पान:महाभारत.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ नरहरिकृत [द्रोणपर्व जाणसी सर्व धर्मा । पृथ्वीदानीं आगळी महिमा । भूप वर्धले स्वर्गधामा । भोगकारी अमित. ॥ १५ ॥ मीही याचक धर्मात्मिया ! । याच्चा करितों जोडुनी बाह्या । आर्त पुरवितां यादवराया ! । घडे दान महीचे. ॥ १६ ॥ कौरव वीर कडकडाटी । मशकप्राय तुझी दृष्टी । भ्रष्टोनी, रक्षो वीर किरीटी । गोप्ता तूंची आमुतें. ॥ १७ ॥ अर्जुन स्वस्थ तुजकरितां । जयस्विया ! यादवनाथा ! । तव शक्तीची मातें कथा । विदित सर्व, सुमित्रा ! ॥ १८ ॥ तू पुरुषार्थवीरपंचानना ! । भेदीं शत्रूची दुःसहसेना । तुझिया बळाची तेवक निपुणा । वाहे दरारा कृतांतू. ॥ १९ ॥ हैलायुध रोम संकर्षण, । अनिरुद्ध, प्रद्युम्न, सारण, । गद, सांबादि विक्रमघन । समान मान; यदुवर्या ! ॥ २० ॥ अद्वैतवनीं वीर पार्थ । तुझा प्रताप [पुरुषार्थ] । ६वी; निवटीं संकटांत । तोषवल्ली वर्धवीं. ॥ २१ ॥ पाहे पां सैनिका द्रवैमान । कौरवसेना उसळे घन । कौरव शब्द फोडिती त्राणे । काळमेघासारिखे. ॥ २२ ॥ पंर्वी समुद्र क्षोभे जैसा । वीर लाटा उसळती तैशा । गजाश्वरथी धांवती रोषा । धुळी व्योमा दाटली. ॥ २३ ॥ पार्थ उदित सैंधवहनना । आड घडूथी प्रभिन सेना । द्वय कृत्य संपादिता निपुणा । अवकाश नसे पणाते. ॥ २४ ॥ याकारणे शिनिप्रवीरा! । साह्य होई पृथाकुमरा । तुज समान योद्धा दुसरा । प्रद्युम्न एक, मी मानीं. ॥ २५ ॥ तूं अस्त्रज्ञ श्रीकृष्णसम । समानबळ बळिराम । अर्जुनासारिखा विक्रम नेम । जयस्वी इंद्र दुसरा. ॥ २६ ॥ सर्वं गुणी अळंकरण । धनुर्वेद अवगत पूर्ण । फाल्गुन जैत्य जैसा प्राण । ऐसा निश्चय मी मानीं. ॥ २७ ॥ तुझा गुरु श्वेतवाहन । त्यासी पूज्य मधुसूदन । तत्समान मानी मज अर्जुन । तुजही मान्य धर्मता. ॥ २८ ॥ साच करुनियां माझिया वचना । विर्भांडूनी कौरवसेना । किरीटीसाह्य करीं निपुणा । यरों पार्था गौरवीं.' ॥ २९ ॥ प्रीतियुक्त मधुरवाणी । न्याययुक्त अर्थवर्धनी । तोपें पावोनी सात्यकी गुणी । धर्माप्रती अनुवादे. ॥ ३० ॥ म्हणे, “धार्मिका! धर्ममूर्ती! । धर्मात्मया ! स्वधर्मप्रीती । तुझिया वचनें निवालों चित्तीं । जेवीं पांथिक सुच्छाया. ॥ ३१ ॥ राजराजया ! मुगुटमणी ! । बोलिलें सारं यथार्थ वाणी । कळियुक्त; वीरश्रीखाणी । योग्य १. याचना, मागणी. २. इच्छा. ३. रक्षण कर्ता. ४. तेज. ५. बळराम. ६. वणींत असे. ७. पळणा-या. ८. अमावास्या व पौर्णिमा या दिवशीं. ९. फार उचंबळे. १०. विजयशाली. ११. विजयी, पराक्रमी. १२. दाणादाण करून (वि+भंजू=भंग करणे). १३. उत्तम छायेच्या योगाने. १४. उत्तम, श्रेष्ठ. १५. प्रसंगोचित.