पान:महाभारत.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ अध्याय] महाभारत. १४५ डिलें, ॥ ९१ ॥ अस्त्रप्रभवें निमाली माया । प्रत्यक्ष राक्षस जाहला, तया । शर सज्जिला निवटावया । तेजें दिशा डवरिल्या. ॥ ९२ ॥ राक्षसे फोडुनी हाक मोठी । आड निघाला द्रोणापाठी । वीर लोटले. मैहाहटी । वर्षती कोटी शरांच्या. ॥ ९३ ॥ उभय वीर सैंताचे धैायीं । सरसरा रक्तं स्रवती मही । वीरश्रीमदं न गणोनी मही । पुढां धंसती उत्साहे. ॥ ९४ ॥ घटोत्कचे महामारीं । वीरां केली आनपरी । दुःसह मानोनियां समरीं । आर्षशृंगी थडकला. ॥ ९५ ॥ एकमेकां वारुनी, माया । दावोनी,: ताडिती क्रोधं तया । रामरावणासारिखें तया । युद्ध दोघां माजलें. ॥ ९६ ॥ अलंबुष राक्षस महारोडें । ताडी भैमीते शर कर्कश । येरू प्रदीप्त महारोडें । बाण वीस समप. ॥ ९७ ॥ उभय वीर विचित्र माया । करुनी, भेदिती शरें काया । लघुलाघव हस्तक्रिया । येरयेरां कृप्तता. ॥ ९८ ॥ शर वर्षतां उभयतां । आच्छादिला देव सविता । निबिड ईंधूंची घोर चलथा । मार्ग वाता न होय. ॥ ९९ ॥ जैसी गजगजांची धुमाळी । कीं सिंहसिंहांची हातफळी । ना ते, गंडभैरवा भैरवमेळीं । तेवीं खंदळी दोघांची. ॥ १०० ॥ वज्रासमान ताडिती शर । नादं थरारी अंबर । [न सहुनी वेगाचा बडिवार] । खचती रांगें गिरीचीं ॥१०१॥ अलंबुष राक्षस क्रोधानळीं । जाणों प्रदीप्त देवहेळी । पांडव वीर लोटले सकळीं । बाणधारीं वर्षती. ॥ १०२ ।। आर्षशृंगी प्रतापशूर । ताडी पंचवीस भीमा शर । घटोत्कचाचे स्तनांतर । पंच बाणीं विधिलें. ॥ १०३ ॥ पुष्टिरातें तीन हवा । सात अर्पले सहदेवा । त्रिसप्त शर वन्हिरवा । नकुळाप्रती वोपिले. ॥ १०४ ।। पांच पांच द्रौपदीतनया । शर ताडिले भारतें तया । पांच शते कृशानुप्रमेया । घटोत्कचा विधिले. ॥ १०५ ॥ त्यांवरी आणीक सत्याहत्तर । शर वर्षांनी प्रभिन्न क्रूर । मुखें निस्वैनस्वर । काळमेघासारिखा. ॥ १०६ ॥ दुःसह मानोनी पांडववीरीं । भीमें ताडिला नव शरीं । सहदेवें स्तनांतरीं । पांच सायक अर्पिले. ॥ १०७ ॥ नव शतें वोपले युधिष्ठिरें । चौसष्ट क्रोधे नकुळे निकरें । तीन तीन द्रौपदीकुमरें । घटोत्कच पांच शर. ॥ १०८ ॥ सर्वांगें व्यापिलीं तिहीं बाणीं । रुधिरस्राव जाला धरणी । कोपोनी अलंबुष चौगुणी। पांच पांच ताडी सवते. ॥१०९॥ क्रोधे प्रदीप्त भैमी वीर । जाणों प्रळ| १. मारावया. २. मोठ्या नेटाने लढणारे. ३. जखमा लागल्यामुळे. ४. घुसती, शिरती. ६. भलतीच अवस्था, दीन दशा. ६. भीमपुत्रातें (घटोत्कचास), ७. बाणांची रास. ८. हातपिटी, झुंज. ९. दांडगाई, धुमश्चक्री. १०• हेळी=सूर्य. ११• छाती, वक्ष. १२. अग्नीप्रमाणे. १३. भयंकर गर्जना. २१ न० द्रो०