांत. ७. क्रोधाने. ८. अत्यंत पराक्रमी. ९. वेडीवांकडीं. १०. (?) ११. अस्त्रविशेष. १२. डोळ्यांनीं. १३. धनुष्य.