पान:महाभारत.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ अध्याय] । महाभारत. १४३ हृदय भेदुनी निवालीं त्राणे । प्राणपंचकीं सोडुनी ठाणे । यमगृहा वरियेलें. ॥ ५४ ।। त्रिगर्तवीर वीरधन्वा । पडतां, दुर्मुख जाहला आडवा । पुढारूनी अग्रता हवा । सहदेवा ताडिलें. ॥ ५५ ॥ येरें बमोनी क्रोधउल्का । निशित शर अग्निशिखा । शत अपनी कुरुनायका । हास्य करी विनोदें. ॥ ५६ ॥ दुर्मुखें पावोनी रोषातें । नव बाण अर्पिले सहदेवावें । तेणें दाटोनी क्रोधभरितें । शर वितंड सोडिले. ॥ ५७ ॥ कडाडिलें विजूच्यापरी । ध्वज छेदुनी, अश्व चारही । मारुनी, सारथी धरेवरी । शिररहित पाडिला. ॥ ५८ ॥ पुन्हा करुनी शरसंधान । दुर्मुखा वोपिले पंचवीस बाण । येरू डळमळोनियां पूर्ण । निर्मित्ररथीं आरूढे. ॥ ५९ ॥ सहदेव अत्यंत क्रोधभरणी । निर्मित्र ताडिला प्रभिन्न बाणीं । शिर उडवोनियां गगनीं । पुनः धरे पातलें. ॥ ६० ॥ कौरवदळी हाहाकार । म्हणती, ‘निमाला त्रिगर्तकुमर' । व्याघ्रदंत कौरववीर । रोजें पुढे लोटला. ॥ ६१ ॥ तंव सात्यकी सत्यविक्रमी । त्याते थडके क्रोधऊर्मी । एकमेकां सायकवर्मी । महाक्रोधे ताडिती. ॥ ६२ ॥ यादव प्रज्वळोनी क्रोधानळीं । प्रदीप्त सोडिल्या विशाळ भाळी । ध्वजाश्वसारथी पाडिले तळीं । व्याघ्रदंतसमवेत. ॥६३॥ मागधपुत्र पडतां रणीं । सेना सज्ज लोटली कदनीं। ‘घ्या, घ्या,' शब्द सवी वदनीं । अत्रमाळा मोकलिल्या. ॥ ६४ ॥ मागधवीर ऐकवळा । करोनी, शस्त्रे वर्षती सँळा । सरसराट शरौघमाळा । गदात्रिशूळखज़ादी. ॥ ६५ ।। चक्रे, तोमरें, लहुडी, परिघ, । भिंडिमाळा, मुद्गल सैंघ, । शक्ती, भाले, पट्टे, अव्यंग । चहूं दिशा वर्षती. ॥ ६६ ।। बाप सात्यकी धनुवडा । बाणी शस्त्रांचा करुनी रगडा । वीर पाडिले दडाडा । पाशें जेवीं मृगवृद. ॥ ६७ ॥ कीं वना धडकतां दावाग्नी । तृणपादपा होय धुणी । तैसी सेना भ्रष्टतां कदनीं । क्रोध द्रोणा नावरे. ॥ ६८ ॥ धांवतां वीर लोटले पुढे । जाणों मेघाचे देहुँडे हुँडे । उभयतां वीर वीरश्रीगाढे । महामारी पेटले. ॥ ६९ ॥ सोमदत्तपुत्र सोमदत्ती । उसळोनी लोटतां क्षिती । द्रौपदीतनय क्रोधावर्ती । पंच भ्रातर तगटले. ॥ ७० ॥ जाणों पंच शवक हेरीचे । गजा लोटले विक्रमें साचे । शर वर्षले फणी विषचे। कीं कल्लोळ वन्हीचा, ॥ ७॥ सोमदत्ती युद्धप्रवीण । एकएकासी पांच बाण । ताडी आणि महाज्वलन् । १. त्राण (शक्ति) नाहीसे झाले; जोर जिरून गेला. २. मोठे किंवा कणखर. ३. बाणविशेष, ४. मूळांत व्याघ्रदत्त' असे आहे. ५. जूट, जमाव. ६. जोराने, त्वेषानें. ७. पुष्कळ. ८. गवत व झाडे यांची धुणी ( शेकोटी) होई. असाच दृष्टांत अध्याय १७ ओंवी ९० हींत आहे. ९. वाडे. १०. भिडले, ११. सिंहाचे बच्चे. १२. विखारी.