पान:महाभारत.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ अध्याय महाभारत, १४७ वाटलें मना । छिनमानसे ग्लानी वचना । सात्यकीतें अनुवादे, ॥ १२७ ॥ तो कथारस सज्जनीं पाहीं । पुढिले प्रसंगी सेविजे तेही । करुणारसाची नवलायी । सुधापानासारिखी. ॥ १२८ ॥ श्रीगुरुभीमराजजलधर । कृपाअंबरी करितां प्रसर । मयूर नरहरि मोरेश्वर । टाहो करी हरिनामें. ॥ १२९ ।। अध्याय एकोणिसावा. संजय म्हणे, “अवनीपती! । चित्तीं व्याकुळ धर्म सुमती । कंठ दाटोनी दुःखावर्ती । अश्रुपात ढाळीत. ॥ १ ॥ ऊर्ध्वरोम पुलकांकित । प्रीतियुक्त काळसंमत । मधुरारवें न्यायमिश्रित । सात्यकीतें अनुवादे. ॥ २ ॥ जेवीं राघव सौमित्रातें । इंद्रजितयुद्धा धाडितां त्यातें । प्रशंसीत निजकार्यातें । तेवीं धर्मराज यादवा. ॥ ३ ॥ म्हणे, ‘बापा ! शिनिपुंगवा ! । वीरवमा! सुमतिधवा ! । शौर्यप्रताप समान मघवा । धनुधरां कुळगुरु ! ॥४॥ कृष्णचरणी अवक्र प्रेमा । विहित मार्गे रक्षिसी धर्मा । गुरुसेवनी आर्तगरिमा । प्राणांतीही नाटळे. ॥५॥ वृष्णिकुळवर्य दिनमणी । श्रीकृष्ण, माधव, चक्रपाणी ।। उपेंद्र, माधव, कैवल्यदानी । जो पुराणी गाइजे; ॥ ६ ॥ तो श्रीधर, शेषशाई । करी आमुते कृपेची साई । तुझाही भाव आमुचे ठाई । तयापरी यदुवर्या ! ॥ ७ ॥ याहीमाजी प्रतापतरणी । तव गुरुवर्य फाल्गुन मानी । जो विख्यात वीर लोकीं तिन्हीं । प्राणप्रिय तुज ताता ! ॥ ८ ॥ तेणें सैंधवहननाप्रती । आम्हां वोपिलें तुझ्या हातीं । कौरव वीर काळघाती । जिंकित दुर्घट जाण पां. ॥ ९॥ यावरी भरंवसा पूर्ण । जो, जयाशेचे निकेतनँ । जया म्हणती मधुसूदन । तो सारथी आमुचा. ॥ १० ॥ असतां पार्था अटक करणी । नाहीं, ऐसा भरंवसा मनीं । कौरव दुष्ट दुरभिमानी । काय करिती कळेना. ॥ ११ ॥ तुवां जावें वीरराया ! । किजे अर्जुनाचिया साह्या । सदा जयश्री तुझ्या बाह्या । श्रीकृष्णतुल्य प्रतापी. ॥ १२ ॥ आमुचे हित अनन्य प्रीती। सदा जल्पता कौरवघातीं । सुमित्रा ! मित्ररक्षण आर्ती । करितां पुण्य लाहिजे. ॥ १३ ॥ मित्रअर्थी यजितां प्राण । द्विजा वोपिलें पृथ्वीदान । फळ पावोनी सहस्रनयन । मानें आसने गौरवी. ॥ १४ ॥ तंही १. या अध्यायाचे ‘अलंबुषराक्षसवध' असे नांव हस्तलिखित पोथींत दिलेले आहे. २. ह्या अध्यायांत मूळांतील ११०-११४ अध्यायांतील कथाभागाचा समावेश झाला आहे. • ३पृथ्वीपते. (धृतराष्ट्रा.) ४. मधुरोक्तीनें. ५. निष्कपट, ६. जबरदस्त हौस. ७, स्थान, राहण्याची जागा, ८. संकटकाळीं.