पान:महाभारत.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ नरहरिकृत [द्रोणपर्व यींचा वैश्वानर ।शरासनीं शर तिखार । रुक्मपुंखी सज्जिले. ॥११०॥ वोढ काढोनी । आकर्ण पाहीं । सोडितां उसळले जैसे अही। हृदयीं भेदोनी लवलाही । धरेमाजी शिरकले. ॥ १११ । पर्वतशृंग खचे तळा । तैसा रथावरी पडे हेळा । पांडव वर्षती शरौघमाळा । बुजोनी रथा काढिलें. ॥ ११२ ॥ टाकोनी उडी, फोडुनी कीळा । भैमी धांवला उतावेळा । रथ फिरुनी नभःस्थळा । धरेवरी आपटिला. ॥ ११३ ॥ जैसा खगेंद्र उचलितां फणी । गळोनी पडे जेवीं धरणीं । कीं मृतकुंभपुटींत पाणी । नेतां पडे तळाते. ॥ ११४ ॥ कार्णिकार वृक्ष वातमेळीं । मंगोनी शाखा मिळती धुळी । तेवीं दोघांची वैरदळी । अष्ट दिशा लंघिती. ॥ ११५ । वीरें अलंबुष भूमी लंबू । जाला, न लगतां विलंबू । कौरवदळी माजला बोंबू । पांडवां हर्ष अँपाडे. ।। ११६॥ अनेक वाद्य लागली घाई । भैमी आलिंगी धर्म हृदयीं । म्हणे, ‘बाप ! विक्रमसायी । निवालों रणीं तुझिया.' ।। ११७ ॥ आर्षशृंगी काळसदना । जातां भ्रष्टली राक्षसी सेना। अमित क्रोध पातला द्रोणा । प्रेरुनी रथा लोटला. ॥ ११८ ॥ पाठी वीरांची निबिड मिठी । पांडव वीर लोटले नेहेटीं । उभय वीरांची महादाटी । शरांची दृष्टी माजली. ॥ ११९ ॥ तंव पार्थयुद्धाचा कडाका । कौरवदळीं फोडी हाका । 'धुईधूसरें आच्छादिले अर्का । धूमांकित धरित्री. ॥ १२० ॥ पांचजन्यनिस्वनस्वर । फुफाटी देव यादवेश्वर । नादें दुमदुमी चराचर । फणिवर तळीं घाबिरा. ॥ १२१ ॥ कौरवदळी चंडगर्जना । शंखादि वाद्य करिती नाना । श्रवणारूढ कुरुभूषणा । होतां, दचके मानसीं. ॥ १२२ । “एकटा पार्थ सेंधवहनना । गेला कौरवी प्रभिन्न सेना । षड्थी महाविखारी जाणा । सारिती परा काळाते. ॥ १२३ ॥ वाटे फाल्गुनाची विपरीत करणी । कौरव शब्द फोडिती रणीं । आणी चराचराचा धणी ।। कैवल्यदानी, विश्वात्मा, ॥ १२४ ॥ अव्यक्त व्यक्त, घनसांवळा, । माया अगम्य लीळा । ब्रह्मादि विनीत पादकमळा । सेवे कमळा (तली; ॥ १२५॥ तो तमालनीळ गोविंदू । ज्याचे आज्ञे चाले वेदू । जयश्रीचा आनंदकंदू । वाटे युद्ध करितसे.' ॥ १२६ ।। ऐसे तर्क विचित्र नाना । तर्कितां कैमल १. धनुष्याचे ठायीं. २. सहज. ३. मातीच्या मडक्यांत. ह्या ओंवींतील दोन्ही दाखले मूळांत आहेत. (अध्याय १०९, श्लोक २७-२९ पहा). ४. पांगायाचे झाड. ५. भांडण. ६. अलंबुमराक्षस भूमी (जमिनीवर) लंबू जाला (लंबा होऊन पडला)=मरून पडला. ७. निरुपम, पुष्कळ. ८. सायी= सावली”. ९. लक्ष्य लावून, एकाग्रचित्तानें, एकतानतेने. १०. धुकें व धुरळा यांनी. ११. सूर्यास. १२. शेष. १३. धमला. १४. अन्यथा, व्यर्थ, १५, नम्र. १६. रमली. १७, लाजिरवाणे,