पान:महाभारत.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ नरहरिकृत (द्रोणपर्व सात सात एकएको. ॥ ७२ ॥ ते पीड्यमान पंच भ्रातर । जेवीं नववधूचाग्रीं कर । स्पर्शतां चुळबुळी पळे दूर । कासावीस मानसें. ॥ ७३ ॥ तयापरी कुरुनंदने । त्रास पावोनी मिनले त्राणें । दोन दोन शर तीक्ष्ण । गात्रस्थानीं ताडिले. ॥ ७४ । न गणोनी येणे सोडिलें शरा । तीन तीन अर्पिले तया कुमरा । अधिकाधिक कोपोनी सैरा । वेष्टोनी भूपा वर्षले. ॥ ७५ ॥ श्रुतकीर्ती पार्थतनय । शर वर्षांनी मारी हय । प्रतिविंध्ये शरसमुदायें । ध्वज व्योमा उडविले. ॥ ७६ ॥ भीमपुत्र श्रुतसोम गाढा । चाप छेदोनी पाडिले पुढा। सारथी [शरें] काळदाढा । शतानीकें सरोषे. ॥७७॥ सहदेवपुत्र प्रतापराशी । नाराच वर्षांनी महारोषीं । शिर पाडिलें धरणीसी । बाळसूर्यसारिखें. ॥ ७८ ॥ इतस्ततः होवोनी गेली सेना । अलंबुष राक्षस पातला रणा । भीमसेन, कुरुनंदना! । लोटला त्याते निघाते. ॥ ७९ ॥ जैसा सुमित्र रावणकुमरा । कीं भृगुवर्य सहस्रकरा । ना तो देवेंद्र वृत्रासुरा । तेवीं पांडव तगटला. ॥ ८० । परस्परें बाण तिखार । वर्षती, फोडिती शब्द घोर ।। राक्षसी सेना भयंकर । वेष्टुनी भीमा ताडिलें. ॥८१॥ रथारूढ कोणप बळी । तीन शर पाडिले तळीं । पुनः वर्षांनी बाणजाळीं। चारी शतें मारिले. ॥ ८२॥ अलंबुष बमोनी क्रोधउल्का । बाण सोडी वन्हिशिखा । हृदयीं थडकतां देखा। घोर मूच्छी दाटली. ॥ ८३ ।। क्षणे होवोनियां सावधान । धनु कर्षिलें आकर्ण घन । शर सोडुनी महाज्वलन । अंगप्रत्यंग भेदिलें, ॥ ८४ ॥ रुधिर व्यापिली तनू । जाणों वसंती किंशुकी मानें । काळवेळ भावोनी पूर्ण । कॅरी बंधूचा. ॥ ८५ । 'मॅज नसतां प्रतापसिंधू । बंक मारिला माझा । त्याचें उसणे उतरीन मदु । वीरां सवी देखतां. ॥ ८६ ॥ जेवीं चोर कर चोरी । मुख न दावी लोकांतरीं । आजी सांपडला माझ्या करीं । बकमेटी धाडीन.' ।। ८७ ॥ ऐसें वदोनियां वचनीं । घोर रूप प्रभिन्नवदनी । अदृश्य होवोनी झणीं । गगनोदरीं संचरे. ॥ ८८ ॥ तेथोनी वर्षे शर धारा । जाणों पर्जन्यवृष्टी सैरा। राक्षसी मैाव प्रभिन्नाकारा । तयामाजी सञ्च ॥ ८९ ॥ क्षणैक दिसे, क्षणैक न दिसे । क्षणीं अवनीं, गगनीं वसे सराट शस्त्रघोषं । सेना मर्दी निघाते. ॥ ९० ॥ कौरव वीर नाचती र अनेक वाद्ये पिटिती त्राणीं । असह्य मानोनी भीम गुणी । त्वष्टास्त्र वे .. । । । । ८। JL Ph | १. बाण. २. हे धृतराष्टा ! ३. कार्तवीर्य सहस्रार्जुनाला. ४. तीक्ष्ण. ५. राक्षस (अलंव ६. भावाची (बकासुराची) आठवण करी. ७. मी हजर नसतां. ८. मुक्तेश्वर-आदि। क्षस (अलंबुष), ३८ पृ० ३४२-४८ पहा. ९. आसुरी माया (कपटविद्या). १०. उत्साहाने, जोराने